• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

पुण्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दारूच्या बाटल्याचा खच


एमपीसी न्यूज -   व्यसन हे वाईट असते. व्यसनाच्या आहारी जाऊ नका, असा संदेश लोकप्रतिनिधी जनतेला ज्या ठिकाणावरून देतात, राज्य सरकारच्या महत्वाच्या बैठका होतात, नेत्यांची सततची वर्दळ जेथे असते त्या पुणे स्टेशन येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिअर आणि दारुच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाल्याने सगळीकडे बाटल्यांमागचे तळीराम कोण, या प्रश्नावर एकच चर्चा रंगली आहे. दारुच्या या बाटल्या नवीन शासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आतील डाव्या बाजूस असणा-या झाडाखाली आढळल्या. 

पुणे स्टेशन येथील नवीन शासकीय विश्रामगृह या ठिकाणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस कामानिमित्त येत असतात. या इमारतीच्या आवारात सर्व सामान्य नागरिकाला आत जायचे म्हटले तरी देखील कोणी बोलावले काय काम आहे, अशा प्रश्नांना प्रवेशद्वारावरील पोलिसांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. ही एवढी सक्षम यंत्रणा असताना दारुच्या बाटल्या आल्या कोठून या बाटलीचे खरे तळीराम कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एका बाजूला व्यसन करू नका ते केल्याने आजाराचा सामना करावा लागतो आणि संसार उद्धवस्त होतात, असा सल्ला देणा-या राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी विश्रामगृहत हा प्रकार घडल्याने दिव्या खालीच अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर या तळीरामांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start