• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

पालखी दर्शनासाठी आलेल्या भावीकांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला


देहू गावातून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सुमारे 27 तोळे सोने चोरीला; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - माऊली व तुकोबारायांच्या पालखीमध्ये तल्लीन होऊन नाचताय तर जरूर नाचा मात्र, यावेळी आपल्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष असू द्या...कारण याच पालखी सोहळ्यात देहूगाव येथून सुमारे 27 तोळे सोन्यांचे दागिने चोरीला गेले आहेत.

अशोक अंबादास गायकवाड (वय 27, नावडी चौक, गांधीनगर, बीड) व संजय माने (वय 19 रा.पाईपलाईन रोड, अहमदनगर) या दोन आरोपींना देहूगाव पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकोबारायांची पालखी देहूगाव येथील अलगडशहा दर्गा येथे दर्शनासाठी थांबली असताना दुपारी साडेबारा ते सहा या कालावधीत वारक-यांचे 27 तोळे सोने चोरीला गेले आहे. यामध्ये सोनसाखळी, मंगळसूत्र, गंठण,डोरली, मिनीगंठन, असा एकूण 7 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या दोन्ही चोरांच्या संशयीत वागणुकीमुळे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडले.

दोन्ही चोरांकडून केवळ साडेतीन तोळ्याची एक सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. यावेळी वारक-यांनीही त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच कोणतीही संशयित वस्तू व व्यक्ती आढळताच पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read 131 times Last modified on Sunday, 18 June 2017 11:22
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start