• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

चिंचवड येथे तरुणाने मैत्रिणीवर ब्लेडने केले वार; तरुण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टी येथील तरुणाने मैत्रीण बोलत नाही या कारणावरून ब्लेडने तिच्यावर वार केले आहेत. ही घटना काल (रविवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

ओंकार ऊर्फ अवधुत अनील राऊत (वय 20 रा. पत्रा झोपडपट्टी, चिंचवड), असे आरोपीचे नाव असून त्याला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी व ओंकार एकाच भागात राहत होते. त्या दोघांची मैत्री होती. मात्र, घरच्यांनी दोघांच्याही बोलण्यावर बंदी आणली. त्यामुळे मुलीने ओंकारशी बोलणे बंद केले. बोलणे बंद का केले या रागातून त्याने रविवारी सायांकाळी ती शौचास जात असताना तिच्या डाव्या हताच्या दंडावर, पोटरीवर आणि कंबरेच्या डाव्या बाजूवर  ब्लेडने वार केले. यातून मुलगी जखमी झाली.

तरुणाला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read 244 times Last modified on Monday, 19 June 2017 11:47
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start