• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
20 Jun 2017


एमपीसी न्यूज - हडपसर मधील सायकलिस्ट ला  शनिवारी १७ जूनला सकाळी ४ वाजता आकुर्डी येथून ८ जण हडपसर चा दिशेने निघालो व ५ वाजता मगर पट्टा  ब्रिज खाली ठरल्या प्रमाणे आले होते त्यानुसार १२ जण तिथे आले होते . सगळ्याची भेटी आणि ओळख करून सकाळी ५.१० ला पांढुरंगाच्या वाटेने प्रवास सुरु झाला. मगरपट्टा चौक ते चौफुला ५० किलोमीटर न थांबता आम्ही गेलो आणि मग तिथे गुरुदत्त हॉटेल मध्ये सगळ्यांनी चहा व वडापाव वर ताव मारला आणि पुढे प्रवास सुरु केला.

आम्हाला कुठेही थकवा जाणवत नव्हता कारण विठ्ठलाची ओढ होती. पुणे पाटस ला थोडी विश्रांती घेलती म्हंजे तोडे पाय मोकळे केले आणि सरळ भिगवणला थांबायचे ठरले कारण मधात कुठे थांबलो तर उशीर होईल असं वाटत होत आणि सूर्यराजा आपली ऊर्जा पसरवून आम्हाला सारखं सारखं पाणी पिण्यास भाग पडत होता खरंतर आम्ही भिगवणला थांबलोच नाही कारण संपूर्ण रोड हा चढ आणि उतारांनी भरल्या असल्या मुळे थांबायला नको असं वाटत होत आणि थोडं समोर भाला मोठा चढ चढवून खूप दमलो व एक कडुलिंबाचे झाड बघून थांबलो आणि सांगायला थोडं खाऊन एक एक लिंबू शरबतवर ताव मारला. लिंबाची सावली थंडगार हवा असं वाटत होत कि इथेच झोपून जावं पुणे पुढे जायचं होत ५ ते १० मिनिट तिथे विश्रंती घेऊन इंदापूर चा दिशेने वाटचाल सुरु केली. सायंकालीन प्रवास करताना जे जग दिसत ते खूपच वेगळं असत ज्या गावातून आपण जातो तिथले लोक एका एका उत्सुकतेचा भावनेने बघत असतात आणि अडवून प्रश्न विचारतात कुठून आलाय कुढे जाणार काही लोक पाणी देतात एक वेगळाच अनुभव तुमच्या आठवणींच्या शिदोरीत अधिक होत जातो मधात काही पत्रकार पण भेटले त्यांनी पण प्रवास वर्णन जाणून घेतला आणि फोटो घेतले. नंतर आम्ही इंदापूर ला हॉटेल माउली मध्ये मस्त भाकर, खिचडी, आणि साधी भाजी वर ताव मारून तिथे ३.३० परियंत आराम केला. १५० किमी आंतर पार केला होता.

पुढे  अकलूज च्या दिशेने पायडल मारली रोड तास जरा खराबच होता पण थांबून उपयोग नव्हता सगळा नुसता चढ म्हणजे सतत पायडल मारणे हाच एक पर्याय. अकलूज सोडून पुढे गेलो आणि वेळापूरला आणि बाकी मेंबरची वाट बघत बसलो पण मग आभाळ बघून पुठे जाण्याचा निर्णय घेलता थोडाच पुढे गेलो आणि रिमझिम पाऊस सुरु झाला एका गोठ्यात आम्ही तिघेही थांबलो आणि मग सगळी गॅंग मागून अली आणि रिमझिम पावसात प्रवास सुरु केला पण लगेच २ मिनिटात पावसाचा जोर खूप वाढला व आम्हाला एका तयार होत असेलेल्या हॉटेलात आसरा मिळाला तिचे पण काही गावकरी भेटले खूप चांगले होते ते सलग २ तास मुसळधार पाऊस आणि वारा पण सगळी टीम सोबत असल्यामुळे आनंद होता. जसा पाऊस कमी झाला आम्ही पुढे निघाले तिथे वाटीच एक सकाळ सोलापूर चे पत्रकार भेटले आणि त्यांनी गरम गरम वडापाव ची मेजवानी दिली एक तर खूप भूक लागली होती आणि पावसात गरम गरम वडापाव म्हणजे शब्दच नाही.

पुढे पंढरपूर फक्त ३० किलोमोटर होते पण रस्ता संपत नव्हता रात्र झाली होती सगळ्यांनी सायकलींचे लाईट सुरु केले होते आणि पायडल मारत होते. शेवटी पायडल मारता मारता रात्री ९.३० ला शनिवार १७ जून ला आम्ही सगळे पंढरपूरला पोहोचलो आणि पुणे ते पंढरपूर एक प्रवास पूर्ण झाला. काही जण खूप खुश होते कारण एक स्वप्न पूर्ण झाले होते तर काही जण उद्या रिटर्न सायकल वर जायचं म्हणून नॉर्मल होते. कारण त्यांचा टार्गेट ४७० किलोमीटर होते. काही जणांना भारत पाकिस्तान अंतिम सामन्याचे वेध लागले होते. वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे विषय शेवटी २३५ किलोमीटर पूर्ण झाले. अमित लोंढे , स्वामिनाथन , हरी राम , राजेश , विवेक यांनी आधी येऊन एक घरामध्ये  जेवण व राहण्याची सोय केली होती.

 ट्रेकर असलेले सचिन वाळके यांनी २० किलोमीटर राईड ते डायरेक्ट २३० किलोमीटर राईड असा टप्पा पार केला होता . स्वामिनाथन श्रीनिवासन , राजेश राणा , हरी राम यांनी प्रथमच इतकी दूर ची सायकल राईड केली होती. अजित पाटील , कपिल लोखंडे व सौरभ कान्हेदे यांनी संपूर्ण राईड चे मस्त नियोजन केले होते. गिरीराज उमरीकर व दीपक नाईक यांनी सर्व शूटिंग व फोटोग्राफी ची जबाबदारी घेतली होती. टेनिस वर्मा याचा उत्साह व सायकल राईड चा अनुभव आतिशय कौतुकास्पद होता. आकाश कुर्हाडे आणि विकास शेळके यांनी उशीर झाला तरी राईड पूर्ण केली. आय सी सी कोअर कंमीटी मेंबर गणेश भुजबळ यांनी सर्वाना हडपसर पर्यंत बॅग कार मध्ये सोडण्याची मदत केली त्याच प्रमाणे पाण्याची पण सोय केली. आकुर्डी पासून निघालेल्या सायकल रायडर्स ला त्यामुळे सायकल हडपसर पर्यंत खूप मदत झाली. आय सी सी कोअर कंमीटी मेंबर विश्वकान्त उपाध्यय , अमित खरोटे , अभिजीत लोंढे व यतिश भट्ट यांनी शुभेच्छा दिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ४ ला गजू,अजित,अविनाश,टेनिस मंदिर मध्ये दर्शन घेऊन ५ ला परती चा प्रवासाला निघाले बाकी सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या कारण परत २३० किलोमीटर अंतर पार करायचे होते. टेम्भूर्णी मार्गे मार्गक्रमण सुरु झाले रोड मध्ये काही मित्र भेटले एकमेकांना शुभेच्छा देत हायवे आला. आता माइलस्टोन सुरु झाले पुणे १८० किलोमीटर , विरुद्ध दिशेने येणार खूपच वारा होता त्यामुळे अंतर कापणे खूपच अवघड जात होते पण जबरदस्त ईच्छा शक्ती मुळे मजल दर मजल चालू होते. परंतु चा प्रवासात प्रथम टेम्भूर्णी ला नास्ता केला मस्त पोहे, शिरा , भजी खाल्ली. पुढे सूर्य डोक्यावर आला पण ढग असल्या मुळे थोडी ऊन सावली चा खेळात इंदापूर - पळसदेव - उजनी डॅम - भिगवण असा प्रवास केला. वाटेत आय सी सी चे हडपसर येथील सहकारी डॉ. चंद्रकांत हरपळे , डॉ.  रवी झाँझुर्णे यांची भेट झाली त्यांनी आमचा एक सदस्य टेनिस वर्मा चा सायकल ची पंचर काढून दिली व पुढील प्रवासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.  भिगवण येथे जेवण करून पुढे कुरकुंभ - रावण गाव - यवत - उरुळी कांचन - हडपसर असा प्रवास केला व सर्व जणांनी ४००० मीटर पेक्षा जास्त उंची पार करत ४७० किलोमीटर चा प्रवास २ दिवसात एकमेकांना शुभेच्छा देऊन पूर्ण केला.

आय सी सी डिव्होशनल सायकल राईड मध्ये  गजानन खैरे , अजित पाटील, अविनाश अनुशे, कपिल लोखंडे, सौरभ कान्हेडे , गिरीराज उमरीकर, दीपक नाईक,  स्वामिनाथन श्रीनिवासन , राजेश राणा , हरी राम, टेनिस वर्मा , आकाश कुर्हाडे , विकास शेळके,  सचिन वाळके , अमित लोंढे , विवेक खेडकर , ज्ञानेश्वर काशीद , नरेशकुमार लांबा , श्रीवत्सा के आर , प्रियदर्शन हटकर यांनी सहभाग घेतला होता.

bycical

01 Jun 2017
एमपीसी न्यूज - जबलपूर पासून 180 कि.मी. अंतरावर मध्यप्रदेशमध्ये असलेले बांधवगड हे निसर्गरम्य जंगल विविध प्राणी आणि पक्षी यांनी समृद्ध आहे. या जंगलातल्या सफारीचा आनंद काही वेगळाच आहे. बांधवगड जंगल पाहायला जाणे म्हणजे पशु, पक्षी आणि झाडे पाहायला जाणे नाही. तर जंगलात राहणा-या प्राण्यांना, हळूच इकडून-तिकडे पाळणा-या पक्ष्यांना, दुडूदुडू धावणा-या ससा, खारुताई यांचे नैसर्गिक आयुष्य समजून घेण्याच्या मोठा अनुभव आहे. 
 
फ्रेंड्स ऑफ नेचर्स या संस्थेने जंगल वाचण्याची, विविध पशु पक्ष्यांविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालणारी सुंदर अनुभूती 84 निसर्गप्रेमी बांधवांना करून दिली. वातानुकुलीत राहण्याची व खानपानाची सुंदर व्यवस्था, जंगल सफारीसाठी मारुती जिप्सी, जाताना येताना रेल्वेचा आणि रेल्वे स्टेशन पासून जंगलातील हॉटेल पर्यंतचा वातानुकुलीत प्रवासात 45 अंश तपमानाच्या झळा जाणवतच नाहीत. 
 
पहिल्या दिवशी जबलपूरचा बेडाघाटचा धुंवाधार धबधबा आणि संगमरवरी डोंगरातून नर्मदेच्या निळ्याशार पाण्यातील बोटींगचा आल्हाददायक अनुभव मिळविता येतो. त्यानंतर पाण्यात डुंबणारी कनकट्टी वाघीण आणि बागडणारे तिचे बछडे, स्पॉटी आणि तिचे बछडे, बामेराजसन, हिम्मंत सिंग अशा नावांची वाघाची पिल्ले पाहता येतात. सफारीदरम्यान कुणाला 4 वेळा वाघाचे दर्शन होते, तर कुणाला तब्बल 9 वेळा. 
 
सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य असते वाघाबरोबरच अस्वल, रान डुक्कर, गवे, जंगली कुत्रे, कोल्हे, हत्ती (वनखात्याने पाळलेला), विवध प्रकारची हरणे, सांबर, नीलगाय, कासव असे विविध प्राणी त्यांच्या मुक्त अवस्थेत पाहायला मिळतात. याच जंगलात झाडांच्या उंच टोकावर बसून वरची हिरवी पाने खाली हरीणांच्या कळपांसाठी टाकणारी माकडे असंवेदनशीलतेचा कळस चढलेल्या माणसांपुढे मानवतेचा आदर्श देताना दिसतात. त्याच्या या कृत्याला 'मानवता' तरी कशी म्हणता येईल ती तर 'प्राणवता'च ठरेल. पिसारा फुलवून नाचणारे मोर, विविध पक्षी, हरिणांची तुरु तुरु पळण्याची लगबग सगळं कसं डोळे तृप्त करणारे दृश्य दिसते. 
 
जंगल सफारीत सकाळी 6 ते 9:30 व दुपारी 3:30 ते 6:30 अश्या दोन सफारी असतात. एका मारुती जिप्सी मध्ये 6 जणांचा समूह असतो. बरोबर जिप्सीचा ड्रायव्हर आणि गाईड पण असतात. मात्र आपल्याला जंगलात गाडीतून खाली उतरण्याची परवानगी नसते. सहसा आपल्याला नेहमी पाहायला न मिळणारे पाणकावळा, पिंगळा, सर्पंट इगल, व्हाईट आय इगल, ट्रीपॉय, घुबड, गिधाडे यांसारखे विविध पक्षीही पाहायला मिळतात. 
 
फ्रेंड्स ऑफ नेचर्स असोसिएशन सारख्या संस्था अशा प्रकारच्या सफारीचे आयोजन करतात. ही संस्था वर्षातून 3-4 जंगल सफारी, 25-30 गिर्यारोहक सहली व 2 केनिया सफारीचे आयोजन करते. यामधून लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाऊन त्यांना नैसर्गिक जगण्याचा आनंद मिळवून देणे हा एकमेव उद्देश असतो. या जंगल सफरीवरून येताना सफारीसाठी गेलेली मंडळी मानवी वसाहतीत प्राणवतेचा वसा एकमेकांना देतील ही त्यामागची दूरदृष्टी असते. 
Page 1 of 2
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start