• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News

एमपीसी न्यूज - तळेगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या वैद्यकीय, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत त्यांना तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. के.एच. संचेती व अरुण फिरोदिया, अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


डॉ. भंडारी यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य, समाजसेवा या क्षेत्रात भरीव काम केले आहे. समाजातील वंचित घटकांसाठीही  त्यांनी नि:स्वार्थी भावनेने योगदान दिले आहे. पाचाणे येथील शांताबाई येवले मुलींचे वसतीगृह या सेवाभावी संस्थेस ते प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करतात. माजी नगरसेविका (कै.) डॉ. विजया शाळीग्राम भंडारी&

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी 1 हजार 608 मतदान केंद्रावर आज मतदान झाले. मात्र, ज्या मतदारांनी यापूर्वी दोन-तीन वेळाच मतदान केले आहे, अशा मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्याने मतदारांना मतदानच करता आले नाही, अशा तक्रारी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागातून दिवसभर येत होत्या.


एमपीसी न्यूज - शिवसेनेचे वडगाव शेरी येथील नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत आचारसंहितेचे व्हिडिओ शुटिंग करणा-या एकाला मारहाण करत कॅमेरा फोडल्याची घटना घडली. ही घटना काल सोमवारी रात्री अकराच्या सुमारास गणेश नगर चौक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

<

एमपीसी न्यूज - लंडनहून गिफ्ट पाठवितो असे सांगून ऑनलाईन खात्यावर पैसे टाकायला लावून एका महिलेची चार लाखाची फसवणूक केली. हा प्रकार 17 ते 27 सप्टेंबर दरम्यान घडला.


<

एमपीसी न्यूज - मोठ्या आवाजात बोलू नका, असे सांगितल्याने दहा जणांच्या टोळक्याने तिघांना घरात घुसून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.19) रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवड, उद्योगनगर येथे घडली.


<

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करताना होणारा गोंधळ, बूथवर कार्यकर्त्यांमध्ये होणारी बाचाबाची, बोगस मतदान, वृद्ध नागरिकांचा मतदान करतानाचा उत्साह आणि नव मतदारांमधील प्रथमच मतदान करतानाचा आनंद अशा वातावरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. 774 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सगळ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.


एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 24, 24, 26 मधील थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, विशाल नगर, ताथवडे, पुनावळे, कस्पटे वस्ती परिसरात दुपारी दोनपर्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. सकाळी दहानंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतल्याने सर्वच केंद्रावर रांगा दिसत होत्या. काही किरकोळ अपवाद वगळता दुपारपर्यंत सुमारे 33 टक्के मतदान झाले होते.


एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहूल भोसले आणि भाजपचे उमेदवार राजेश पिल्ले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे. ही घटना आज (मंगळवारी) पाचच्या सुमारास नेहरुनगर येथील क्रांती चौकात घडली.


<

एमपीसी न्यूज - सकाळपासूनच उत्साहात सुरु असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला अनुचित प्रकारांनी गालबोट लागले. पिंपरीमध्ये  भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भांडण झाल्यामुळे परिसारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे तीस टक्के मतदान झाले आहे. मात्र मतदानाची वेळ साडेपाच वाजता संपल्यामुळे मतदान केंद्रात प्रवेश झालेल्या मतदारांना मतदान करता येणार असून मतदान केंद्राच्या बाहेरही अनेक मतदारांची गर्दी झालेली आहे. हे मतदार केंद्रात प्रवेश करण्यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत.

 

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start