• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News


एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची पाईपलाईन फुटली आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मैलापाणी वाहत आहे.  यामुळे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सकाळ व संध्याकाळी वर्दळीच्या काळात या चौकात वाहतूक कोंडी होते.

या रस्त्यावरील ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या दुरस्तीकडे नागरिकांनी वारंवार सांगूनही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रभागातील सर्व समस्या सोडवणार असल्याचे अनेक जाहीर भाषणांमध्ये सांगितले होते. परंतू आता दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यातून मार्ग काढत लोकांना जावे लागत आहे. याविषयी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी याप्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. या प्रभागात 4 नगरसेवक आहेत. परिसरातील स्थानिक नागरिकांनी याविषयी नगरसेवकांना वेळोवेळी सांगितल्यानंतरही हा प्रश्न अजून सुटला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच भागात शाळा असल्याने लहान मुलांना ड्रेनेज लाईनच्या वाहणाऱ्या घाण पाण्यातून जावे लागत आहे.


एमपीसी न्यूज - रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स दुकानात तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून 64 हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री साडे अकरा वाजता घडली.

प्रदीप मेहता (वय 48 रा, रहाटणी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात तीन अज्ञात इसमांनी दुकानात प्रवेश करत मेहता यांचे तोंड बंद केले व चाकूचा धाक दाखवत दुकानातील दागिने व रोख रक्कम, कागदपत्रे, बॅग असा एकूण 64 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


एमपीसी न्यूज - मुजोर रिक्षा चालकांमुळे पिंपरी चौकात सतत वाहतूक कोंडी होते. याविषयी नागरिकांनी प्रशासनाकडे ब-याच वेळा तक्रारीही केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.


या कारवाईमध्ये पोलिसांनी चौकात नियमांचे उल्लंघन करत भर रस्त्यात लावलेल्या 3 रिक्षांना व 3 कारला जॅमर लावले आहे. यावेळी चालकांकडून 1 हजार 200 रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.<


एमपीसी न्यूज - शहराच्या पूर्वभागासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पूर्व भागातील असमान पाणी पुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. ‘भामा-आसखेड योजने’ला आता राज्य सरकारने निधी देण्यास मंजुरी दिली आहे. आता केंद्राकडून अपेक्षित असलेल्या निधीपैकी 80 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज - मावळातील आंबी येथील वारकरी संप्रदायातील व शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि हभप गोरखनाथ घोजगे यांच्या मातोश्री श्रीमती सोनाबाई शंकरराव घोजगे (वय 86) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

एमपीसी न्यूज - नवीन बांधकांमांना परवानगी न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. त्यासोबतच भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचेही निर्देश देण्यात मंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे.


एमपीसी न्यूज - कर्जरोखे नंतर आता नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट बोट घेऊन पुणे महापालिकेत प्रवेश करत अनोखे आंदोलन केले. तसेच ऐन पावसाळ्यात नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांवर बोटीने प्रवास करायची वेळ आली आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.


नाले सफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. याची महापौर टिळकांकडून तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आदेश देऊनही योग्य त्या प्रकारे नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या होत्या. यावर अधिका-यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले होते. तसेच महापौर टिळकांनी स्वतः देखील नाले सफाईच्या कामावर नाराजी दर्शविली होती. एवढ्या घडामोडी नंतर अद्यापही नाले सफाईचा प्रश्न न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज या विरोधात आक्रमक होऊन अनोखे बोट आंदोलन केले.<


एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेविरोधात आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या घरापासून ते महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start