• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News

एमपीसी न्यूज - आजच्या युगात चांगल्या माणसांचा सहवास मिळणे अवघड आहे. आयुष्यातील चढ-उतार आणि बरे-वाईट अनुभव यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे चांगुलपणा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ज्येष्ठांचा सहवास मोलाचा असतो. मात्र, उपेक्षा झाल्याने काही ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. अशा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध राबविण्यात येणारे उपक्रम हे कौतुकास्पद आहे, अशा ज्येष्ठांचा आदर करणे गरजेचे आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

एमपीसी न्यूज - बावधन येथील 18 वर्षीय मुलगी  20 जूनपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज - तीन दिवसांच्या सलग सुट्टयांमुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याने आज सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने तुंडूब भरली होती. दिवसभर पावसाचा जोर देखील चांगला राहिल्याने पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सहारा पूल धबधबा, भूशी धरण व डोंगरातील धबधबा, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, गिधाड तलाव ही सर्वच ठिकाणे पर्यटकांनी गजबजली होती.

एमपीसी न्यूज - वीर दामोदर पंत चापेकर यांचा आज खरे तर जन्म दिवस, ज्यांच्या बलिदानामुळे  चिंचवड गाव देशाच्या इतिहासात कोरले गेले. मात्र, त्यांच्याच जन्मदिनाचा चिंचवडकरांना व तेथील राजकारण्यांना विसर पडावा याची खंत व्यक्त करत फत्तेचंद जैन विद्यालयाच्या 1994 सालच्या विद्यार्थ्यांनी चापेकर आम्हाला माफ करा म्हणत वेगळ्या पद्धतीने त्यांचा जन्म दिवस साजरा केला.

एमपीसी न्यूज - शेतक-यांना दीड लाखांपर्यंतच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय देशाच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने आज (शनिवारी) घेतला, असे म्हणत मावळ भाजपतर्फे निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला. पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी वडगाव मावळ येथे पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या आनंद उत्सवात शासनाचे अभिनंदन केले.

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे रस्ते जरी मोठे असले तरी तेथे बेदरकारपणे वाहन चालवणारे व ते पार्क करणारेही महाभाग भरपूर आहे. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी पिंपरी पोलिसांनी पिंपरीच्या विविध भागात आज (शनिवारी) कारवाई केली.

एमपीसी न्यूज - निगडीवरून पिंपरीकडे येणा-या मार्गावर एम्पायर इस्टेटच्या पुढे कार व मिनी बस यांच्या विचित्र अपघात झाला आहे. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास झाली.

एमपीसी न्यूज - ...अखेर कार बळीराजाच्या डोक्यावरचा कर्जाचा भार हलका झाला आहे. दीड लाखांपर्यंतचे कर्ज असणा-या शेतक-यांना सरसकट कर्जमाफ करण्यात आले आहे. राज्यातल्या शेतक-यांना एकूण 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यातील 90 टक्के शेतक-यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेअंतर्गत ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली.

एमपीसी न्यूज - सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दोघांची साडेतीन लाखांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना मे 2016 ते आजपर्यंतच्या कालावधीत घडली. याप्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गांवर वृक्षारोपण करण्याच्या कामाचा शुभारंभ

Page 2 of 447
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start