• Bhausaheb_Bhoir.jpg
  • DPU1250x200.jpg
  • Mahesh_Landge.jpg
  • mpc.jpg
  • MPC_news.JPG
  • Nitin_Kalje.jpg
  • PCCO.jpg
  • Sunil_Shelke.jpg
23 Jul 2017

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)तील एका छात्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अलेख जैसवाल, असे आत्महत्या केलेल्या छात्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेख हा एनडीएच्या पाचव्या टर्मचा विद्यार्थी होता. रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वसतिगृहाच्या एच स्क्वाड्रनच्या खोलीमध्ये त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच एनडीएतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची माहिती स्थानिक पोलिस आणि त्याच्या नातेवाईकांना देखील दिली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला कामावर घेऊन जातो, असे सांगून तिचे अपहरण केल्या प्रकरणी एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अशोक श्रीपाल (वय 22, तेंदुखेडा, मध्यप्रदेश), असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना विश्रांतवाडी येथील मजूर अड्ड्यावर 19 जुलैला घडली.

कामावर घेऊन जातो, असे सांगून आरोपीने 14 वर्षीय मुलीला घेऊन गेला. त्याच्यासोबत आणखी एक मुकेश श्रीपाल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याने त्यांना कोठडी मिळावी तसेच मुलीचा शोध घेण्यासाठी आरोपीची चौकशी करणे, त्याच्या साथीदारास पकडण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपीला कोठडी सुनावली आहे.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या ट्रकची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.22) रात्री पावणे दोनच्या सुमारास वाकड हिंजवडी रोडवर मातोश्री कार एक्सेसरीज समोर घडला. याप्रकरणी ट्रक चालकाला हिंडवडी पोलिसांनी अटक केली आहे.

नागेश शिवाजी जोशी (वय-25 रा. वर्धमान ध्रुव अपार्टमेंट, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश दौलप्पा कनवळे (वय-35, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश पेडगांवकर (वय-34, रा. थेरगांव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उमेश पेडगांवकर यांचे म्हेवणे नागेश हा त्याच्या दुचीकीवरुन जात होते. त्यावेळी कनवळे हा त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात घेऊन जात होता. त्याच्या ट्रकची धडक नागेशच्या दुचाकीला  बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - चोरून केबल वापरतो म्हणून भाडेकरुला लाकडी दांडक्‍याने मारहाण केल्याप्रकरणी पित्यासहीत दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले.  तिघांना एक वर्षाची साधी कैद आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. तो दंड फिर्यादी यांना देण्याबाबत आदेश न्यायाधीश व्ही. पी. फडणीस यांनी दिला आहे.

नरेंद्र बहादूर चव्हाण (वय-40) तसेच, त्याचे दोन मुले अनुग्रह चव्हाण (वय-23) आणि अंकुश (वय-22, सर्व रा. सुदर्शनगर, चिखली) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी लक्ष्मण रजपूत यांनी फिर्याद दिली होती.

रजपूत हे चव्हाण यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होते. रजपूत हे चोरून केबल वापराच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद झाला. 3 जानेवारी 2015 ला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राग मनात धरून वरील तिघेजण रजपूत यांच्या खोलीत शिरले. 'तु आमची खोली रिकामी कर', असे म्हणून मारहाण करण्यास सुरूवात केली. या भांडणात फिर्यादी यांची पत्नी मध्ये आली असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच, फिर्यादी रजपूत यांच्या डोक्‍यात कपडे धुण्याची लाकडी बॅट मारली. तिघांनी घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले.

दरम्यान, या प्रकरणी पिंपरी न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी 1 वर्षे साधी कैद आणि एक हजार दंड तसेच, दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सहायक सरकारी अभियोक्ता भूषण पाटील यांनी साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. शेरे, के. एस. शेळके, आर. व्ही. मते यांनी तपास केला.

22 Jul 2017

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून काचेच्या तुकड्याने पत्नीच्या छाती व गळ्यावर वार करून नंतर स्वतःच्या हातावर काचेने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मनिषा हरीष चुगल (वय 24), असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. हरिष चुगल (वय 26, रा. पाटील वस्ती बालेवाडी), असे पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा व हरिष यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. हरिष हा मनिषा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. गुरुवारी रात्री हरिष घरी आल्यानंतर त्याने इतका वेळ कोठे गेली होती, असे म्हणत मनिषाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचे आई-वडील बाहेर आले व हरिष याला शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. हरिषने त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच, घरातील तुटलेल्या काचेने मनिषा हिच्या गळ्यावर व छातीवर वार केले. त्यानंतर स्वतःहाच्या हातावरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चतुःश्रृंगी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरिष याच्यावर औंध येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक फड करत आहेत.

22 Jul 2017

कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - औद्योगिक कंपनीत काम करत असताना 18 दिवसांपूर्वी डाय मशिनचा लोखंडी भाग हातावर पडल्याने तरुणीच्या दोन्ही हाताची चार बोटे तुटली आहेत. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जुलै रोजी तळवडे, सोनवणे वस्ती येथील एका कंपनीत ही घटना घडली.

कंपनीचे मालक श्रीकांत कारोलय, सुपरवायझर एजाज शेख आणि मशिन ऑपरेटर अरुण रॉय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मसरीन नंदा दमायी (वय 17, रा. चिखली, मूळगाव पश्चिम बंगाल) हिने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मसरीन ही चिखली येथील एका औद्योगिक कंपनीत नोकरी करत होती. तिला प्रेस मशिनवर काम करण्याचा अनुभव नव्हता. तरीही, सुपरवायझर एजाज शेख याने कंपनीचे मालक श्रीकांत कारोलय यांच्या सांगण्यावरून मसरीनला 3 जुलै रोजी प्रेस मशिनवर काम करायला लावले. मसरीन प्रेस मशिनवर तयार झालेला जॉब काढत होती. त्यावेळी मसरिन जॉब काढत असल्याचे माहित असतानाही मशिन ऑपरेटर अरुण रॉय याने प्रेस मशिनचा पॅडल हयगयीने मारला. त्यामुळे मशिनचा लोखंडी भाग मसरिनच्या हातावर आदळल्याने तिच्या दोन्ही हाताची चार बोटे तुटली आहेत, असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी ठाण्याचे फौजदार एस. वाय. होळकर तपास करत आहेत.

22 Jul 2017

एमपीसी न्यूज - भाजी विक्रेत्याच्या डोक्यात विनाकारण एकाने वजन काटा मारला. ही घटना शुक्रवारी (दि.21) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भोंडवे वस्ती, रावेत येथील बीआरटी रोडवर घडली.

याप्रकरणी शशिकांत तुपे (रा. तुपे वस्ती, रावेत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुणवंत भागवत पाटोळे (वय 44, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाटोळे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी भोंडवे वस्ती येथील बीआरटीरोडवर भाजीपाला व मक्यांची कणसे विक्री करत होते. त्यावेळी आरोपी शशिकांत तिथे आले. त्याने दुकानातील वजन काटा घेतला आणि विनाकारण पाटोळे यांच्या डोक्यात मारला, असे पोलिसांनी सांगितले.

देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

22 Jul 2017

एमपीसी न्यूज - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. शुक्रवारी रात्री परिमंडळ तीनच्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 200 गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

गणेशोत्सव महिनाभरावर आला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडवा आणि शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये 200 गुन्हेगारांची आणि त्यांच्या घरांची कसून तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

परिमंडळ तीनमधील पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी, निगडी, वाकड, सांगवी, हिंजवडी आणि चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, चतु:श्रुंगी विभागाचे विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी आपल्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

22 Jul 2017

एमपीसी न्यूज- पेट्रोल देण्याच्या 'मापात पाप' करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी देशातील अनेक पेट्रोल पंपावर छापा टाकून पोलिसांनी सदरचे पेट्रोलपंप सील केले आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील एका पेट्रोलपंपावर आढळून येत असल्याच्या संशयावरून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील चंदनगरच्या पेट्रोलपंपावर आज दुपारी  छापा टाकला आहे.  तपासणीत मीटर मध्ये गडबड केल्याचे समोर आल्यानंतर पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. यापुढे देखील पुण्यातील काही पंपावर कारवाई करन्याय येणार आहे.

ठाण्यातील मानपाडा येथील एका पेट्रोल पंपावरच्या मशीनमध्ये छेडछाड करत फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर छापे टाकले. पेट्रोल पंप मशीनमध्ये छेडछाड केल्याचे उघडकीस आले होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पंधरा पथके राज्यातील पेट्रोल पंपावर धाड सत्र सुरु केले होते.

पोलिसांनी अटक केलेल्या अनिल सोनवणे याने पुण्यातील काही पंपावरील मीटरमध्ये पल्सर टॅम्परींग (चीप) बसविल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून ठाणे गुन्हे शाखा, वैद्यमापन विभाग, टेक्नीशियन व स्थानिक पोलिसांच्या मदतीने चंदननगर येथील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपाच्या मशीनची  तपासणी केली. यामध्ये चीप बसवून मीटरमध्ये छेडछाड केल्याचे चौकशी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे हा पंप सील करण्यात आला आहे.

22 Jul 2017

एमपीसी न्यूज - सात ते आठ जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून कोयत्याने  एका तरुणावर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरुणाने नेम हुकवून तेथून पळ काढला. त्यानंतर टोळक्याने आराडा-ओरडा करत परिसरातील वाहनांची, घरांची तोडफोड करून दशहत माजविली. ही घटना शुक्रवारी (दि.21) रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगावातील कैलासनगर येथे घडली.

याप्रकरणी अजय भोसले, अतुल थोरात (दोघे रा. थेरगाव) यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल बाबर (वय 23, रा. थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विशाल आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून भांडणे आहेत. किरकोळ कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. भांडणाच्या रागातून आरोपी शुक्रवारी रात्री आराडा-ओरडा करत हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन तिथे आले. फिर्यादी विशाल याला शिवीगाळ करत दमदाटी केली.

आरोपी अजय भोसले याने त्याच्या हातातील कोयत्याने विशाल याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विशालने नेम हुकवून आणि तो पळून गेला. त्यानंतर आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये टेम्पो, स्कॉर्पिओ कार, इंडिका कार आणि तीन दुचाकींचा तोडफोड केली. तसेच घरांचे दरवाजे, काचांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभित झाले होते. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Todfod 1

Todfod 2

  

Advt

Ajit

21 Jul 2017


एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी 33 वर्षीय तरुणाला पिंपरी न्यायालयाने गुरूवारी (दि. 20) एका वर्षाची साधी कैद शिक्षा ठोठावली आहे. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. फडणीस यांनी हा आदेश दिला.

तीन वर्षापूर्वी आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला होता. गौरव गिरीश आननपारा (वय 33, रा. तळेगाव-चाकण रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. देहूरोड येथे राहणाऱ्या संबंधित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित तरुणी रेल्वेने आकुर्डी कामानिमित्त येत असत. दरम्यान, त्या रेल्वेत असणाऱ्या आननपारा याने तिचा पाठलाग करून छेडछाड केली.

काही दिवस तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर आननपारा याने तरुणीचा एक दिवस हात पकडून विनयभंग केला. तरुणीने हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडला असल्याने आरोपीला दोषी ठरवून एका वर्षाची साधी कैद आणि एक हजार रुपये दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने कैद शिक्षा सुनावली आहे. सहाय्यक अभियोक्ता भूषण पाटील आणि शैलेंद्र बागडे यांनी साक्षीदार तपासले. सहाय्यक निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. शेरे आणि के. एस. शेळके, आर. व्ही. मते यांनी तपास केला.

21 Jul 2017

एमपीसी न्यूज - बाणेर येथे मसाज पार्लरच्या नावाखाली चालणा-या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. कारवाईत एका मुलीची सुटका केली असून मसाज पार्लरची मालक महिला व तिच्या पतीला अटक केली आहे.

मोहिनी अर्जून दोडके (27, बाणेर) व अर्जून शिवदास दोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे बाणेर येथील शिवनेरी कॉलनी परिसरातील फ्लॉट क्रमांक 5 मध्ये हेअर अ‍ॅण्ड स्पा युनिसेक्स मसाज सेंटर आहे. येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पडताळणी करून छापा टाकला. त्यावेळी तेथील एका सज्ञान मुलीची पोलिसांनी सुटका केली. तर मसाज सेंटरची मालक महिला मोहिनी दोडके व तिचा पती अर्जून दोडके यांना अटक केली. त्यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, राजेश उंबरे, राजेंद्र कचरे, गितांजली जाधव, सरस्वती कागणे, सचिन शिंदे, तसेच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) वैशाली गलांडे यांच्या पथकाने केली.

21 Jul 2017

एमपीसी न्यूज - हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या 33 वर्षीय युवतीवर दोन दिवसांपूर्वी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. ती तरुणी आज (शुक्रवारी) रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला.

पीडित तरुणी चार वाजता दुचाकीवरून कंपनीतून घरी निघाली होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने ती रस्त्याच्या बाजूला रेनकोट घालण्यासाठी थांबली. मात्र, तेवढ्यात दोन अज्ञात इसमांनी तिला धरून टेम्पोमध्ये टाकले व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसपास येणा-या जाणा-यांच्या संशयित पाहण्याने ते दोघे घाबरले. त्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान तरुणीने तिच्या मोबाईलवरील फेवरेट या अॅपवरुन तिच्या मित्रांशी संपर्क साधला व त्यांना हकीकत सांगितली. ही तरुणी मूळची तामिळनाडूची असून ती हिंजवडी आयटीपार्कमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होती.

याविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, टेम्पोतून आलेल्या युवकांनी तिच्या अपहरणाचा प्रयत्न करत विनयभंग केला. या प्रकाराने भेदरलेली युवती काही वेळाने घरी गेली. त्यानंतर आज रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चांदे नांदे गावातील ही घटना असून, पीडितेचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला आहे. मात्र, घटना ग्रामीणच्या हद्दीत घडली असल्याने ग्रामीण पोलीस व आम्ही दोघे या प्रकरणाचा तपास करणार आहोत. दोन्ही आरोपींवर अपहरणाचा प्रयत्न व विनयभंग, असा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती कळताच पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन युवतीची भेट घेतली व घटनेचे गांभीर्य पाहता तपासाच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

21 Jul 2017


एमपीसी न्यूज - औंध येथील परिहार चौकात अट्टल चोरटा जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय-30, रा.डी.पी.रोड, आंबेडकर वसाहत, औंध पुणे), अशी माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून त्याला ताब्यात घेतले.


त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 9 आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 401 ग्रॅम सोन्याचे, 100 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 21 हजार, अॅडजेस्ट पाना, स्क्रु-ड्रायव्हर, मोबाईल असा 10 लाख 71 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेस केंजळे अधिक तपास करीत आहेत.

21 Jul 2017


एमपीसी न्यूज - रोहित टिळक यांना बलात्कार प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.  15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला असून पुढील सुनावनी 28 जुलै रोजी होणार आहे. तसेच पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहून सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका वकील महिलेने फिर्याद दिली होती. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने म्हटले होते.

याप्रकरणी रोहित टिळक यांनी आंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी रोहित टिळक यांच्या वकिलांनी ब्लॅकमेल करण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असून आमच्याकडे पुरावे आहेत, असा युक्तिवाद केला. यावर रोहित टिळक यांचा अटक पूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला.

पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. पीडित महिला आणि रोहित टिळक यांची दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला आणि गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. लग्नाची मागणी केल्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाणही  करण्यात आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रोहित टिळक यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रारही सदर महिलेने केली आहे. फिर्यादी महिला मुंबई उच्च न्यायालयात वकिली करते.

रोहित यांच्याकडून होणा-या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला, असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पीडित महिलेने 8 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

गेल्या आठवड्यात पीडित महिलेने याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. अखेर काल सोमवारी तिने विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या तपास सुरु आहे.

रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 साली गिरीश बापट यांच्याविरुध्द कसबा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

21 Jul 2017


एमपीसी न्यूज - पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले तसेच काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.


अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरू आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तसेच ही छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

एमपीसी न्यूजशी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन म्हणाले की, मी 2015 पासून या प्रकरणाचा पाठपुरावा घेत होतो. यासाठी मी राष्ट्रपतींना निवेदन दिले होते. स्वतः ईडी व लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली होती. माझा पाठपुरावा या प्रकरणी सुरुच होता. त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

21 Jul 2017

एमपीसी न्यूज- इमारतीच्या बांधकामासाठी डोंगर पोखरला जात असताना डोंगराचा काही भाग अंगावर कोसळून त्याखाली दोन मजूर सापडले. त्यापैकी एक मजूर ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हडपसर महंमदवाडी येथे आज दुपारी घडली.

महंमद इकबाल आलाम (वय 22) असे मयत मजुराचे नाव असून जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचे नाव अद्याप समजले नाही.

महंमदवाडी येथे दोराबाजी मॉल जवळ, बिल्डरने बांधकाम करण्यासाठी डोंगर पोखरला होता, पावसामुळे त्या डोंगराचा काही भाग तेथे काम करणाऱ्या दोन कामगारांच्या अंगावर कोसळला. ओम कन्स्ट्रक्शन असा बोर्ड तेथे लावण्यात आला आहे.

21 Jul 2017

निगडी पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – निगडी परिसरात वाढणा-या वाहन चोरी व घरफोडीच्या धर्तीवर नियोजनबद्ध कारवाई करत निगडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्टल, एक रिव्हॉलवर व जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री एक वाजता करण्यात आली.

सम्या ऊर्फ समीर लहू सरोदे (वय.23 राराजहंस सोसायटी, अंकुश चौक,ओटा स्कीम निगडी) किरण उर्फ धन्या लाला कांबळे (वय.30 रा. संजय नगर ओटा स्कीम निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रात्री एकच्या सुमारास समीर अंकुश चौकात त्याच्या साथीदारासोबत थांबला असून त्यांच्याजवळ पिस्टल आहे. बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलीस व आरोपींची नजरा-नजर होताच आरोपी पळायला लागले मात्र पोलिसांनी चारी बाजूंनी घेरून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस असा 85 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच खंडणी मागणे असे गंभीर आरोप आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, कर्मचारी किशोर पढेर, संदीप पाटील, विलास केकाणे, प्रसाद कलाटे यांनी केली.

Page 1 of 55
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start