• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांना लेनची शिस्त लावण्यासाठी व अपघात तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीच्या वतीने फेक्झिबल हाईट बॅरिअर लावण्यात येणार आहेत. हे बॅरिअर  किमी ३३ ते ५२ दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या मार्गावर खालापूर टोलनाका ते लोणावळ्यातील तुंगार्लि गावच्या हद्दीत पर्यंत बसविण्यात येणार अाहेत.

या संकल्पनेचे उदघाटन महामार्गाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते करण्यात आले आहे. यावेळी रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत औटी, श्री. पत्की आयआरबीचे कर्नल जोशवा, रायगड विभागाचे महामार्ग पोलीस अधिक्षक विजय पाटील, पुणे विभागाचे महामार्गाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, महामार्गाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली अंबुरे, पोलीस निरीक्षक डी. जी. गाढवे यांच्यासह पळस्पे, बोरघाट (दस्तुरी), खंडाळा व वडगाव महामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मागील  १२ वर्षापासून झालेल्या हजारो अपघातात हजारो प्रवाशांना प्राणांना मुकावे लागले असून अनेक जण जायबंद झाले आहेत. या अपघातांमागे ओव्हरस्पीड, लेनची बेशिस्त, चुकीचे ओव्हरटेक करणे या प्रमुख कारणांसह इतर कारणे आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून एक्सप्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सह रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस यंत्रणेने विविध उपाययोजना व संकल्पना राबविल्या आहेत. मात्र त्या सर्व कुचकामी ठरल्या असल्या तरी यामुळे काही प्रमाणात अपघातांवर अंकुश राहिल्याने अपघातांच्या संख्येत घट झाली आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे दुर्दैवाने या मार्गाला मृत्यूंचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे.

या मार्गाची हि ओळख नाहीशी करण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलीस यंत्रणेने कंबर कसत विविध उपाययोजना व प्रयोग राबविले आहे. त्यापैकी आता लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांना लेनची शिस्त लावण्यासाठी एक्सप्रेस वेवरील पहिल्या लेनवर हाईट बॅरिअर बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. खोपोली ते लोणावळा दरम्यान ५६ ठिकाणी हे बँरिअर लावण्यात येणार अाहेत.

23 Jun 2017
 
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविकेचा विनयभंग करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यासह दोघांविरुद्ध र्पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
हा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यद्वारासमोरील वाहनतळात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला.
 
कुणाल लांडगे आणि सतीश लांडगे (रा. कासारवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. कुणाल लांडगे याने भाजपच्या चिन्हावर संत तुकारामनगरमधून निवडणूक लढवली होती.
 
शिवीगाळ करत विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
 
लांडगे यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केला असून बदनामीसाठी जाणीवपूर्वक खोटी फिर्याद दिल्याचा दावा केला आहे.
पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
22 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी भाजपने महापालिकेच्या खर्चाने तब्बल 150 अधिकारी व खाते प्रमुखांना नेले, असा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे. तसेच यामुळे नागरिकांच्या कामे रखडली गेली याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याबाबत बोलताना तुपे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज काढले जात आहे. याचा भार सर्व सामान्य पुणेकर नागरिकांना सहन करावा लागणार आहे. असे असताना दुसरीकडे या कर्जरोख्याच्या कार्यक्रमासाठी 150 अभियंते व खाते प्रमुखांना महापालिकेच्या खर्चातून मुंबईला नेण्यात आले.

या पुणेकरांनी भाजपला आठ आमदार एक खासदार आणि पुणे महापालिका दिली असताना देखील समान पाणी पुरवठा योजनेसाठी कर्ज काढावे लागले आणि आज त्या कर्जासाठी टोल वाजवून मंजुरी देण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री, महापौर, महापालिका आयुक्त हे गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर महापालिकेतील 150 इंजिनअर आणि खाते प्रमुख घेऊन गेले. त्यामुळे आज महापालिकेत येणा-या कोणत्याही व्यक्तीचे काम झाले नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमाला 150 अभियंत्यांना महापालिकेच्या खर्चातून नेण्यात आले आहे. त्यांचे आजच्या दिवसाचे कामाचे वेतन देखील दिले जाणार आहे. हा कार्यक्रम राज्य शासनाशी निगडित असताना महापालिकेचे अधिकारी का घेऊन गेले ? कारण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गर्दी झाली नसती. या भीतीपोटी भाजपने अधिका-यांना घेऊन गेले, अशी टिपणीही तुपे यांनी केली.

22 Jun 2017

एमपीसी - कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत उमटले. शिवसेनेने या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

सर्व साधारण सभा चालू होताच शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज ज्या प्रकारे कर्जमाफीबाबत जे विधान केले आहे. ते निंदनीय असून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. केंद्रीयमंत्र्यांनी ही भूमिका घेणे चुकीचे असल्याचे भोसले यांनी सांगितले.

पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कर्जरोख्याच्या कार्यक्रमास, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक, अधिकारी गेल्याने सभागृहात उपस्थितांची संख्या कमी होती तसेच महापौर आणि उपमहापौर उपस्थित नसल्याने महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता मगर यांना एक सर्वसाधारण सभेसाठी महापौरांच्या जागी सभापती म्हणून बसण्याची संधी मिळाली. मात्र, नगरसेवक आणि अधिकाऱ्याच्या अल्प उपस्तिथीमुळे सभा लगेचच तहकूब करण्यात आली.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील आरक्षणामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहे. याला घरे वाचवा संघर्ष समितीने ठाम विरोध केला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संघर्ष समितीची आज (गुरुवारी) रात्री चिंचवड येथे बैठक होणार आहे.

महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे.

या जागेवर आरक्षण टाकताना पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण आणि पालिकेने कायद्याने ग्रामसभा बोलवून रहिवाशांचे मत जाणून घेणे गरजेचे होते. त्यानंतरच आरक्षण टाकणे गरजेचे होते. पंरतु, चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले आहे, असा आरोप संघर्ष समितीच्या सदस्यांनी केला.

पालिका आणि प्राधिकरणाच्या या चुकीमुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर आणि बळवंतनगर येथील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहेत. घरे पाडण्यास चिंचवड ग्रामस्थ आणि रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, रहिवाशी यांची बुधवारी रात्री बैठक होणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

22 Jun 2017


आयुक्त म्हणतात ताडपत्री घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थायीने नेमलेल्या समितीची कल्पना नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आषाढी वारीतील वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी बुधवारी (दि. 21) त्रिसदस्यीय समिती नेमल्याचे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तर, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ताडपत्री घोटाळ्याची चौकशी झाली असून आता कोणतीही समिती नेमली नाही, असे त्यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारीत सहभागी होणा-या वारक-यांना भेटवस्तू देण्यात येते. यंदा वारक-यांना ताडपत्री भेटवस्तू देण्यात आली आहे. पंरतु, ताडपत्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बाजारात 2 हजार 400 रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देणा-या भाजपने तीन हजार 412 रुपयांना खरेदी केली आहे.

650 ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. त्यासाठी वाढीव दरानुसार 22 लाख 17 हजार 800  रुपये खर्च अपेक्षित होता. तर, बाजार भावानुसार 2 हजार 400 रुपये दर अपेक्षित धरल्यास 15 लाख 60 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये सुमारे सहा लाख 57 हजार 800 रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा, आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि.14) रोजी केला.

निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्रिसदस्यीय नेमली होती. यामध्ये अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि दक्षता समितीचे कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांचा समावेश होता. समितीच्या अहवालानुसार मिळालेली माहिती आपण गुरुवारी (दि.15) रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे त्याची चौकशी संपली असून आता कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ताडपत्रीच्या बीलाची पडताळणी, निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब का झाला. विलंबाची कारणमीमांसा करण्यासाठी  त्रिसदस्यीय समिती नेमली असल्याचे बुधवारी (दि. 21) स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले होते. तसेच चौकशीचा सविस्तर अहवाल येईपर्यंत पुरवठा दराचे बील अदा करण्यात येणार नाही. तसेच महिनाभरात समितीचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचेही, सावळे म्हणाल्या होत्या.

याबाबत आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता स्थायी समितीने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

22 Jun 2017


शिवसेना नगरसेवक प्रमोद भानगिरे यांची फेर निविदेची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने काढलेल्या ‘सीएफसी’च्या निविदा कमी दर असताना त्यांना डावलण्यात आले आहे. त्याऐवजी जास्त दर असणाऱ्या कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यामुळे या निविदाप्रक्रियेचा फेरविचार करावा, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीला दिला आहे.

स्थायी समितीचा येत्या 28 जून रोजी होणा-या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेवक अविनाश बागवे आणि भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘सीएफसी’साठी निविदा काढली. या कामासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत पुणे पालिकेस प्रति ट्रान्झॅक्शन 12 रुपये मिळणार आहे. व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रति ट्रान्झॅक्शन 33 रुपये 70 पैसे दर दिला. विदर्भ इन्फोटेक आणि एजीएस ट्रॅन्स्टेट टेक्नॉलॉजी या दोन कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरली होती. विदर्भ इन्फोटेक प्रा. लि. यांनी या कामासाठी प्रति ट्रान्झॅक्शन 25 रुपये दर दिला होता.

आयसीआयसीआय बँकेमार्फत पुणे पालिकेस प्रति ट्रान्झॅक्शन मिळणारे 12 रुपये वजा केल्यास हे काम अवघ्या 13 रुपयांमध्ये होणार होते. मात्र, पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिका-यांनी विदर्भ इन्फोटेक आणि एजीएस ट्रॅन्सेट टेक्नॉलॉजी यांचे तांत्रिक गुण 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगून निविदा फेटाळली. पालिकेचे ‘सीएफसी’मध्ये वर्षभरात 10 लाख ग्राहकांचे किमान 35 लाख ट्रान्झॅक्शन गृहित धरले, तरी यामध्ये 12 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केला आहे. या कामासाठी पालिकेकडे अन्य बँका उपलब्ध असताना केवळ आयसीआयसीआय बँकच का? असा सवालही उपस्थित केला आहे. त्यामुळे या निविदाप्रक्रियेचा फेरविचार करावा, असे भानगिरे यांनी सांगितले.

22 Jun 2017


पुणे महापालिकेने काढलेल्या कर्ज रोख्याच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज -  पुणे महापालिकेच्या 24 तास पाणी पुरवठा या महत्वाकांक्षी योजनेसाठी 2 हजार 264 कोटींचे कर्ज रोखे महापालिकेतर्फे उभारण्यात येत आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाच्या डोक्यावर साडे सात हजारांचे कर्ज असणार आहे, असा आरोप काँग्रेस गट नेते अरविंद शिंदे यांनी केला.

कर्ज रोख्याच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या वतीने मंडईमधील टिळक पुतळ्याजवळ अंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणेकरांना कर्ज बाजारी करणाऱ्या पालिकेतील सत्ताधा-यांचा निषेध केला. या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, काँग्रेस ज्येष्ठ नेते अभय छाजेड, राष्टवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सह कॉग्रेस, राष्टवादीचे नगरसेवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या महत्वकांक्षी 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी 2 हजार 264 कोटीचे कर्ज रोखे पुढील 5 वर्षात उभारण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्यातील 200 कोटीच्या कर्ज रोख्याच्या नोंदणीचा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारात सकाळी पार पडला. मात्र ही योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अर्थसहाय्य घेऊन ही योजना पूर्ण करावी, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मात्र, पालिकेने योजनेची रक्कम कर्ज रोख्याच्या माध्यमातून उभारण्याचे निश्चित करून आज कर्ज रोख्याची नोंदणी मुंबई शेअर मार्केटमध्ये केली.

22 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड, केएसबी चौक येथे बांधलेल्या पुलाच्या उजव्या बाजूकडील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवारी) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग  बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते तसेच शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, तसेच नगरसेविका मंगला कदम, गीता मंचरकर, वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, केशव घोळवे, तुषार हिंगे, सह आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.

22 Jun 2017

एमपीसी न्यूज - 'सारथी' हेल्पलाईनवरील आलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील नागरिकांच्या तक्रारींसाठी 'सारथी' हेल्पलाईन सुरू केली. नागरिक घरबसल्या आपल्या समस्या, तक्रारी सारथीवर मांडत होते. परंतु, परदेशी यांची बदली झाल्यानंतर आलेल्या एकाही आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिले नाही. सारथीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. परंतु, प्रशासनाकडून त्याचे निराकरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

'सारथी' हेल्पलाईन शहराचा मानदंड आहे, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले होते. तसेच त्यांनी सारथी हेल्पलाईनवर अधिक लक्ष दिले आहे. सारथीवरील तक्रारींचा वेळेत निपटारा करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक आपल्या परिसरातील तक्रारी घरबसल्या 'सारथी' हेल्पलाईनवर करतात. याबाबत आयुक्त हर्डीकर यांच्याकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. आयुक्त हर्डीकर यांनी याची गंभीर दखल घेत 'सारथी' हेल्पलाईनवरील तक्रारींचा वेळेत आणि तत्परतेने निपटारा करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिका-यांना तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ड्रेसकोड केला होता. फिकट निळा शर्ट होता. परंतु, ते कापड मिळत नसल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांच्या शर्टचा रंग बदलून पांढरा केला आहे.

Page 4 of 184
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start