• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
22 Feb 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी काल रात्री साडेनऊ पर्यंत मतदान सुरू होते. यामध्ये भाटनगर व कृष्णानगर येथे रात्री उशिरापर्यंत मतदान चालू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम आकडेवारी कळण्यासही विलंब झाला. 

विषेशकरून प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णानगर व प्रभाग क्रमांक 19 मधील भाटनगर येथे रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान मतदान चालू होते. या दोन्हीही मतदान केंद्रावर शेवटच्या दोन तासात मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे साडेपाच उलटून गेले तरी मतदारांच्या मतदानकेंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यानुसार प्रभाग क्रमांक 11 मध्ये 66.16 टक्के मतदान  झालेले आहे. तर 19 प्रभागात 59.50 टक्के मतदान झालेले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात एकंदरीत सकाळच्या सदरात चांगले मतदान झाले. तर दुपारी बारापासून मतदान केंद्रावरची मतदारांची गर्दी ओसरत गेली.  त्यानंतर कडक उन्हामुळे  दुपारी बारा ते चारपर्यंत मतदानकेंद्रावर बोटावर मोजण्या इतपत मतदार होते. उन्हाची तिव्रता कमी व्हायला लागली तशी मतदारांची संख्याही वाढली. त्यानंतर मतदानाची वेळ संपली तरीही मतदान केंद्रावर लांबच-लांब रांगा होत्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मतदारांनी  रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतदान केले. यावर्षी एकूण 65.35 टक्के मतदान झाले. यावर्षी  गेल्यावर्षीच्या मतदानापेक्षा 10.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

22 Feb 2017

एमपीसी न्यूज - पुण्याहून दिल्लीला जाण्या-या  स्पाईस जेट विमानाची काच फुटल्याने खोळंबा झाला असून आज सकाळी 7.20 ला जाणा-या विमानाची उड्डाणाची वेळ दुपारी तान वाजताची करण्यात आली आहे. 

 

स्पाईस जेटचे SG999 हे विमान पुण्याहून दिल्लीला जात होते. दरम्यान, काच फुटल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. या विमानातील अनेक प्रवाशी सध्या पुणे विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांकडून स्पाईस जेटच्या प्रशासनाकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

22 Feb 2017
एमपीसी न्यूज - कामगारांना मतदान करण्यासाठी 'एक दिवस वा दोन तास' सुट्टी द्यावी, अशी अधिसुचना राज्य सरकारने काढली. मात्र, त्यावर 'एक दिवस वा दोन तास' सुट्टी द्यावी, असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला आहे. सरकराच्या संदिग्ध अधिसुचनेमुळे औद्योगिकनगरीतील 60 ते 70 टक्के कामगार मतदानापासून वंचित राहिले असल्याचा आरोप, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी केला आहे.


मतदान करणे सर्वांचा मुलभूत हक्क आहे. मतदान वाढावे यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार मतदानापासून वंचित राहिले आहेत. राज्य सरकारने कामगारांना मतदानासाठी 'एक दिवसाची वा दोन तासा'ची सुट्टी देण्याची अधिसूचना काढली. 'एक दिवस वा दोन तास' असा उल्लेख असल्यामुळे मोठा गोंधळ झाला आहे. 
एमपीसी न्यूजशी बोलताना किशोर ढोकले म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील नागरिक वास्तव्य करत आहेत. तसेच परराज्यातीलही कामगार आहेत. त्यामुळे मतदानासाठी गावी जायला त्यांना वेळ लागतो. सरकारने मतदानासाठी पुर्ण एक दिवसाची सुट्टी देखील दिली नाही. त्यामुळे अनेक कामगार मतदानापासून वंचित राहिले आहेत. दोन तासचा अवधीही कमी आहे. कामाच्या ठिकाणापासून कामगार लांब राहत आहेत. त्यांचे मतदान केंद्र लांब असल्यामुळे ते दोन तासात मतदान करुन येऊ शकत नाहीत. 

काही कंपन्यांनी मंगळवारी कामगारांना मतदानासाठी सुट्टी दिली होती. मात्र नंतर ती सुट्टी भरुन घेणार आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी कामगारांना मतदानासाठी सुट्टी दिली नसून सरकाराच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, अशा कंपन्यांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी, किशोर ढोकले यांनी केली आहे. 

सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कामगारांचा मुलभूत अधिकार नाकारला जात आहे. सरकारच्या संदिग्ध अधिसुचनेमुळे औद्योगिकनगरीतील 60 ते 70 टक्के कामगार मतदानापासून वंचित राहिले आहेत. कामागारांकडे देशाचा नागरिक म्हणून पाहावे, अशी अपेक्षा ढोकले यांनी व्यक्त केली. 
22 Feb 2017

सर्वात कमी विमाननगर-सोमनाथ नगर 45.94 टक्के

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेची निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.50 टक्के इतके मतदान झाले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही भागात हाणामारीच्या घटना आणि मतदार यादीतील घोळ होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली.


या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली.विमाननगर सोमनाथ नगर भागात 45.94 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. तर प्रभाग  क्रमांक 15 मधील शनिवार पेठ सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले.


या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, पुणे शहराच्या 2007 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत 53 टक्के आणि 2012 मध्ये  50.84 टक्के इतके मतदान झाले होते. तर यंदा पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 62 हजार 409 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारी यंदा  55 टक्के इतके मतदान झालेाहे.  65 ते 70 टक्के इतके मतदान होईल असा अंदाज होता.  बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55.9 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी वरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी मतदानाला अधिकधिक बाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला आहे.


तसेच यंदाच्या महापालिका निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदानाच्या स्लिप वेळेमध्ये मतदारापर्यंत पोहचल्या गेल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चारनंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची निवडणूक शांततामय पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काही भागात हाणामारीच्या घटना आणि मतदार यादीतील घोळ होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली. तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.53 टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी घोषित केलेल्या परिसरात केवळ 40 टक्के इतके मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील स्मार्ट मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.    


या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की,  पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारीवरून 53 टक्के 55 टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील शनिवार पेठ, सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले आहे.


त्याचबरोबर यंदाच्या महापालिका निवडणुकी दरम्यान काही ठिकाणी मतदार स्लिपा वेळेत मतदारापर्यंत पोहोचल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका निवडणूक आज सर्वत्र शांततेत पार पडली. या निवडणुकीत 41 प्रभागात 162 जागांसाठी 53.55 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी आपल्याला या तक्त्यात पाहता येईल.

Pune final voting chartf

21 Feb 2017
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा स्पष्ट बहुमताचा दावा


शिवसेना म्हणते राष्ट्रवादीला मिळतील सर्वाधिक जागा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून केलेल्या विक्रमी मतदानाने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नेत्यांच्या मनातील धागधूग चांगलीच वाढवली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी आपल्याच फायद्याची असून आपल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.
 
 
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 मधील निवडणुकीत 54.84 टक्के मतदान झाले होते. 2007 मध्ये 56.66 टक्के, 2002 मध्ये 59.51 टक्के तर मतदान झाले होते.  1997 मध्ये 68.65 टक्के मतदान झाले होते पण त्यावेळी मतदारांची एकूण संख्या फक्त 3 लाख 94 हजार 931 होती. त्यामुळे यावेळी 65.35 टक्के मतदान झाले असून एकूण मतदारसंख्या 11 लाख 92 हजार 089 इतकी आहे. म्हणजेच यावेळी विक्रमी मतदान झाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा यंदा 10.51 टक्के वाढ झाली आहे.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले होते. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या आमदारांबरोबरच आझमभाई पानसरे यांच्यासारख्या बड्या नेत्याला आपल्याकडे खेचून भाजपने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन जाहीर सभा घेऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीतील चुरस, प्रचारातील आरोप-प्रत़्यारोपांचा धुराळा यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पहायला मिळते.


पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनानेही मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली. मतदारांना आवाहन करणारी सेलिब्रिटीजची पोस्टर्स, बैनर्स, व्हिडिओ क्लिप्स, सोशल मीडियावरील कैम्पेन यालाही उल्लेखनीय यश आले. मतदार हेल्पलाईनलाही चांगला प्रतिसाद मिळाला.भाजपला 70 जागा मिळतील - लक्ष्मण जगताप
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे किमान 70 नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीतून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मतदारांच्या मनातील रोषच दिसून येतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित झाले आहे, असे ते म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसला 68 जागा मिळतील - योगेश बहल
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला आहे.  त्या कामाची पावती देण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश बहल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेला 68 जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इतर पक्षांना किती जागा मिळतील, याबाबत काहीही अंदाज व्यक्त करण्याचे त्यांनी टाळले.


शिवसेना 'किंग मेकर'ची भूमिका बजावणार - बारणे
या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे भाकित शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. शिवसेनेला 30 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळतील आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल, असे भाकितही त्यांनी केले. शिवसेना यावेळी किंग मेकरच्या भूमिकेत पाहायला मिळेल, असेही त्यांनी सूचित केले.
21 Feb 2017

पिंपरीत आपल्या प्रभागात किती झाले मतदान?

 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुक आज सर्वत्र शांततेत पार पडली. या निवडणुकीत 32 प्रभागात 127 जागांसाठी 65.35 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची अंतीम आकडेवारी आपल्याला या तक्त्यात पाहता येईल.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आज झालेल्या मतदानाची            
प्रभागानुसार मतदानाची आकडेवारी.

प्रभाग क्रमांक

भागांची नावे

एकूण मतदार

झालेले मतदान

टक्केवारी

1

चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती

33,794

20155

59.64

2

चिखली गावठाण, कुदळवाडी, जाधववाडी

28,285

20825

73.63

3

मोशी गावठाण, -होली

29,168

23283

  79.82

4

दिघी, बोपखेल

36,666

 24441

66.66 

5

गवळीनगर, चक्रपाणी वसाहत -भोसरी

27,799

 20619

74.17 

6

धावडे वस्ती, गुळवे वस्ती, सदगुरुनगर

33,209

20125

60.60

7

सॅंडविक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी

31,990

 21220

66.33

8

इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा

34,917

23725

67.95

9

मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर

49,112

29372

59.81

10

मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर

41,564

26161

62.94

11

नेवाळेवस्ती, अजंठानगर, फुलेनगर

35,592

 23548

66.16

12

तळवडे गावठाण, म्हेत्रेवस्ती, रुपीनगर

36,263

 25517

70.37 

13

निगडी, गावठाण, सेक्टर 22 ओटा स्कीम, यमुनानगर साईनाथनगर

41,494

 25758

62.08

14

चिंचवड स्टेशन मोहननगर, जयगणेश व्हीजन, विठ्ठलवाडी, दत्तवाडी

45,704

 28860

63.15

15

आकुर्डी गावठाण गंगानगर, केंद्रीय वसाहत, सेक्टर क्र. 24,25,26,27 ,28

40,982

 26229

64.00

16

वाल्हेकरवाडी, विकासनगर, किवळे रावेत

39,717

26466

66.64

17

दळवीनगर, प्रमलोक पार्क, वाल्हेकरवाडी गावठाण, बिजलीनगर

41,436

 28322

68.35

18

एस.के. एफ. कॉलनी, पवनानगर, केशवनगर, चिंचवड गावठाण

43,208

 28969

67.05

19

विजयनगर,आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, पिंपरी कॅम्प

49,696

 27784

 59.50

20

विशाल थिएटर परिसर, एच.. कॉलनी, कासारवाडी, संत तुकारामनगर

39,462

25089

63.58

21

मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी

47,614

30978

65.06

22

काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगर

39,999

26670 

66.68 

23

गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, थेरगाव गावठाण, साईनाथनगर, समर्थ कॉलनी

26,371

17598

66.73

24

आदित्य बिर्ला हॉस्पिटल, म्हातोबानगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी

29,665

19956

67.27

25

माळवाडी, पुनावळे, काटेवस्ती, नवलेवस्ती, भूमकरवस्ती, वाकड, मुंजोबानगर

25,881

 19922

76.98

26

पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, धनराज पार्क, रक्षक सोसायटी

39,095

25285

64.68

27

तापकीरनगर, शिवतिर्थनगर, रहाटणी, गावठाण, एसएनबीपी स्कूल, आकालगंगा सोसायटी

33,254

 22531

67.75 

28

शिवार गार्डन, कापसे लॉन, पिंपळे सौदागर, रोजलॅन्ड

36,625

 22413

61.20

29

कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर

36,501

22542

61.76

30

केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, सुंदरबाग कॉलनी

44,408

 26884

60.45

31

राजीव गांधीनगर, विनायकनगर, विद्यानगर, गणेशनगर, ऊरो रुग्णालय

38,987

 23288

59.73 

32

सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर, पीडब्ल्यूडी, एस.टी.कॉलनी

36,631

 24565

67.06 

11,92,089

 779060

 65.35

 

 

21 Feb 2017

मागील निवडणुकीपेक्षा 10.51 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानात 2012 च्या निवडणुकीपेक्षा 10.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत 54.84 टक्के झाले होते. तर यावेळी 65.35 टक्के मतदान झाले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  मतदानाचा इतिहास पाहता 1997 साली 68.65 टक्के मतदान झाले होते. त्या खालोखाल  1992 साली  60.15 झाली होती. त्यानंतर आत्ताच्या म्हणजे 2017 च्या निवडणुकीसाठी 65.35 टक्के मतदान झालेले आहे. यामध्ये एकूण मतदान 11 लाख 92 हजार 089 असून त्यापैकी 7 लाख 78 हजार 060 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात स्त्रियांनी 3 लाख 58 हजार 506, पुरुषांनी 4 लाख 20 हजार 547 तर इतरमधून 7 मतदान केले.

 

यावेळी एका प्रभागातून चार उमेदवारांना मतदान करावयाचे होते. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का घसरेल की काय अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, 2012 च्या  मतदानापेक्षा यावेळी 10.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2012 साली 64 प्रभागातून 128 जागांसाठी 6 लाख 32 हजार 71 मतदान झाले होते. यावेळी 127 जागांसाठी मतदान झाले होेते.

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी 1 हजार 608 मतदान केंद्रावर आज मतदान झाले. मात्र, ज्या मतदारांनी यापूर्वी दोन-तीन वेळाच मतदान केले आहे, अशा मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्याने मतदारांना मतदानच करता आले नाही, अशा तक्रारी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागातून दिवसभर येत होत्या.


गेल्या काही वर्षांपासून आम्ही मतदान करत आहोत. तसेच आम्हाला जी मतदार यादी मिळाली त्यामध्ये नाव आहे म्हणून त्यात दिलेल्या प्रभागात गेल्यानंतर केंद्रावर तुमचे या मतदार यादीत नाव नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही मतदान कोणाला करणार, असा प्रश्न विचारला असता प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी तक्रार मतदारांमधून येत होती. काहींच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन यादीत मतदाराचे नाव आहे. मात्र, प्रत्यक्षात मतदानकेंद्रावर नाही. त्यानंतर शोधा-शोध केली असता भलत्याच प्रभागाच्या मतदानकेंद्रावर नाव आले होते.


याविषयी प्रशासानाशी विचारणा केली असता, काही मतदारांना उमेदवारांनी विधानसभेची मतदार यादी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना जुन्या यादीनुसार मतदानकेंद्र दाखवले गेले. मात्र, नवीन यादीत त्यांची नावे  योग्य त्या मतदान केंद्रावरच होते, असे उत्तर दिले.


मात्र, मतदार यादीतील या सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानाला मुकले. तसेच अनेक मतदारांमध्ये प्रशासनाने योग्य ती मदत न केल्यामुळे मतदान करता आले नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start