• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टा; पाच सट्टेबाजांना अटक


एमपीसी न्यूज - चॅम्पियन ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यावर सट्टा घेणार्‍यांसह लावणार्‍या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई काल वानवडी येथे करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून सव्वालाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

हरीओम शिवजी ठक्कर (वय 49, रा. वानवडी), दीपक राजकुमार गिडवाणी (वय 32, रा. लष्कर), राजू गोपाल तलरेजा (वय 65, रा. महम्मंदवाडी), राजू दिव्यजीत राजकंवर (वय 36, रा. घोरपडी), अशोक लिलाराम थवानी (वय 56, रा. शंकरशेठ रोड), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी भारत पाकिस्तानमध्ये फायनल क्रिकेट सामना रंगणार होता. त्यानुसार, पोलिसांनी शहरात सट्टा घेणार्‍यांवर लक्ष केंद्रीत केले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट तीनला वानवडी परिसरात सट्टा बाजार सुरू असल्याचे समजले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू रासगे, संदीप तळेकर, रोहिदास लवांडे, गजानन एकबोटे यांच्या पथकाने वानवडीतील अश्विनी पॅलेस येथे सुरू असल्याचे सुट्ट्यावर छापा टाकला. तसेच, या पाच जणांना अटक केली.

हरीओम ठक्कर व दीपक गिडवाणी हे दोघे सामन्यावर सट्टा घेत होते. ठक्कर याचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून, गिडवाणी कार ड्रायव्हर आहे. तर, इतर तिघे त्यांच्याजवळ सट्टा लावत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गिडवाणी व ठक्कर यांच्यावर पोलीस काही दिवसांपासून लक्ष ठेवून होते. दोघांना शेवटच्या सामन्यावेळी पोलिसांनी पकडले.

Read 99 times Last modified on Monday, 19 June 2017 15:30
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start