• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

पिंपरी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर 13 नगरसेवकांना संधी!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्याने पूर्वीची वृक्ष प्राधिकरण समिती संपुष्टात आली आहे. त्यामुळे नव्याने समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीवर 13 नगरसेवकांना संधी मिळू शकते. समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीला मंजूरी देण्यासाठी हा विषय 20 जूनच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

पाच वर्षासाठी स्थापना करण्यात येणा-या या समितीचे महापालिका आयुक्त हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त आयुक्त कार्याध्यक्ष तर मुख्य उद्यान अधिक्षक हे वृक्ष अधिकारी असणार आहेत. तर नगरसेवकांमधून 13 जणांची निवड होणार आहे. पक्षाच्या संख्याबळानूसार नगरसेवक निवडले जाणार आहेत.

फेब्रुवारी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामुळे पुर्वीची वृक्ष प्राधिकरण समिती संपुष्टात आली. महाराष्ट्र (नागरी श्रेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करणे आवश्यक आहे.

हा अधिनियम अंमलात आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांमधून कमीत कमी पाच व जास्तीत जास्त 15 सदस्यांचे मिळून बनवलेले वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करणे गरजेचे आहे.

या समितीवर निवड झालेल्या एका नगरसेवकाची वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभापतीपदी निवड केली जाणार आहे. वृक्ष अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीला मंजूरी देण्यासाठी हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start