• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
20 Jun 2017

एमपीसी न्यूज - साधारणतः अॅसिडिटीकडे ५ महिन्यांपासून दुर्लक्ष करण्यात येते. पित्ताची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्यासाठी उत्तम असते. दुर्लक्ष केल्यास पित्तामुळे जीवनशैली प्रभावित होते. 20-30 या सर्वसामान्य वयोगटामध्ये अॅसीडीटीचा त्रास दिसून येतो. विविध शक्तिशाली औषधांचा वापर आणि चुकीची जीवनपद्धत्ती अॅसीडीटीचे कारण ठरते. महाराष्ट्रात जवळपास 52% लोकांना झोपेच्या अनियमिततेमुळे पित्त होते. महाराष्ट्रातील अवांतर पाचक समस्यामुळे पित्त झालेल्या रुग्णांना 2% रुग्णांना कॅन्सर होण्याचा धोका आहे.

रात्री उशिरापर्यंत जागरण, अवेळी जेवण, तिखट मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, अति थंड पदार्थ खाणे, पोटाशी संबंधित काही आजार असल्यास देखील पित्ताचा त्रास होतो. तसेच पित्तामध्ये ब-याच रुग्णांना घशातील जळजळीमुळे गंभीर खोकला येते. तर काहींना उल्टी होते. पूना हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट विभागाचे विभागाध्यक्ष डॉ. विनय थोरात म्हणतात, "गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट प्रॉक्टिसिंग महाराष्ट्र यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 33% रुग्णांना पित्तामुळे उद्भवणा-या पाचक विकारांचा सामना करावा लागतो. यामध्ये भेडसावणारी गोष्ट अशी की, वैद्यकीय सल्ला न घेता बरेच रुग्ण घरगुती औषधोपचार करतात. घरगुती औषधोपचार करणे योग्य बाब आहे, परंतु त्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे."

योग्य औषधोपचारांमुळे पित्तावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. लोक दिवसेंदिवस व्यस्त जीवन जगू लागले आहेत. काम किंवा कौटुंबिक जबाबदा-यांवरील तणाव असणारे बहुतेक रुग्ण पित्तकडे दुर्लक्ष करतात. पित्ताची लक्षणे जीवनशैलीत केवळ व्यत्यय आणतात. त्यामुळे साधारणतः मोठा जीवघेणा धोका उद्भवत नसल्याने लोक याकडे दुर्लक्ष करतात. तेलकट आणि मसालेदार पदार्थ, कॅफिन आणि चॉकलेटचा वापर बंद केला पाहिजे. नियमित चालणे, सायकलिंग, योगाभ्यास आणि पोहणे यामुळे पित्तापासून मुक्ती मिळविता येते.

10 Jun 2017

एमपीसी न्यूज - पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस कमी जास्त प्रमाणात सर्वच ठिकाणी पडतो आहे. शहरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन असेल तर ठीकच आहे, परंतु नियोजन जर ठीक नसेल आणि पावसाचे पाणी मानवी वस्त्यांमधून वाहत असेल तर मात्र धोक्याची घंटा आहे. यासाठी पावसाचे पाणी आणि सांडपाणी यांचे योग्य नियोजन करायला हवे. हे पाणी सतत वाहते ठेवायला हवे. यासाठी गटारी, नाले यांची सफाई करायला हवी. 

 

सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवायला हवी. नाहीतर डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या हे साथीचे रोग आपल्या घरात आलेच म्हणून समजा. साथीचे रोग आपल्या घरात येऊ नये. त्याचबरोबर आपल्या वस्तीत येऊ नये यासाठी आपण साधारण पण विशेष काळजी घ्यायला हवी. 
हिवताप कसा टाळता येईल - 
हिवताप हा आजार ऍनॉफिलस या डासांपासून पसरतो. या प्रकारचे डास अस्वच्छ पाण्यावर अंडी घालतात. त्या अंड्यांचे आळ्यांमध्ये रूपांतर होते. 4-5 दिवसांनी या आळ्यांचे कोष बनतात. या कोषांमधून 2 दिवसांमध्ये डास बाहेर पडतात. हा डास हिवताप असणा-या व्यक्तीला चावला तर माणसाच्या शरीरातील हिवतापाचे विषाणू डासाच्या शरीरात जातात आणि तोच डास नंतर निरोगी माणसाला चावला तर त्यालाही हिवताप होतो. 
यासाठी घरात किंवा घराबाहेर असलेल्या अस्वच्छ पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. घराच्या मागच्या अंगणात, गॅलरीमध्ये, छतावर जुने भंगार सामान असते. त्यामध्ये पाणी साचून या डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून या सामानाची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच घरामध्ये फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रीजचा खालचा ट्रे, मनी प्लांट, शोभेचे कारंजे यांमध्ये देखील साचलेले पाणी असते. त्यानंतर परिसरात असलेले पाण्याचे डबके वाहते करायला हवे. अथवा ते बुजवून घ्यायला हवे. यामुळे ऍनॉफिलस डासांची उत्पत्ती होणार नाही आणि हिवतापाची देखील लागण होणार नाही. 
डेंग्यू, चिकुनगुन्या कसा टाळता येईल - 
एडिस इजिप्ताय या प्रकारचे डास डेंग्यू आणि चिकुनगुन्या आजार पसरवतात. हे डास घरातील स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात. या अंड्यांमधून ऍनॉफिलस डासांप्रमाणेच डासांची उत्पत्ती होते. म्हणून घरातील स्वच्छ पाण्याची योग्य निगा राखली पाहिजे. या डासांच्या अंड्यांपासून डास तयार होण्यासाठी साधारणतः 8 दिवस लागतात. त्यामुळे पिण्याचे पाणी किंवा इतर स्वच्छ पाणी साठवण्याची साधने आठवड्यातून एक वेळ स्वच्छ धुवून कोरडी करावी आणि नंतर पाणी भरावे. 
 
परंतु काही स्वच्छ पाण्याचे काही स्रोत रिकामे करणे शक्य नसते. उदा. घरावर असलेली पाण्याची टाकी, फ्लॅटच्या तळघरात असेलेली संपवेल अशांची झाकणे घट्ट बसविणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यामध्ये डास जाऊन अंडी घालू नये. 
 
माणसाला 70 टक्के आजार हे पाण्यामुळे होतात. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले आणि परिसरात स्वच्छता ठेवली तर आपण पावसाळ्यात प्रामुख्याने येणारे साथीचे आजार आपल्यापासून दूर ठेवू शकतो. 
Page 1 of 4
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start