• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News


एमपीसी न्यूज - पुणे-सोलापूर महामार्गावर भैरोबानाला येथे गणेश मंदिराजवळ आज शुक्रवारी पहाटे तीन वाजता बीआरटी मार्गावरील दुभाजकावर मालट्रक चढला. या दुभाजकावर लाल दिवा नसल्यामुळे हा मालट्रक बीआरटी  दुभाजकावर चढला. मालट्रक या दुभाजकावरून बरेच अंतर घासत गेला. या मार्गावरील दुभाजकावर वाहनाचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजनेची मागणी होत आहे.

<


एमपीसी न्यूज - बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. के. एम. सुर्वे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.


एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात परशुरामीयन्स, बीईजी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

बीईजी येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सुभेदार नाईक प्रशिक्षक चंद्रशेखर पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली बीईजी संघाने आयफा स्काय हॉक्सचा 4-1 असा पराभव केला. बीईजी संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वरचष्मा राखला. 14 व्या मिनिटाला परमजित सिंगने दिलेल्या पासवर प्रेमानंदा सिंगने गोल करून संघाचे खाते उघडले. 35 व्या मिनिटाला आयफा संघाचे खेळाडू गाफील असताना रिठा अॅनलने दिलेल्या पासवर चोंगाने संधी साधत गोल नोंदवून संघाची आघाडी 2-0 ने वाढविली. त्यांनतर आयफा संघाच्या ईशान शर्मा, सुरज कदम यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. पूर्वार्ध संपण्यास तीनच मिनिटे शिल्लक असताना बीईजीच्या रिठा अॅनलने सोलो गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात दोन्ही संघानी आक्रमक पवित्र स्वीकारला. 69 व्या मिनिटाला जोरावर सिंगच्या पासवर भगवान दासने सुरेख चाल रचत आयफा संघाच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले आणि संधीचे गोलात रूपांतर करून संघाला 4-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. आघाडी घेण्यास आयफा संघाने जोरदार चढाया केल्या, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भक्कम राहिला. अखेर सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना आयफा स्काय हॉक्सच्या राहुल कड याने एकमेव गोल केला.<


एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना गुरुवार (22 जून) रोजी सहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी गावात घडली.

अंकुश शंकर जगताप (वय-37, रा. शेवाळेवाडी, फुरसुंगी, हडपसर, पुणे), असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी फयताचे साडू अजय मोरे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंकुश जगताप हे दुचाकीने जात असताना अज्ञात ट्रक चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. पोलीस उप निरीक्षक माणिक डोके अधिक तपास करीत आहेत.


आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे शहर पोलीस अमलीपदार्थ विरोधी पथक, सायबेज आशा ट्रस्टचा उपक्रम


एमपीसी न्यूज - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व पतंजली योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक डॉ. गिरीश आफळे व पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी वसंत पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

<


एमपीसी न्यूज - प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील घरे पाडण्यास 'घरे वाचवा संघर्ष' समितीने ठाम विरोध केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्न सुटण्यासाठीही आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

घरे वाचवा संघर्ष समितीची गुरुवारी (दि.22) रात्री वाल्हेकरवाडी येथील बीआरटीएस रस्त्यावर बैठक झाली. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करूणा चिंचवडे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, अनंत को-हाळे, श्याम वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते रणजित औटी, काशिनाथ नखाते, संदीप चिंचवडे, अमृत प-हाड, बाळासाहेब वाल्हेकर, आबा सोनवणे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे तसेच चिंचवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.

प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील आरक्षणामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहे. याला घरे वाचवा संघर्ष समितीने ठाम विरोध केला आहे. एचसीएमटीआर रस्त्यावरील थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी येथील आरक्षणे हटविण्याचा ठराव एकमाताने या बैठकीत केला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा जटील प्रश्न सोडविण्याचा ठराव पारीत करण्यात आला आहे.<


एमपीसी न्यूज - बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकाने मित्रावरच कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 22 जून रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रोड हडपसर येथे घडली.

ओंकार कुंभार, अजित वायकुळे आणि अथर्व दालभाडे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी किरण दिवटे, गोट्या पांढरे, सोमनाथ चव्हाण व अन्य एकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजित वायकुळे (वय-18, रा.हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र आहेत. यातील ओंकार कुंभार याचे किरण लवटे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे रागातून चिडून जाऊन आरोपींनी वर नमूद केलेल्यांना कोयत्याने मारहाण करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस उप निरीक्षक आर.पी.बागूल अधिक तपास करीत आहेत.


एमपीसी न्यूज - जागतिक योग दिनानिमित्त चिंचवड स्टेशन उद्योगनगर येथील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यात 200 हुन अधिक रहिवाशी नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी संजना गारगोटे यांनी योगासनाचे विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. देवीदास कुलथे, राजेंद्र केंदे यांनी सहकार्य केले. अनुपमा प्रभुणे व सरनोबत यांनी उपस्थितांना योगासनांचे फायदे व योग करण्याची शास्त्रोक्त पद्धत याबद्दल मार्गदर्शन केले. सुजित पाटील व शिरीष पोरेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

योग दिनाचे औचित्य साधून नुकतेच हिमालयात यशस्वी ट्रेकिंग केल्याबद्दल सोसायटीमधील संस्कार सोशल फाऊंडेशनचे बाळकृष्ण खंडागळे, महानगरपालिकेचे अभियंता शिरीष पोरेड्डी, रवींद्र सोनावणे, तुषार देशपांडे, सुरेश गारगोटे, सचिन देशमुख, राजेश कर्णावट, आत्माराम गोरे, विजेंद्र बन्सल, शिवासर्वानन शेषाद्री, शिवप्रसाद ढाकणे, मंगेश कोल्हे या गिर्यारोहकांचा  सन्मान करण्यात आला. ट्रेकिंग ग्रुपतर्फे 100 गरीब व अनाथ मुलांसाठी वह्या व पेन यतिश भट यांच्याकडे देण्यात आले. तसेच 600 किमी अखंड सायकलिंग करणे पोहणे व धावणे यात विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल विश्वकांत उपाध्याय यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप पसायदान घेऊन करण्यात आला. डॉ. राजीव पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. सदानंद बोगमी यांनी सूत्रसंचालन केले. योग गुरु कै. हेमलता लड्ढा यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.


एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने लोणवळा व खंडाळा परिसरात 400 झाडांची लागवड करण्यात आली आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खंडाळा पोलीस चौकी शेजारील मोकळ्या जागेत वृक्षारोपन करण्यात आले.


या अभियानात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांच्यासह लोणावळा शहर व खंडाळा चौकीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

Page 3 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start