• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड, केएसबी चौक येथे बांधलेल्या पुलाच्या उजव्या बाजूकडील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवारी) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग  बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते तसेच शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, तसेच नगरसेविका मंगला कदम, गीता मंचरकर, वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, केशव घोळवे, तुषार हिंगे, सह आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.

पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड ठाणे, मुंबई, नागपूर, या महापालिका विभागाकडील सेवकांना लाड आणि पागे समितीच्या अहवाला प्रमाणे घाणभत्ता, धुलाई भत्ता, वारसहक्क लागू आहे. मात्र, याच हुद्द्याच्या पुणे महापालिकेतील सेवकांनावरील सवलतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत पुणे महानगरपालिका कामगार संघटनांनी 21 जूनपासून महापालिकेच्या मुख्य दरवाज्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या मागण्या मान्य करण्यासाठी महापालिकेने मुख्यसभा, स्थायी समिती यांनी ठराव मान्य केले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सुद्धा महापालिकेला त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महापालिकेतील वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे संपावर जाणे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. नदीपात्रातील जलपर्णी, शहरातील नालेसफाई यामुळे शहरात डेंग्यू , मलेरिया, चिकणगुण्या यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव उद्भवू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


एमपीसी न्यूज - ज्येष्ठत्व ही एक देणगी आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. दैनंदिन विवंचनेतून बाहेर पडून चांगले विचार ऐकले आणि एकमेकांच्या अनुभवातून समन्वय साधता आला तर ज्येष्ठत्व आनंददायी होते. उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवता आला पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार किसान महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.


संभाजीनगर चिंचवड येथे स्वा. सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ यांच्या सिद्धिविनायक मंदिर जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रवचनकार किसान महाराज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किसान महाराज चौधरी यांचे 'जेष्ठत्व - एक आनंदानुभव' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परबती वाडकर, दिलीप जाधव, प्रभाकर शेवते, शांताराम पवार या ज्येष्ठ नागरिकांनी अपेक्षित कार्याची माहिती देत, ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेमागची भूमिका सांगितली. प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, राजाभाऊ म्हस्के, संजय ढेंबरे, संजय ढमढेरे, अरविंद वाडकर आदी उपस्थित होते.


एमपीसी न्यूज - शहरातून जाणाऱ्या रिंग रस्ता प्रकल्पाच्या वित्तीय आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून  रिंग रस्त्यासाठी एकूण 19 हजार 239 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील 6 हजार 597 रुपये कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

<


एमपीसी न्यूज - भोसरी येथील समता समाज सेवा केंद्राच्या वतीने वेल्हा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी केळदचे केंद्रप्रमुख राजेंद्र अद्वेत, सरपंच येना शिंदे, पोलीस पाटील भाऊ राघू शिंदे व मुख्याध्यापक सत्यवान कदम, स्वस्तिक आवटे, काशीनाथ शिंदे, लक्ष्मण आदुले, सखाराम मटकर, अतुल पाटे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक लहू सुतार, वसंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश लोंढे म्हणाले, पर्यावरण व आरोग्याबाबत समाजातील सर्व घटकांनी जागरूक राहून, पुढील पिढीने निरोगी आरोग्य व मानसिक ताण तणावमुक्त जीवन जगावे.


बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सव - कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सन्मान

एमपीसी न्यूज - बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी देण्यात येणारा विशेष बालगंधर्व परिवार पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आणि सरोदवादक गिरीश चरवड यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि. 25) बालगंधर्व कलादालनात सकाळी 11.00 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सुलेखनकार मनोहर देसाई आणि शिल्पकार प्रशांत गायकवाड यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी सरोदवादन, कॅलिग्राफी आणि शिल्प याची लाईव्ह जुगलबंदी पुरस्कार समारंभापूर्वी होणार असून शिल्पकार प्रशांत गायकवाड बालगंधर्वांचे स्त्री रुपातील शिल्प साकारणार आहेत. गणेश पापळ (पखवाज), रवी शर्मा (तबला) साथसंगत करणार आहेत. भारतीय पारंपरिक शैलीचे कोरीव काम थर्माकोल या माध्यमातून जतन करणे, महाराष्ट्र पोलिसांकरिता गुन्हेगारांची रेखाचित्रे विनामोबदला काढून विविध गुन्हयांच्या तपासकामी पोलिसांना मदत करणे याबरोबर चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण या मधील योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
<

सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात एका सिमेंट मिक्सरची पुढे जाणा-या ट्रकला धडक बसली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार म्हसवडे यांनी एमपीसी न्यूजला माहिती देताना म्हटले की, हा मिक्सर हिंजवडीवरून नाशिक फाट्याकडे जात असताना गाडीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा मिक्सर समोर जाणा-या ट्रकला धडकला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून मिक्सरचे मात्र नुकसान झाले आहे. या सिमेंट मिक्सर गाडीचा क्रमांक एम.एच.06 एक्यू 504 असा आहे. क्रेनच्या सहाय्याने गाडीला रस्त्याच्या बाजूला काढले असून वाहतूक सुरळीत आहे, असेही म्हसवडे यांनी सांगितले.


एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे युवा मंचच्या वतीने चिखली आणि कुदळवाडी परिसरात पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.


चिखली आणि कुदळवाडी परिसरातील सर्व पदवीधरांनी या मोहिमेत सहभागी होऊन पदवीधर मतदार बना, असे आवाहन मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी केले आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड किंवा वाहन परवाना ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

चिखली व कुदळवाडी परिसरातील पदवीधर तरुण-तरुणींनी कुदळवाडीतील श्री शिवसाई नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात कागदपत्रे जमा करून पदवीधर मतदार नोंदणी करावी, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे. अधिक माहितीसीठी 9881245572 या क्रमांकावर संपर्क साधावा.


एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील दुचाकीने पादचारी दाम्पत्याला धडक मारल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहे. ही घटना रविवार (18 जून) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कात्रज ते न-हे बायपास रोडवर घडली.

<

Page 7 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start