• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017


एमपीसी न्यूज - तुमच्या सोसायटीत डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे सापडली तर औषध फवारणी करणार नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने खुद्द सभासदांना सांगितल्याने या प्रकाराबद्दल सर्वसाधारणसभेत नाराजी व्यक्त केली.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने स्थानिक सभासद बाळा ओसवाल यांना बोलताना हे सांगितले. त्यामुळे ओसवाल यांनी सर्वसाधारण सभेत, असा कोणता आदेश प्रशासनाने काढला आहे का याबाबत विचारणा केली. माझ्या सोसायटीच्या दोन बाजूस नाला आणि एका बाजूने तलाव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याने, असे उत्तर देणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

महापालिकेकडे या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अखेर अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी असा कोणताच आदेश दिला नसल्याचे सांगितले. डासांची उत्त्पती अधिक होत असेल नागरिकांनी काळजी घ्यावी म्हणून तो संबंधिताने तसे वक्तव्य केल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणा-या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमीट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत सुरू असलेली दारू विक्री त्वरित थांबविण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच बेकायदेशीर दारू विक्री केल्याबद्दल संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत भापकर यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, पुण्याच्या पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथील परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांना पत्र पाठविले आहे.

महामार्गापासून 100 मीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या अनेक हॉटेलचालकांनी प्रवेशद्वारापर्यंत पोहचण्याचा पूर्वीचा सरळ मार्ग बंद करून 500 मीटर लांबीचा वळण रस्ता बनवून घेतला असून न्यायालयाच्या आदेशामागील हेतूलाच हरताळ फासण्याचा उद्योग चालविला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत दारू विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक हुशार हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवत त्यातूनही पळवाट शोधून काढली आहे, असे भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वाकड येथे महामार्गालगत असलेल्या सयाजी हॉटेलने तर अजबच प्रताप केला आहे. ग्राहकांना हॉटेलला चक्क मोठी 'प्रदक्षिणा' घालायला लावून महामार्गापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलचे प्रवेशद्वार 500 मीटर लांब  करून दाखविण्याची किमया केली आहे. 'सयाजी' प्रमाणेच शहरातील महामार्गालगतच्या अनेक हॉटेलचालकांनी असेच अंतर वाढविण्याची किमया केली आहे. त्यात हॉलिडे इन, ऑर्चिड अशा नामांकित हॉटेल्सचाही समावेश आहे. शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाशिवाय हे हॉटेलचालक एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत, असे भापकर यांनी म्हटले आहे.

महामार्गालगतच्या काही हॉटेल चालकांनी तर हॉटेलच्या आजूबाजूची जागा खरेदी केली अथवा भाड्याने घेतली आहे. त्या जागेत वळणावळणाचा रस्ता बनवून हॉटेलचे प्रवेशद्वार महामार्गापासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यामुळे कायदा काहीही केला तरी हॉटेल व्यावसायिक त्यातून पळवाट काढत असतात. मात्र, या पळवाटेमुळे चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामागील हेतूलाच हरताळ फासण्यापर्यंत या मंडळींची हिंमत वाढल्याचे पाहायला मिळत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे.

या प्रकरणी आपण वैयक्तिक लक्ष घालून बेकायदेशीरपणे सुरू असलेली दारू विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश द्यावेत. तसेच आतापर्यंत बेकायदेशीर दारू विक्री केल्याबद्दल संबंधित हॉटेल चालक तसेच त्यांना त्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. तसेच या तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी. अन्यथा या प्रकरणी नाईलाजाने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - शास्तीकरासारखा जिझिया कर रद्द करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांकडून कर आकारण्याची मागणी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने 600 स्केवअर फुटापर्यंतच्या घराचा शास्तीकर माफ केला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड पालिकेकडून नागरिकांना जुनीच बिले देऊन त्यानुसार कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने शास्तीकर रद्द करून नागरिकांकडून कर आकारणी करावी.

पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकरासारखा जिझीया कर संपूर्णपणे माफ करण्याची आमची मागणी आहे. राज्य सरकारने 600 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराचा शास्तीकर माफ केला आहे. मात्र, पालिकेकडून त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. नागरिकांकडून जुन्या दर प्रमाणेच कर आकारणी केली जात आहे.

राज्य सरकारचा शास्तीकराबाबत जोपर्यंत दुसरा निर्णय येत नाही तसेच शास्तीकर किती आकारायचे हे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत शास्तीकर वगळून नागरिकांकडून कर आकारण्यात यावा. तसेच यामुळे पालिकेचा महसूल देखील बुडणार नाही, असे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - देशात आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार शेतकरी विरोधी वक्तव्य केली जात आहेत. कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन झाली आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय नगरविकास मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. शेतक-यांबद्दल वादग्रस्त विधाने करणा-या नेत्यांनी शेतक-यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आज (शुक्रवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या मतांवर डोळा ठेवून शेतक-यांचा सात बारा कोरा करू, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या सूत्रानुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल इतका हमी भाव देऊ अशी आश्वासने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देऊन सत्ता हस्तगत केली.

कर्ज माफी करा, असे म्हणण्याची पॅशन झाली आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी की कर्जमुक्ती या शब्दाचा शब्दछल करीत वेळकाढूपणा केला. त्याचबरोबर शेतक-यांना कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी हमी कोण देणार आहे का? असे वक्तव्य केले होते. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी शेतक-यांबाबत वांरवार वादग्रस्त विधाने केली आहेत.

या सर्व वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त करीत भापकर यांनी अशा प्रकारची संतापजनक वक्तव्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री व राज्यस्तरावरील वरिष्ठ पदाधिका-यांनी केली आहेत. या सर्व नेत्यांचा आम्ही शेतक-यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणी योजनेसाठी पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या 200 कोटीच्या कर्जरोख्याची नोंदणी मुंबई शेअरबाजारात करण्यात आली असून ही ऐतिहासिक बाब असल्याचे सांगत भाजपने अभिनंदनाचा ठराव देत तहकुबी मांडली. पुणेकर कर्जबाजारी झाले यात अभिनंदन कसले, असे सांगत विरोधकांनी सभा त्याग केला.


विरोधकांनी पुणेकरांना कर्जबाजारी केल्याचे अभिनंदन कसले करता, असा सवाल करत या तहकुबीला विरोध केल्याने तहकुबीवर मतदान घेण्यात आले. तहकुबीच्या बाजूने 63 तर विरोधात 32 मतदान होऊन बहुमताने तहकुबी मंजूर करण्यात आली. या तहकुबीवर भाषण करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, तहकुबीवर बोलण्यास वेळ न दिल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांनी सभा त्याग केला.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सवानिमित्त रविवार (दि.25) व सोमवारी (दि. 26) विविध सांस्कृतिक, मर्दानी खेळासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

चिंचवड, केएसबी चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याशेजारी हे कार्यक्रम होणार आहेत. त्याचे उद्‌घाटन रविवारी (दि.25) सायंकाळी सहा वाजता अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, तसेच नगरसेविका मंदला कदम, अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे, तुषार हिंगे, सहआयुक्त दिलीप गावडे उपस्थित राहणार आहेत.

रविवारी (दि. 25) रोजी के.एस.बी. चौक, चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याशेजारील प्रागंणात सायंकाळी पाच वाजता लातूर सुप्रसिद्ध शाहीर संतोष साळुंखे यांचा लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव 2017 चे उद्‌घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

सोमवार (दि. 26) रोजी सकाळी दहा वाजता महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी सव्वादहा वाजता के.एस.बी. चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता के.एस.बी. चौक, चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याशेजारील प्रागंनात कोल्हापूर येथील मिलिंद सावंत हे मर्दानी खेळ सादर करणार असून यामध्ये तलवार बाजी, युद्ध कला सारख्या अन्य खेळांचा समावेश असणार आहे.

दुपारी तीन वाजता विजय आयवळे हे मर्दानी खेळाचे सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पुणे येथील प्रा. नामदेवराव जाधव यांचे करियर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सारेगम फेम धवल चांदवडकर व पुणे आयडॉल प्रसिद्ध पार्श्वगायिका कल्याणी यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश असलेला गौरव महाराष्ट्राचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व पतंजली योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक डॉ. गिरीश आफळे व पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी वसंत पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

निगडी, प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात गुरुवारी (दि.22) रोजी झालेल्या कार्यक्रमाला सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, स्पर्धा प्रमुख चंद्रकांत पांगारे, रत्नाकर देव,  डॉ. अजित जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. गिरीश आफळे म्हणाले ‘नियमितपणे योग, प्राणायाम केल्याने शारीरिक आरोग्या-बरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते. शरीर लवचिक बनते, शरीरातील रक्ताभिसरण, चेतासंस्था, मज्जासंस्था यांचे कार्य सुधारून रक्तदाब, मधुमेह, अस्थिविकारापासून दूर राहता येते. विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

यावेळी व्यक्तीगत तसेच सामुदायिक योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजित जगताप यांनी केले. तर, भास्कर रिकामे यांनी आभार मानले.

जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा निकाल

6 ते 12 या वयोगटात  इशान देशमुख याला सुवर्ण पदक, संचित कुलकर्णी रजत पदक आणि स्पंदन पाटील याला कास्यपंदक मिळाले आहे. 13 ते 18 वयोगटात दत्तात्रय काळे याला सुवर्ण पदक, शुभम, जाधव याला रजत पदक, साहिल गुंड याला कांस्यपदक, 19 ते 25 वयोगटात जतिन आव्हाड, जितेश कुमार, मयूर कुलकर्णी यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 26 ते 35 वयोगटात सुकेत शहा, प्रदीप जाधव, विष्णु बनकर यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 36 ते 45 राजेश ननावरे, तानाजी चौघुले, बाबासाहेब यवले यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

46 ते 60 वयोगटात रमेश सरनोपंत, किरण घाटबांधे, मानसिंग मोहिते यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 61 वर्षापुढे अशोक साळी, साहेबराव गारगोटे, कृष्णराव देशमुख यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

वयोगट वर्ष महिला!

6 ते 12 वयोगटात आर्य गोगावले, गौरंगी चैतन्य, श्रीया दीक्षित यांना अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 13 ते 18 समीक्षा महाले, स्वरदा देशपांडे, खुशी जिडगे अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 19 ते 25 वयोगटात संचिता भोईर, सलोनी जाधव, अदिती सिंह अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 26 ते 35 शर्मीला ननावरे, रुपाली जाधव, बिना सिंग अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

36 ते 45 वयोगटात विद्या महाले, योगिनी देशमुख, शालिनी आव्हाड अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 46 ते 60 वयोगटात धनश्री रणनवरे, मृणालिनी वेल्हाळ, नम्रता दळवी अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे. 61 वर्षापुढील कादंबरी चटर्जी, पुष्पा चव्हाण आणि वंदना उंब्रजकर अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक मिळाले आहे.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील घरे पाडण्यास 'घरे वाचवा संघर्ष' समितीने ठाम विरोध केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्न सुटण्यासाठीही आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

घरे वाचवा संघर्ष समितीची गुरुवारी (दि.22) रात्री वाल्हेकरवाडी येथील बीआरटीएस रस्त्यावर बैठक झाली. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करूणा चिंचवडे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, अनंत को-हाळे, श्याम वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते रणजित औटी, काशिनाथ नखाते, संदीप चिंचवडे, अमृत प-हाड, बाळासाहेब वाल्हेकर, आबा सोनवणे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे तसेच चिंचवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.

प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील आरक्षणामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहे. याला घरे वाचवा संघर्ष समितीने ठाम विरोध केला आहे. एचसीएमटीआर रस्त्यावरील थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी येथील आरक्षणे हटविण्याचा ठराव एकमाताने या बैठकीत केला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा जटील प्रश्न सोडविण्याचा ठराव पारीत करण्यात आला आहे.

शहराच्या इतिहासात सार्वजनिक रस्त्यावर एखादी बैठक झाली आहे. नागरिकांनी एचसीएमटीआर रस्त्यावरील घरे पाडण्यास तीव्र विरोध केला आहे. प्रभागातील सर्व पक्षाचे नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. प्रसंगीपद गेले तरी चालेल. परंतु, आम्ही आंदोलक नागरिकांच्या बाजुने उभे राहणार असल्याची ग्वाही, नगरसेवकांनी बैठकीत दिली आहे.

एचसीएमटीआर रस्त्यावरील घरे पाडण्यास आमचा ठाम विरोध आहे. याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. काळेवाडी, रहाटणी, थेरगाव या भागात कोपरा सभा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे संघर्ष समितीचे निमंत्रक विजय पाटील यांनी सांगितले.

एचसीएमटीआर रस्त्यावरील आरक्षणात फेरबदल करण्याचा अधिकार नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. दोन्ही विभागाच्या सचिवांनी आमच्या बैठकीची नोंद घ्यावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये पुढाकार घेऊन आरक्षणामध्ये बदल करावा, अशी मागणीही संघर्ष पाटील यांनी केली आहे.

समितीचे समन्वयक विजय पाटील, आबा राजपूत, मोतीलाल पाटील, अमोल हेळवर, प्रशांत गळवे, भाऊसाहेब पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

metting 1

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - शहराच्या पूर्वभागासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पूर्व भागातील असमान पाणी पुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. ‘भामा-आसखेड योजने’ला आता राज्य सरकारने निधी देण्यास मंजुरी दिली आहे. आता केंद्राकडून अपेक्षित असलेल्या निधीपैकी 80 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पूननिर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) भामा-आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मार्च 2017 पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास निधी देण्यात येईल, अशी अट केंद्राने घातली होती. पालिकेचा वडगाव प्रकल्प पूर्ण झाला, तरी शेतकरी आणि स्थानिक खासदार/आमदारांच्या विरोधामुळे भामा-आसखेड प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, केंद्र-राज्याकडून अपेक्षित असलेल्या सुमारे शंभर कोटी रुपयांचा भुर्दंड पालिकेलाच सहन करावा लागण्याची शक्यता होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने ‘जेएनएनयूआरएम’मधील अपूर्ण प्रकल्पांसाठी अनुदान स्वरूपात निधी देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यामुळे या प्रकल्पासमोरील निधीची अडचण आता दूर होणार आहे.

भामा-आसखेडचा संपूर्ण प्रकल्प 380 कोटी रुपयांचा आहे. यापैकी 256 कोटी रुपये केंद्र-राज्याच्या निधीतून मिळणे अपेक्षित होते. मार्च अखेरपर्यंत त्यापैकी 172 कोटी रुपये पालिकेला प्राप्त झाले आहेत. भामा-आसखेड प्रकल्पाचा केंद्राकडून मिळणारा 70 कोटी रुपयांचा अखेरचा हप्ता येण्याची शक्यता नसल्याने आता राज्याकडून या प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी अनुदान मिळणार आहे.

23 Jun 2017

एमपीसी न्यूज - नवीन बांधकांमांना परवानगी न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. त्यासोबतच भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचेही निर्देश देण्यात मंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पालिकेने दररोज प्रती व्यक्ती 150 लीटर पाणी पुरवठा करणे भाग आहे. मात्र, पुणे व ठाणे महानगरपालिका त्यात अपयशी ठरत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

या याचिकांवरील एकत्रित सुनावणीदरम्यान हायकोर्टाने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या समस्येबाबत चिंता व्यक्त केली. काही ठोस उपाययोजना आजच केल्या गेल्या नाहीत, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू शकतो. त्यामुळे महानगरातील वाढती लोकवस्ती पाहता, पाणी पुरवठा वाढवणे पालिकेला बंधनकारक आहे. अन्यथा तिथली लोकवस्ती मर्यादीत ठेवण्या व्यतिरीक्त पर्याय उरणार नाही, असे मत हायकोर्टने नोंदवले. यासंदर्भात पुणे आणि ठाणे महानगरपालिकेला 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

याबाबत 30 तारखेपर्यंत न्यायालयाला माहिती द्यायची आहे. तोपर्यंत भोगवटा पत्र देऊ नए, असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रशासनाने तेथील सध्या काम सुरू असलेल्या कामांना भोगवटा पत्र देणे थांबविले आहे. येथील बांधकामांना वापरण्यात येणारे पाणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याची माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले आहे.

Page 1 of 183
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start