• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

एमआयडीसी भोसरीमधील फायबर कंपनीला भीषण आग (PHOTO's)

एमपीसी न्यूज- एमआयडीसी भोसरी येथील सुवर्ण फायब्रोटेक या फायबर कंपनीला पहाटे साडेतीनच्या अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन तासांनी ही आग आटोक्यात आली.

या आगीचे कारण अद्याप कळाले नसून कंपनीच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या बाजूने आगीला सुरुवात झाली.या ठिकाणी काही केमिकल होते. त्या केमिकलने आग पकडल्यामुळे आग पसरली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र संपूर्ण कंपनी यामध्ये जाळून खाक असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.


ही आग विझवण्यासाठी पिंपरी, राहटणी, एमआयडीसी भोसरी, प्राधिकरण, तळवडे,खडकी,पुणे तसेच टाटा मोटर्स या सर्व मिळून एकूण 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या आग नियंत्रणात आली असून फक्त धूर येत आहे. फायबर असल्यामुळे आग पूर्णपणे विझवण्यास 2 तास लागतील त्यासाठी सध्या 2 गाड्या घटनास्थळी थांबल्या आहेत,अशी माहिती पिंपरी अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी किरण गावडे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.

ag22

ag33

 

ag55

ag111

 

Read 298 times Last modified on Monday, 19 June 2017 05:00
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start