• Bhausaheb_Bhoir.jpg
  • DPU1250x200.jpg
  • Mahesh_Landge.jpg
  • mpc.jpg
  • MPC_news.JPG
  • Nitin_Kalje.jpg
  • PCCO.jpg
  • Sunil_Shelke.jpg
14 Jul 2017

एमपीसी न्यूज- पावसाळा सुरु झाला की ख-या खवय्यांना वेध लागतात ते आषाढाचे. बाहेर मस्त पडणारा पाऊस, हवेतला सुखद गारवा आणि त्याचबरोबर रुचकर, स्वादिष्ट सामिष भोजन, मग आणखी काय हवे ? नेमके हेच डोक्यात ठेवून हॉटेल रागामध्ये खास नॉनव्हेजप्रेमींसाठी आखाड स्पेशल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राधिकरणातील हॉटेल रागा येथे येत्या आषाढी अमावास्येपर्यंत म्हणजे २३ जुलैपर्यंत खास आखाड फेस्टिव्हल सुरु असून यात नॉनव्हेजप्रेमींची चंगळ आहे. या कालावधीत मुख्यत्वे मटन आणि चिकन जास्त खाल्ले जाते. कारण नारळीपौर्णिमेपर्यंत मासेमारीला बंदी असल्याने मासे यावेळी जास्त उपलब्ध नसतात. त्यामुळे मटन आणि चिकनच्या विविध डिशेस येथे खवय्यांचा विशेष विचार करुन तयार करण्यात आल्या आहेत.

जेवणाची सुरुवात आपण खास तांबड्या, पांढ-या रस्स्याने करु शकतो. या रस्स्याला खास सूपचा फिल आणण्यासाठी यात चिकन आणि मटणाचे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर स्टार्टर्समध्ये पण व्हरायटी आहे. झणझणीत तवा कलेजी आणि खास कमी तिखट बंगाली पोश्तो मुर्गी खाऊन पाहायलाच हवी. पोश्तो म्हणजे खसखस. खसखशीच्या ग्रेव्हीमध्ये बनवलेली पोश्तो मुर्गी आणि त्याला जोडीला झणझणीत तवा कलेजी मस्ट ट्राय या सदरात मोडणारी. त्याच जोडीला मसाला मटन चॉप हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप खाल्ला जाणारा वेगळा पदार्थ यावेळी या फेस्टिव्हलमध्ये समाविष्ट आहे. याची खासीयत ही हॉटेल रागामध्ये जाऊन खाऊनच अनुभवायला हवी.

मेन कोर्समध्ये देखील भरपूर वैविध्य येथे उपलब्ध आहे. खास नागपूरचे झणझणीत सावजी चिकन, तिखट आवडणा-या खवय्यांनी खाऊन बघायलाच हवे. तसेच कोल्हापुरी मटन मसाला, मोगलाई पद्धतीचे मटन निहारी हे रात्रभर कमी आचेवर शिजत ठेवलेले मटन एकदा खाऊन पहाच. पूर्वी मुगल काळात या पद्धतीचे मटन रात्रभर दम देऊन बनवले जात असे. म्हणजे त्याकाळी सकाळी कामाला जाणारे कामकरी रात्रीचे जेवण झाले की मटनाला मसाला लावून रात्रभर कमी आचेवर ते शिजत ठेवत असत. सकाळी हे मटन मग अगदी लुसलुशीत बनत असे, मग याचाच नाश्ता करुन कामासाठी बाहेर पडायचे अशी पद्धत होती. आता अगदी मटन रात्रभर शिजत नसले तरी मसाला त्याच प्रकारचा असतो. त्यामुळे या मसाल्यातील मटन एकदा ट्राय करायलाच हवे.

आणि जेवणाचा समारोप करण्यासाठी खास आखाड स्पेशल चिकन आणि मटन बिर्याणी येथे उपलब्ध आहेच. तसेच उपलब्धतेनुसार मासे देखील मिळतील. प्रॉन्सची डिश आहेच. पण सुरमई, पापलेट देखील मिळू शकतील.

पत्ता - रागा मल्टि क्युसिन रेस्टॉरंट

साईदर्शन अपार्टमेंट, 4/6 एडिसी, आकुर्डी पोलीस चौकीजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे 411044. संपर्क - 8888077799

गुगल मॅप लिंक

https://goo.gl/maps/JdVNg5NZakQ2

 

chiken 1चला तर मग श्रावण पाळणा-यांनी आणि न पाळणा-यांनी देखील हॉटेल रागा येथे येऊन सामिष खाद्यपदार्थांवर ताव मारुन आखाड साजरा करायलाच हवा. शेवटी पट्टीच्या खवय्याला काय निमित्तच हवे असते. आणि ते निमित्त हॉटेल रागाने आखाड स्पेशल फेस्टिव्हल आयोजित करुन दिले आहेच.

30 Jun 2017


एमपीसी न्यूज - भवानी पेठेतील रामचंद्र कुदळे यांनी 1964 साली गूळ आळीतील एका वाडयातील राहत्या घरात 'मिसळ' हाऊसला सुरुवात केली होती. त्या काळी, भवानी पेठ, नाना पेठ, आणि रविवार पेठ या भागात वेग-वेगळे बाजार भरत असे. अशा वेळी व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, मजूर-कामगार मंडळी यांचे बाजारात येणे-जाणे होत असे. त्यांच्यासाठी सुरू केलेल्या मिसळ हाऊसने नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 'वटेश्वर मिसळ' या नावाने असलेली ही मिसळ पुणेकरांच्या पसंतीस पडली आणि लोकप्रिय झाली.

या मिसळविषयी अधिक माहिती देताना करण कुदळे म्हणाले की, पूर्वी पुण्यातील सर्व व्यापार हा नाना पेठ व भवानी पेठमधून होत असे. त्यावेळी सर्व व्यापारी व त्यांच्या बरोबर काम करणारा कामगार वर्ग या दोंघाचाही या हॉटेलवर व त्यांच्या चवीवर पूर्ण विश्वास होता. सद्यस्थितीत बाजारपेठ जरी येथून स्थलांतरीत झाली असली तरीही व्यापारी वर्ग आजही येथे येऊन तीच चव घेऊन जुनी आठवण ताज्या करीत असतात. त्याचबरोबर पूर्वी माल घेऊन येणारा शेतकरी वर्ग, त्यांच्या बरोबर येणारी इतर मंडळी  पुण्यात आल्यानंतर 'वटेश्वर भुवन'ला भेट देऊन आवर्जून मिसळचा आस्वाद घेतात. साधारण पंधरा वर्षांपूर्वी या हॉटेलचा कायापालट झाला असला तरी आजही आमच्या चोखंदळ ग्राहकांना 50 वर्षांपूर्वी असलेली चव देण्याचे काम वटेश्वर भूवन करीत आहेत.

तर चोखंदळ खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या 'वटेश्वर भुवन' मिसळने आपली दुसरी शाखा कोथरूड-कर्वेनगर भागात उघडण्याचे ठरवले असून येत्या 5 जुलै रोजी कोथरूडमधील मधुबन सोसायटीतील शॉप नंबर दोन येथे दुस-या शाखेचे उद्घाटन होणार आहे. या शाखेविषयी अधिक माहिती सांगताना करण कुदळे म्हणाले की, पुण्याच्या कोथरूड भागात 'वटेश्वर भुवन'  सुरू करण्याची अनेक खवय्यांची मागणी गेले अनेक वर्षांपासूनची होती. तसेच जास्तीत जास्त पुणेकरांना आमच्या मिसळीचा आस्वाद घेता यावा यासाठी ही दुसरी शाखा सुरू करण्यात येत आहे . 'वटेश्वर भुवन' चा विस्तार वाढावा आणि जास्तीत जास्त खवैय्यांना आमच्या मिसळचा आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही ही शाखा उघडत आहोत. याशिवाय नव्याने होणा-या शाखेत नेहमीच्या मिसळी बरोबरच मटार उसळ आणि इतरही खाद्यपदार्थ असतील.

Page 1 of 2
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start