16 Mar 2017
एमपीसी न्यूज - विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना 24 फेब्रुवारी रोजी पुनावळे येथे घडली होती.  

किरण रामभाऊ फडतरे (वय 33) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. माधुरी किरण फडतरे (वय 26, रा. पुनावळे, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत माधुरीचे वडील अनिल बोलगड (रा. अकुलज. ता. माळशीरस, जिल्हा, सोलापूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

किरण आणि माधुरी यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर कालांतराने किरण याने माधुरीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत तिचा शारिरीक व मानसिक छळ करत होता.

 या छळाला कंटाळून माधुरीने 24 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करत आहेत. 
 
dipex
 
16 Mar 2017
एमपीसी न्यूज - हडपसर येथील काळेपडळ परिसरातील पुठ्‌याच्या श्री पॅकेजींग कंपनीत आज दुपारच्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले.


हडपसर येथील काळेपडळ परिसरातील इंडस्ट्री परिसरात हि कंपनी होती. आज गुरुवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. या कंपनिजवळच येथील कामगारांची घरे आहेत. आज दुपारच्या सुमारास कंपनीमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कामगारांनी याची माहिती अग्निशामक दलाल दिली.


अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले.

अग्निशामक दलाच्या चार ते पाच पथकांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत किती नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

fiar 1
fiar 216 Mar 2017

एमपीसी न्यूज - खडकवासला गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांचे चार ट्रक काल (दि.15) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आले. पुण्यात दुचाकीनंतर आता चारचाकी व मोठी वाहनेही जाळण्याचे प्रकार होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

यासंबंधी सिंहगड रस्त्यावरील अग्निशामकदलास माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु चार ट्रकमधील डिझेलमुळे आगीचे लोट मोठे होते. ट्रक रोज दुसऱ्या जागेवर उभे करीत होते. परंतु शिवजयंतीचा दोन दिवस कार्यक्रम असल्याने नेहमीच्या जागेऐवजी बंगल्याच्या शेजारी 40-50 फुटांवर ते उभे केले होते. रात्री अडीच ते पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाचजण आले. त्यांनी ते ट्रक जाळले, असे मते यांनी सांगितले. 


ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. संबंधीत घटनेचा हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्हा दाखल केला जाणार आहे. मते यांचे ट्रक जाळण्यामागे नक्की कारण काय याबाबत चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे. सिमेंट ने-आण करण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो. हे ट्रक 12 व 14 चाकी होते. एक ट्रकमध्ये सिमेंटची पोती भरलेली होती. त्याच्यावरील ताडपत्री जळाली. आगीत जीवित हानी झालेली नसली तरी चारही ट्रक पूर्ण जाळून खाक झाल्याने सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे मते यांनी सांगितले. आग लागली त्यावेळी मते यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. आग लागल्यानंतर आवाजामुळे ते जागे झाले. त्यांनी मग आग्निशमन व पोलिसांना माहिती दिली.

dipex

15 Mar 2017

15 गुन्हे उघडकीस तर 15 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विश्रांतवाडी येथून भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ शंकर लंके (वय-40, रा. अनिरुध्द अपार्टमेंट, कस्तुरबा हौसींग सोसायटी, विश्रांतवाडी पुणे) याला गुन्हे शाखेच्या युनिट चार ने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे सोळा गुन्हे, 1 वाहन चोरी, 1 गावठी कट्टा बाळगल्याचा गुन्हा उघड झाला. त्याच्या ताब्यातून 6 लॅपटॉप, 12 घड्याळ, 7 कॅमेरे, 3 टॅब, शिलाई मशिन, दुर्बिण असा चोरीचा माल हस्तगत केला.

गुन्हे शाखेच्या युनिट चारचे सह पोलीस निरीक्षक यांना नानाभाऊ लंके याच्याकडे घरफोडीचा माल असल्याची माहिती मिळाली होती. परंतू आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस तपासणी साठी गेले असता त्यांना मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाची धमकी देऊन पोलिसांवरच दबाव टाकायचा. या सर्व परिस्थीतीचा अभअयास करून पोलिसांनी न्यायालयाकडून घरझडतीचे वॉरंट घेतले आणि मग ही कारवाई केली. घराच्या झडतीदरम्यान पोलिसांना विश्रांतवाडी आणि खडकी परिसरातील घरफोडीचा मुद्देमाल मिळाला.त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून 10 दिवसाची पोलीस कस्टडी घेतली.


कस्टडीदरम्यान त्याने वरील सर्व गुन्हे कबूल केले.आरोपी हा स्वतच्या अल्पवयीन मुलांकडून विश्रांतवाडी, खडकी परिसरातून घरफोडी करून घेत असे. व त्यानंतर त्याची वेगवेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावत असे.याप्रकरणी त्याची पत्नी दिपाली लंके ही सुध्दा त्याला मदत करत असल्याचे उघड झाल्यानंतर तीलादेखील अटक करण्यात आली.


आरोपीला चोरीचे दागीणे वितळून देण्यासाठी आणि नविन दागीणे बलवून देण्यासाठी मदत करणारा सऱाफ प्रविण देवराज पारेख (वय-53, रा.भाग्यश्री फॅशन इमीटेशन ज्वेलरी, कुंदन कॉर्नर, खडकी बाजार, पुणे) यालादेखील अटक करण्यात आली.


आरोपी नानाभाऊ लंके याने 2012 मध्ये एका महिलेला मुख्यमंत्र्याशी ओळख असल्याचे सांगत प्रमोशन मिळवून देण्याच्या बहाण्याने 4 लाख रुपये घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापुर्वी एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्याविरोधात घरफोडी, दरोडा,खंडणी, बलात्कार यासारखे गुन्हे दाखल आहेत.

15 Mar 2017
आरोपी गजाआड 


एमपीसी न्यूज - धुलीवंदन खेळताना पाण्याच्या फुगा अंगावर फुगा मारल्याच्या कारणावरुन दोघा सख्या भावांनी तिघांवर तलवारीने वार केले.  ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शांतीनगर, भोसरी येथे घडली.  


चॉद मौलाली शेख (वय 19) आणि आकील मौलाली शेख (वय 20 , दोघे रा. शांतीनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित राठोड (वय 18, रा. भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


धुलीवंदन दिवशी रोहित याने आरोपींच्या अंगावर पाण्याचा फुगा मारला होता. त्यातून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यांचे रुपांतर हानामारीत झाले. आरोपींनी रोहित याचे वडील हरिश्चंद्र राठोड आणि त्याच्या चुलत भावावर तलवारीने वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले.   भोसरी पोलीस तपास करत आहे.
15 Mar 2017
एमपीसी न्यूज - पाच दिवसांपूर्वी भरधाव मोटारीने जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी महिलेचा सोमवारी (दि.13) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.9) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर देहूफाटा येथे घडली होती. 


सरस्वती जयराम कोरडे (वय 41, रा. मरकळ रोड, आळंदी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, दुचाकीस्वार राजु बापु आयनोर (वय 38, रा. आळंदी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. 


राजु आणि सरस्वती एकमेकांच्या ओळखीचे होते. गुरुवारी ते दोघे दुचाकीवरुन मोशी येथून जात होते. सरस्वती या पाठीमागे बसल्या होत्या. देहूफाटा येथून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने त्यांना जोरात धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले. 


यामध्ये सरस्वती या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपाचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी (दि.13) त्यांचा मृत्यू झाला. 


अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. दिघी ठाण्याचे फौजदार एस. एन. आहेर तपास करत आहेत.
15 Mar 2017

एमपीसी न्यूज - पवना नदीपात्रात रावेत येथे एका अनोळखी इसमाचा  मृतदेह आज (बुधवारी) सकाळी सापडला.


पवना नदीपात्रत रावेत जवळ एक मृतदेह पडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. नागरिकांनी याबाबत सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.


मृतदेह सापडल्याचे वय अंदाचे 45 असून उंची पाच फूट आहे. मध्यम बांधा, अंगामध्ये बरमुडा, काळ्या-तापकिरी रंगाची बनियन परिधान केलेली आहे. उजव्या हातात पितळी कडे, लाल दोरा, केस कापलेले आहेत, अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास वाकड, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


ओळखपटेपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. मृत व्यक्ती कामगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

14 Mar 2017

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने गावठी पिस्तूल विकणा-या टोळीला जेरबंद केले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 11 पिस्तूल 29 काडतुसे जप्त केली आहेत. यावेळी पोलिसांनी निलेश घायवळ टोळीशी संबंधित असलेला सराईत तडीपार गुंडासह सहा जणांना अटक केली.


आरोपीमध्ये निलेश घायवळ टोळीची प्रशांत बाळासाहेब धुमाळ (वय-30, रा.लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), मतिन शेख (वय-37,रा. अहमदनगर), पंढरीनाथ उत्तम सांगळे ९वय-34, रा.बुरूडरोड,समर्थनगर, अहमदनगर), सहानाज ख्वाजा शेख (वय-46, रा,राळेगण थेरपाल, अहमदगर), मजर मोईद्दीन शेख (वय-24, रा.वोसवाडी, लातूर) आणि जफर रहीम खान (वय-36, रा. भाजी बाजार,पठाण कॉम्प्लेक्स, शिरुर, पुणे) यांचा समावेश  आहे.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिसांना सराईत गुंड प्रशांत धुमाळ हा कॅम्प परिसरात येणार असून त्याच्याजवळ पिस्तूल असल्याची माहिती  मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.यावेळी त्याच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करुन लष्कर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ही पिस्तूल स्वप्निल कुलकर्णी याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यानंतर तुरुंगात असलेला आरोपी स्वप्निलची अधिक चौकशी केली असता त्याच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून  तीन पिस्टल, एक गावठी कट्टा आणि 4 काडतुसे जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान अहमदनगर येथील मतिन शेख हा अवैध शस्त्रांचा डिलर असल्याची माहिती समोर आली होती.त्यानुसार पोलिसांनी कॅम्प परिसरातून मतिन शेख याला तवेरा गाडी, 1 पिस्टल व चार राऊंडसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने ही सर्व शस्त्र मध्यप्रदेशातून आणून उर्वरीत चार आरोपींना विकल्याचे निष्पन्न झाले.


पोलिसांनी वरिल सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 पिस्तुल, 29 काडतुसे आणि 1 तवेरा कार असा 11 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वरील गुन्ह्याचा तपास चालू असून आरोपींना बुधवारपर्यंत (दि.15) पोलीस कस्टडीत आहेत. 

14 Mar 2017

एमपीसी न्यूज - सासरी होत असलेल्या छळास कंटाळून एका वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह अन्य दोघांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही दुर्दैवी घटना काल (13 मार्च) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.


कोमल प्रवीण लोंढे (वय-20, रा. श्रीराम चौक, रामनगर,वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेची आई कविता शेलार यांनी फिर्याद दिली असून विवाहितेचा पती प्रवीण लोंढे याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


मयत  विवाहितेचे लग्न 2015 मध्ये झाले होते. ती सासरी नांदत असताना पती, सासू, नणंद यांनी आपसात संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून तिने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उप निरीक्षक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

14 Mar 2017

एमपीसी न्यूज - संपत्तीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना हडपसर येथून उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.


याप्रकरणी विठ्ठल गायकवाड (वय-50, रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अविनाश मोहन गायकवाड (वय-26, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  आरोपी अविनाश हा फिर्यादीचा पुतण्या आहे. त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद आहेत. या वादातूनच काल (13 मार्च) रोजी आरोपीने मला घरातील हिस्सा का देत नाही असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर कु-हाडीचे वार करत त्यांना ठार मारण्याच्या प्रयत्न केला.


पोलीस उप निरीक्षक ए.बी.माळी अधिक तपास करीत आहेत.

13 Mar 2017
एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरीतील शांतीनगर येथे घडली. 


मारहाण झालेल्यांची नावे अद्यापर्यंत समजू शकली नसून त्यांच्यावर पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांनी एका मुलाला, त्याचे वडील आणि मित्राला हाताने बेदम मारहाण केली आहे. एकाच्या नाकाला जबर मार लागला आहे. त्याच्या नाकामधून रक्तश्राव झाला आहे. त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु आहेत. 

पूर्वी मुलांची भांडणे झाली होती. त्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी या तिघांना हाताने मारहाण करुन पसार झाले आहेत. हाताने मारहाण केली असून तलवार, कोयत्याने वार केले नसल्याचे, भोसरी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
13 Mar 2017
एमपीसी न्यूज - मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तरुणाचा दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (13 मार्च) घडली.

गौरव जगदीश तोरगे (32 रा. सिंहगड रोड पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.

गौरव हा मित्रांसोबत दिवेआगर येथील  समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. समुद्रात राईडला गेल्यानंतर परत येत असताना उतरताना अंदाज न आल्यामुळे पाण्यात पडलेल्या गौरवचा बुडून मृत्यु झाला.
13 Mar 2017

एमपीसी न्यूज - स्कुलबसचालकाने दहा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी 65 वर्षीय स्कुलबस चालकास अटक केली.


संबंधीत मुलगी वारजे परिसरातील एका शाळेत विद्यार्थीनी आहे. हा सर्व प्रकार एप्रील 2016 ते 10 मार्च 2017 या दरम्यान घडला. आरोपी हा . पिडीत मुलीला शाळेत सोडण्याची आणि घरी सोडणा-या स्कुलबचा आरोपी चालक आहे. दरम्यान वर नमूद केलेल्या कालावधीत आरोपीने पिडीत मुलीला आपल्या शेजारच्या सिटवर बसवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला.


पोलीस उप निरीक्षक  एस.एन.निकम अधिक तपास करीत आहेत.

13 Mar 2017

एमपीसी न्यूज - वारजेतील गोकुळनगर परिसरात एका रिक्षाचालकाने महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली.


दिलीप अण्णा जाधव (वय-33, रा. गोकुळनगर पठार, वारजे, पुणे) आणि संतोष शामराव धोत्रे (वय-30, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद आहेत. त्यासंदर्भात ती बाहेरगावाहून पुण्यात आली होती.परंतू सासरच्यांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे आसरा शोधत असतानाच आरोपी रिक्षाचालक दिलीप जाधव याने तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तो राहत असलेल्या घराच्या टेरेसवर आणि गोकुळनगर पठाराकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले.


त्यानंतर आरोपीने त्याचा मित्र संतोष धोत्रे याच्या घरी तिला सोडले असता त्याने 2 ते 6 मार्च दरम्यान वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस उप निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

13 Mar 2017
एमपीसी न्यूज - शाहूनगर येथील फायबरच्या बसस्थानकाला आज (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची झळ दोन मोटारीला बसली असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चिंचवड, शाहूनगर येथील बहिरवाडे मैदानाच्या बाजूला फायबरचे स्थानक आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास या बस स्थानकाला अचानक आग लागली. बाजूलाच वाळलेले गवत आणि झाडे असल्यामुळे आग भडकली. बाजूला पार्क केलेल्या दोन मोटारीला आगीची झळ बसल्याने मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. 

 

संत तुकारामनगर आणि प्राधिकरणातील बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नात आग आटोक्यात आणली.

13 Mar 2017

वानवाडी येथील घटना


एमपीसी न्यूज - शिक्षक पतीने शिक्षक असलेल्या पत्नीचा चाकूने वार करुन निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या हातात सुरा देऊन शिक्षक पती पसार झाला होता. वानवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हा धक्कादायक प्रकार वानवडी येथे उघडकीस आली.


स्नेहा सुनील कदम (वय 35, रा. मनुचंद्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, आझादनगर, वानवडी) असे खून झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सुनील दत्तात्रेय कदम (40, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे, मूळगाव रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्नेहाचे वडील बाबासाहेब केसू चव्हाण (59, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


स्नेहा महापालिकेच्या राज्य राखीव दल येथील महापालिका शाळा क्रमांक 88 मध्ये शिक्षिका होती. तर सुनील कदम हा सांडस येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. दोघांना मुलगा व मुलगी आहे. स्नेहाचे वडील पोलीस दलातून वरिष्ठ अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.


स्नेहा व सुनील यांचा 2000 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्यात घरगुती कारणावरुन भांडणे होत होती. त्यामुळे दोघेही एका वर्षापासून विभक्त राहत होते. यापूर्वी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सुनीलवर स्नेहाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. 


आठ दिवसांपासून तो पुन्हा स्नेहाला भेटण्यासाठी येत असे. शनिवारी (दि.11) स्नेहा आणि मुलांना घेऊन तो फिरण्यास गेला होता. रात्री आठ वाजता त्यांना घरी सोडून तो बाहेर पडला. मध्यरात्री एकच्या सुमारास सुनील मद्यप्राशन करून पुन्हा स्नेहाच्या घरी आला. जोरजोरात दार ठोठावून त्याने दार उघडण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, स्नेहा झोपलेली असल्याने मुलाने दार उघडले. त्यानंतर सुनील याने स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतले. दरम्यान, मुलगा झोपून गेला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.


तुम्ही मद्यप्राशन करून आलात, बाहेर गाडीतच झोपा, असे स्नेहाने पतीला सांगितले. तिने पतीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्तीने दार ढकलून तो घरात शिरला व खिशातील चाकूने दोनवेळा स्नेहाच्या छातीत गंभीर वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले.


या हल्ल्यात गंभीर जखमी स्नेहाने ओरडून मदतीसाठी याचना केली. पती सुनील याने वार केलेला चाकू स्वतःच्या खिशात ठेवला आणि स्वयंपाक घरातील चाकू स्नेहाच्या हातात ठेवला. तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलांनी शेजा-यांना घटनेची माहिती दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.


पसार झालेल्या पतीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

13 Mar 2017
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका कर्मचा-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि.12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कासारवाडी येथे उघडकीस आला. 


बाळू राघू घोरपडे (वय 53, रा. कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या महापालिका कर्मचा-याचे नाव आहे.


घोरपडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी होती. रविवारी घरी एकटेच असताना सायंकाळी त्यांनी राहत्या घरात फॅनला  नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. शेजारच्यांनी त्यांना पाहिले. त्वरित एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. 
 

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

13 Mar 2017

एमपीसी न्यूज - मित्रांसमवेत चहा पिऊन कंपनीत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून सॉफ्टवेअर इंजिनियरला लुबाडले. ही घटना शनिवारी (दि.11) बावधन येथील हॉटेल अॅम्ब्रोसिया गेटजवळील सार्वजनिक रोडवर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.


रोहिदास पोतंगले (वय-23, रा. कात्रज) असे लुबाडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हे एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात. शनिवारी (दि.11) सायंकाळी ते मित्रांसमवेत चाहा पिऊन कंपनीत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडून तीन हजार रुपये बळजबरीने हिसकावून पळून गेले.


सहायक पोलीस निरीक्षक जी. धामणे तपास करीत आहेत.

Page 5 of 13