• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्या जवळ कारची ट्रकला धडक, दोघे किरकोळ जखमी

एमपीसी न्यूज - द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाताना कारने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. कामशेत बोगद्यात हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास घडला. यामध्ये कारमधील महिला आणि पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. त्यावेळी कामशेत बोगद्यात समोरुन जाणा-या ट्रकला कारची मागून जोरदार धडक बसली. यामध्ये कारमधील एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जखमी त्यापुर्वीच दवाखान्यात गेल्याने त्यांची नावे समजून शकली नाही, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली. 

Read 73 times Last modified on Monday, 19 June 2017 08:57
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start