• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

राज्यात दूध खरेदीच्या दरात तीन रुपयांनी वाढ; मात्र विक्री दर स्थिर


गायीचे दूध 27 रुपये तर म्हशीचे 36 रुपये लीटर

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने दूध खरेदीमध्ये तीन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गायीचे दूध 27 रुपये लिटर तर म्हशीचे दूध 36 रुपये दरांनी खरेदी केले जाणार आहे. मात्र, दुधाच्या विक्रीच्या दरात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही.


पशू, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या खरेदी दरातील वाढीला मान्यता दिला आहे. त्यामुळे 24 रुपये लीटरने खरेदी केले जाणारे गायीचे दूध 27 रुपये लिटरने तर 33 रुपये लीटरने खरेदी कले जाणारे म्हशीचे दूध 36 रुपये लीटरने खरेदी केले जाणार आहे. मात्र, नागरिकांचे हित लक्षात घेता विक्री दरात सरकारने कोणतीही वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे यापुढे महागाई निर्देशांक लक्षात घेऊन राज्यातील दूध खरेदी आणि विक्री दराबाबत प्रदत्त समितीची वर्षातून किमान एकदा बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत दूध खरेदी आणि विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे.

यापूर्वीही 11 एप्रिल 2017 रोजी दूध खरेदीमध्ये राज्य सरकारने 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानुसार गायीचे दूध 22 रुपयांवरून 24 रुपये तर म्हशीचे दूध 31 रुपयांवरून 33 रुपये लीटरने खरेदी केले जात होते.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start