• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

संभाजी भिडे गुरुजी संघटना मध्येच घुसल्याने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला अर्ध्या तासाचा ब्रेक!

गुडलक चौकात गेल्या 3-4 वर्षांपासून नेहमीच घडतो हा प्रकार; चोपदारांची माहिती

एमपीसी न्यूज - विठुरायाच्या जयघोषात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या आगमनानंतर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्त होताना, शिस्तबद्ध जाणा-या ज्ञानोबांच्या पालखीला गुडलक चौकात मध्येच थांबवावे लागले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन ज्ञानोबांच्या पालखीला मार्गस्थ होण्यासाठी अर्ध्यातासाचा ब्रेक लागला.


याबाबतची हकीकत अशी की, संगमपुल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जागणारे आणि संत ज्ञानेश्वर पालखी असतात. मात्र, हिंदुत्ववादी संभाजी भिडे गुरुजी संघटना मोठ-मोठ्याने घोषणा देत मध्येच घुसते. त्यामुळे ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांनी पालखी गुडलक चौकातच थांबवली. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ येथे येऊन मध्यस्थी केली. दरम्यान, भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी व डोक्याला फेटे घातलेले असतात. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे भालदार चोपदार यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांकडून यापूर्वी पोलिसांना याबाबत सांगण्यात आले होते. तसेच, तुम्हाला हे बंद करता येत नसेल, तर आम्ही आमचा मार्ग बदलू असेही सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून याबाबत काहीच निर्णय घेण्यात न आल्याने यंदाही गुडलक चौकात पालखी आल्यानंतर भिडे गुरुजी संघटनामध्ये घुसल्या. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांनी पालखी जागेवरच थांबवत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वातारवण शांत झाले. तसेच ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांना यापुढे असे होऊ न देण्याची हमी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. त्यानंतर पालखी येथून मार्गस्थ झाली. या गोंधळात तब्बल अर्धातास पालखी गुडलक चौकात थांबवण्यात आली.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start