• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

सोसायटीचा मेंटेनन्स भरण्याच्या वादातून वडिलांचा मुलावर वार

एमपीसी न्यूज- चिखली येथे सोसायटीच्या मेंटेनन्ससाठी भरायच्या पैशाच्या वादातून चक्क वडिलांनीच मुलावर वार केले आहेत. ही घटना काल (शनिवारी) रात्री साडेआठच्या सुमारस घडली. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

विजय हनुमंतप्पा फलमारी (वय50 रा. न्यू कोहिनूर सोसायटी, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

विजय यांनी घरगुती भांडणामध्ये मुलगा हरिष विजय फलमारी (वय 22) याच्यावर चाकूने वार केले. हरीश्वरवर सध्या पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असून वडील विजय याला अटक करण्यात आली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read 194 times Last modified on Sunday, 18 June 2017 16:09
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start