• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News

तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संस्थांना अनुदान दिल्याचे उघड झाले आहे. राजकीय नेत्यांच्या एकाच संस्थेला वर्षानुवर्षे अनुदान कसे दिले? याची चौकशी करावी. ऑडिट रिपोर्ट न देणा-या संबंधित संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विलास मडेगिरी यांनी केली. त्यावर महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनास खुलासा करण्यास सांगितले. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. 

<

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गुनसान शहर, दक्षिण कोरिया यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गुनसान महापालिका तसेच गुनसान शहरामधील कारखानदार यांनी बुधवारी (दि.21) महापालिकेस भेट देवून शहरातील चालु प्रकल्पांची माहिती घेतली.

महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दक्षिण कोरियामधील कारखानदार को मिनसंग, ली सिक, अभिषेक श्रीवास्तव यांचे पुष्प गुच्छ व शाल देवून स्वागत केले.

एमपीसी न्यूज - डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा संकलीत करण्याचा ठेका दिलेल्या 'बीव्हीजी' कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी, भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे आणि नगरसेविका कमल घोलप यांनी पालिकेकडे केली आहे. 

एमपीसी न्यूज - सकाळचे सहयोगी संपादक, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांचे वडील माधवराव धर्माजी चिलेकर (वय 73) यांचे आज सकाळी दिर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

एमपीसी न्यूज - शहरात 24 तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या कर्जरोख्यांची आज सकाळी 9 वाजता मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. भव्य कार्यक्रमाचे आयोजन मुंबई शेअर बाजारात करण्यात आले आहे. 2007 नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले आहे.

एमपीसी न्यूज - नवी सांगवी येथील गणेश नगर परिसरातील श्रीकल्प बिल्डिंगच्या पार्किंग मधील 4 दुचाकी माथेफिरुने जाळल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. 21जून) पहाटे 3 वाजता घडली. 


एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मरकळ येथील त्रिवेणी आश्रमातून एका अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे, याप्रकरणी संजीव मोहन रावते (वय 45 वर्ष, रा.त्रिवेणी आश्रम, मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर लोणावळ्यातून आळंदी येथे लग्नास आलेली 47 वर्षीय व्यक्ती मंगल कार्यालयातून बेपत्ता आहे. या प्रकरणी प्रकाश माणिक हजारे (वय 40 वर्ष, रा. लोणावळा) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

<

Page 9 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start