• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणा-या  पवना धरण परिसरात 1 जून पासून 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानुसार सध्या धरणात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पवना धरणाला त्याची तहान भागवण्यासाठी अद्याप मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.

पवना धरण परिसरात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 6 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार 1 जून ते 23 जून या 22 दिवसाच्या कालावधीत धरण परिसरात 100 मिली पावसाची नोंद झाली आहे. मात्र हा पाऊस धरणाची तहान भागवणारा नसल्याने  धरणात सध्या 20.75 टक्के म्हणजे 1.77 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी किमान 1हजार 800 ते 1 हजार 900 मिमी पावसाची आवश्यकता आहे.

<

 
(स्मिता जोशी)
 


केंद्र सरकारकडून 'स्मार्ट सिटी'ची तिसरी यादी जाहीर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या बहूचर्चित स्मार्ट सिटी या योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा तिस-या यादीत समावेश झाला आहे. या यादीमध्ये एकूण 30 शहरांची नावे जाहीर करण्यात आली. केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीची तिसरी यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.


एमपीसी न्यूज - औंध लष्कर परिसरात आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.संबंधीत महिलेने 19 जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र काल (दि.22) सकाळी 11 वाजून 50 मिनीटांनी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

स्वाती अमोल जगदाळे (वय.27 रा, औंध लष्करी वसाहत) असे मयत महिलेचे नाव आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांना लेनची शिस्त लावण्यासाठी व अपघात तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीच्या वतीने फेक्झिबल हाईट बॅरिअर लावण्यात येणार आहेत. हे बॅरिअर  किमी ३३ ते ५२ दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या मार्गावर खालापूर टोलनाका ते लोणावळ्यातील तुंगार्लि गावच्या हद्दीत पर्यंत बसविण्यात येणार अाहेत.

या संकल्पनेचे उदघाटन महामार्गाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते करण्यात आले आहे. यावेळी रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत औटी, श्री. पत्की आयआरबीचे कर्नल जोशवा, रायगड विभागाचे महामार्ग पोलीस अधिक्षक विजय पाटील, पुणे विभागाचे महामार्गाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, महामार्गाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली अंबुरे, पोलीस निरीक्षक डी. जी. गाढवे यांच्यासह पळस्पे, बोरघाट (दस्तुरी), खंडाळा व वडगाव महामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील स्वर्गिय मोहम्म्द रफी फॅन्स क्लबच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भास्कर  भेगडे पाटील यांची सलग तिस-यांदा  फेरनिवड करण्यात आली आहे.


एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी भाजपने महापालिकेच्या खर्चाने तब्बल 150 अधिकारी व खाते प्रमुखांना नेले, असा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे. तसेच यामुळे नागरिकांच्या कामे रखडली गेली याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


एमपीसी न्यूज -  नवी दिल्ली तसेच राज्यभरात जबरी चोरी, खंडणी मागणे, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या सात जणांच्या टोळीला तळेगाव पोलिसांनी आज (गुरुवारी) पहाटे दोनच्या सुमारास अटक केली आहे.

अविनाश अरुण खंडागळे (वय. 22), कैलास लक्ष्मण चांदणे (वय 23), संतोष सुंदर घुणे (वय 23), संदीप कचरू भालेराव (वय 27), सचिन रतन कांबळे (वय 20), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलीक (वय 25), प्रदीप ज्ञानेश्वर मंडलीक (वय 22), सर्व रा. ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) सर्वांवर संवेदनशील खून, अपहरणासह दरोडा व खंडणी, बलात्कार, असे गंभीर गुन्हे दाखल  असल्याचे उघड झाले आहे.


एमपीसी न्यूज- चिंचवड येथील दळवीनगर परिसरात जुन्या वादातून झालेल्या टोळक्यांच्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना काल (दि. 21) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

Page 5 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start