• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News


एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सभागृहातील विरोधी पक्षाला कार्यालय देण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

<


एमपीसी न्यूज - जागतिक योग दिन लोणावळा परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


एमपीसी न्यूज - लग्न करण्याचे आणि परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने एका महिलेची 7 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका 29 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2013 ते जून 2017 या कालावधीत घडली.


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सात कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.


एमपीसी न्यूज - शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच निरोगी जीवन व उत्साही मन ठेवण्यासाठी नियमित योगासने करणे जरुरी आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जागतिक योग दिनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


एमपीसी न्यूज - योगाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती देखील वाढते. याकरिता दिवसातील थोडा वेळ तरी योगा करावा, असे मत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी व्यक्त केले.

<


एमपीसी न्यूज - विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातील वारकरी पायी पंढरपूरला जातो. त्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडच्या 25 सायकलवीरांची सायकल वारीही पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेली होती. या सायकलवीरांनी दोन दिवसात 235 किमीचा प्रवास करत पंढरपूर गाठले.


एमपीसी न्यूज - रस्ते, पदपथावर बेकायदेशीर अतिक्रमण करत आपले बस्तान बसविणार्‍या अनधिकृत पथारी व्यावसायिकांना जरब बसविण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रक्कमेची पुनर्रचना करून त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला त्याला आज मंजुरी देण्यात आली.


शहरातील सर्व रस्ते, पदपथ आणि प्रमुख चौकांना अतिक्रमणांचा फास पडला आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे सध्या शहरातील चारही परिमंडळांमध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे. या कारवाईसाठी प्रत्येक परिमंडळाला दररोज 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र, अनधिकृत पथारी व्यावसायिकांकडून वसूल केल्या जाणार्‍या 500 रुपये दंडामुळे हा खर्च भरून निघत नाही. तसेच अनेक पथारी व्यावसायिक 500 रुपयाचा दंड भरून पुन्हा दुसर्‍या दिवशी पदपथावर आपली दुकाने थाटतात. त्यामुळे अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कारवाईसाठी येणारा खर्च पूर्णपणे वसूल करण्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ करून ती 5000 करण्याचा फेर प्रस्ताव अतिक्रमण विभागाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाडीला 5 हजारांचा दंडखाद्यपदार्थांच्या गाडीला सध्या पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. तो वाढवून पाच हजार रुपये करण्यात यावा, असे या प्रस्तावात सुचवले आहे. याशिवाय बांधकाम पाडण्याच्या शुल्कातही भरघोस वाढ केली आहे. तसेच कच्चे आणि पक्के बांधकाम काढण्यासाठी दहा पट शुल्क वाढवण्यात यावा, असे स्थायी समितीसमोर प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.<


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्याला दिलेली सरकारी मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे आपण खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली असून स्वत: नवीन मोटार मागणार नाही. प्रशासनाला वाटल्यास त्यांनी नवीन मोटार खरेदी करून द्यावी, असे महापौर नितीन काळजे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसचे प्रशासनाने दिल्यास नवीन मोटार वापरणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील पदाधिका-यांना पालिकेची मोटार दिली जाते. महापौर नितीन काळजे यांनी पालिकेची सरकारी मोटार आहे. सोमवारी (दि.19) दिघी येथील महापौर काळजे गेले होते. कार्यक्रम संपवून ते पालिकेत येत असताना अचानक त्यांची मोटारमध्येच बंद पडली. त्यामुळे महापौर काळजे पालिकेत येऊ शकले नव्हते. आपल्या मोटारीची वारंवार दुरुस्ती करण्यात आली आहे. मोटार सारखीच नादुरुस्त होत आहे. याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा सांगूनही मोटार व्यवस्थित दुरुस्त केली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

मोटार नादुरुस्त असल्यामुळे महापौर काळजे यांनी पालिकेची मोटार वापरण्यास बंद केले असून खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,  महापालिकेने आपल्याला दिलेली सरकारी मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे आपण खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली असून स्वत: नवीन मोटार मागणार नाही. प्रशासनाला वाटल्यास त्यांनी नवीन मोटार खरेदी करून द्यावी.
<

Page 10 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start