• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सात कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

पहिल्या मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या अथवा पहिली मुलगी असताना दुस-या मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलांना अर्थसहाय्य देण्याची योजना पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यासाठी 76 पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी येणा-या 8 लाख 35 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

महिलांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी त्यांच्या ज्ञान व कौशल्यात वाढ व्हावी व महिलांनी नोकरी व व्यवसाय करून त्याच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून ओला व सुका कचरा विलगीकरण, सॅनिटरी नॅपकिन बनवण्याच्या प्रशिक्षणासहीत विविध प्रकारचे प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीकामीच्या धोरणास व प्रत्यक्ष होणा-या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

'ड' प्रभागातील नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे या कामासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 83  हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. 'क' प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे या कामासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 83 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तळवडे, चिखली गायरान, वाघेश्वर मंदिर परिसर च-होली व मिलिटरी डेअरी फार्म पिंपरी या ठिकाणी नव्याने 10 हजार  वृक्षारोपण करून वृक्षारोपणाची देखभाल व संरक्षण करण्यासाठी येणा-या सुमारे 61 लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व पक्षालय देखभाल व संरक्षण करण्यासाठी येणा-या सुमारे 25 लाख 88 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी विभागाकडील आयटीआय आयएमएस सिस्टिम प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता आवश्यक संगणक यंत्रणा हार्डवेअर खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 49 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखली मैलाशुद्धीकरण केंद्र उद्यान देखभाल संरक्षण करण्यासाठी    येणा-या सुमारे 32 लाख 27  हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयातील एकूण 8302 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 शालेय गणवेश देण्यास व त्यासाठी येणा-या सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथे टप्पा क्रमांक 1 आणि 2 योजनेमधील 50 एमएलडी पंपाकरिता पर्यायी पंपसेट बदलण्याकरिता व अनुषांगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 12 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच निरोगी जीवन व उत्साही मन ठेवण्यासाठी नियमित योगासने करणे जरुरी आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जागतिक योग दिनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. शरद हर्डीकर, व्याख्याते पंडित वसंतराव गाडगीळ, प्रा. विदुला शेंडे, इन्स्टिट्यूट ऑफ योगाचे अध्यक्ष विश्वास शेंडे आदी उपस्थित होते.

महापौर नितीन काळजे म्हणाले की, योगाचा उदय प्राचीन काळात भारतात झाला असून योगा हे व्यायामाचे उत्तम साधन आहे. दररोज योगासन करून आपल्या संस्कृतीचे जतन करावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानव घर आणि घरातील काम यात व्यस्त झाला असल्याने त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी कबड्डी, हुतुतू, आट्यापाट्या, खो-खो अशा प्रकारच्या खेळांमुळे व्यायाम होत होता. योगा हा स्मरणशक्ती, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी व्यायाम आहे. भारतातील योगा अभ्यासाचा आदर्श परदेशातील नागरिकांनी घेतला असून ते त्यावर अभ्यास करीत आहेत. महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असेही महापौर काळजे यावेळी म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले की, योगाची साधना व जोपासना केली तर आरोग्य चांगले राहते. योगदिन साजरा करण्यापेक्षा आपण योगा अभ्यास किती आत्मसात केला हे महत्वाचे आहे. दररोज स्वतःसाठी 15 मिनिटे द्यावे. पहाटे वेळ नसेल तर सकाळी 10 वाजता ही योगा करू शकतो. प्रदूषणामुळे आरोग्य बिघडते तेव्हा पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी प्रत्येक महिलेने आज किमान एक झाड लावावे. योग दिनानिमित्त महिलांचा सत्कार केला जातोय ही कौतुकास्पद बाब आहे. कुटुंबाचे संगोपण करताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. तेव्हा शरीरप्रकृती चांगली राहण्यासाठी महिलांनी दररोज योगा करावा. योगा अभ्यास युनोमध्ये पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, घरकाम करताना महिलांचा व्यायाम होत असतो. महिलांनी वेळाचे नियोजन करावे व योगा करून स्वतःचे आरोग्य संभाळले पाहिजे. स्वतःच्या घराकडे बघताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. महिला सबलीकरणासाठी महिलांनी सरकारी योजनामध्ये सहभाग घेऊन नवसाक्षर होणे गरजेचे आहे. महिलांमध्ये सिविअर अॅनीमियाचे प्रमाण 35 टक्के आहे. योगा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा. देश सक्षम करण्यासाठी महिलांनी आपले आरोग्य चांगले ठेवयला पाहिजे. महिलांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना चांगल्या प्रकारे योगा करता यावा यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, योग साधनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या महापालिका हद्दीतील पाच मुलींचा सत्कार या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आला. साक्षी गणेश महाले हिने 24 व्या योगा वर्ल्ड कप मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळविले आहे. तसेच रुपाली गणेश तरवडे हिने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळविले असून तिची जुलै 2017 मध्ये सिंगापूर येथे होणा-या 7 व्या आशियायी योग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

श्रेया शंकर कंधारे हिने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धा रांची सिल्व्हर मेडल मिळविले असून तिची जुलै 2017 मध्ये सिंगापूर येथे होणा-या 7 व्या आशियायी योग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुपूर लक्ष्मण मोरे हिने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळविले असून तिची जुलै 2017 मध्ये सिंगापूर येथे होणा-या 7 व्या आशियायी योग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच संचिता भोईर हिने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळविले असून तिची जुलै 2017 मध्ये सिंगापूर येथे होणा-या 7 व्या आशियायी योग चॅपियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व रमेश भोसले यांनी केले. तर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आभार  मानले.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - रस्ते, पदपथावर बेकायदेशीर अतिक्रमण करत आपले बस्तान बसविणार्‍या अनधिकृत पथारी व्यावसायिकांना जरब बसविण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रक्कमेची पुनर्रचना करून त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला त्याला आज मंजुरी देण्यात आली.


शहरातील सर्व रस्ते, पदपथ आणि प्रमुख चौकांना अतिक्रमणांचा फास पडला आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे सध्या शहरातील चारही परिमंडळांमध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे. या कारवाईसाठी प्रत्येक परिमंडळाला दररोज 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र, अनधिकृत पथारी व्यावसायिकांकडून वसूल केल्या जाणार्‍या 500 रुपये दंडामुळे हा खर्च भरून निघत नाही. तसेच अनेक पथारी व्यावसायिक 500 रुपयाचा दंड भरून पुन्हा दुसर्‍या दिवशी पदपथावर आपली दुकाने थाटतात. त्यामुळे अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कारवाईसाठी येणारा खर्च पूर्णपणे वसूल करण्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ करून ती 5000 करण्याचा फेर प्रस्ताव अतिक्रमण विभागाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाडीला 5 हजारांचा दंडखाद्यपदार्थांच्या गाडीला सध्या पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. तो वाढवून पाच हजार रुपये करण्यात यावा, असे या प्रस्तावात सुचवले आहे. याशिवाय बांधकाम पाडण्याच्या शुल्कातही भरघोस वाढ केली आहे. तसेच कच्चे आणि पक्के बांधकाम काढण्यासाठी दहा पट शुल्क वाढवण्यात यावा, असे स्थायी समितीसमोर प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

प्रचलित  दर

मान्यतेसाठी ठेवलेले दर

हलकी वाहने 

2500 रुपये

15 हजार रुपये

रस्त्यावर बंद पडलेली वाहने

2500 रुपये

05 हजार रुपये

तीन आणि सहा आसनी रिक्षा

1500 रुपये

10 हजार रुपये

स्वयंचलित दुचाकी

01 हजार रुपये

05 हजार रुपये

लोखंडी/ लाकडी स्टॉल

01 हजार रुपये

10 हजार रुपये

अंडाभुर्जी, चायनीज वडापावच्या गाड्या

500 रुपये

05 हजार रुपये

पथारी व्यावसायिक

500 रुपये

05 हजार रुपये

दुकानदारांचे दुकानापुढील अतिक्रमण

1-5 हजार रुपये

05 हजार रुपये

कच्चे बांधकाम काढणे (100 फुटांच्या आतील)

01 हजार रुपये

10 हजार रुपये

पक्के बांधकाम काढणे (100 फुटांच्या आतील)

02 हजार रुपये

20 हजार रुपये

अवजड वाहने

05 हजार रुपये

35 हजार रुपये

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्याला दिलेली सरकारी मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे आपण खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली असून स्वत: नवीन मोटार मागणार नाही. प्रशासनाला वाटल्यास त्यांनी नवीन मोटार खरेदी करून द्यावी, असे महापौर नितीन काळजे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसचे प्रशासनाने दिल्यास नवीन मोटार वापरणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील पदाधिका-यांना पालिकेची मोटार दिली जाते. महापौर नितीन काळजे यांनी पालिकेची सरकारी मोटार आहे. सोमवारी (दि.19) दिघी येथील महापौर काळजे गेले होते. कार्यक्रम संपवून ते पालिकेत येत असताना अचानक त्यांची मोटारमध्येच बंद पडली. त्यामुळे महापौर काळजे पालिकेत येऊ शकले नव्हते. आपल्या मोटारीची वारंवार दुरुस्ती करण्यात आली आहे. मोटार सारखीच नादुरुस्त होत आहे. याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा सांगूनही मोटार व्यवस्थित दुरुस्त केली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

मोटार नादुरुस्त असल्यामुळे महापौर काळजे यांनी पालिकेची मोटार वापरण्यास बंद केले असून खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,  महापालिकेने आपल्याला दिलेली सरकारी मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे आपण खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली असून स्वत: नवीन मोटार मागणार नाही. प्रशासनाला वाटल्यास त्यांनी नवीन मोटार खरेदी करून द्यावी.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, महापौर शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांना शहरातील अनेक कार्यक्रमांना जावे लागते. महापौरांना नवीन मोटारीची आवश्यकता असून यामध्ये आपण स्वत: मध्यस्थी करून महापौरांसाठी नवीन मोटार घेऊन देणार आहे.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आज (बुधवारी) त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ताडपत्री खरेदीत जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि दक्षता समितीचे कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची  त्रिसदस्यीय समिती ताडपत्री घोटाळ्याची चौकशी करणार आहे. ताडपत्रीच्या बिलाची पडताळणी, निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब का झाला. विलंबाची कारणमीमांसा ही त्रिसदस्यीय समिती करणार आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल येईपर्यंत पुरवठा दराचे बील अदा करण्यात येणार नाही. तसेच महिनाभरात समितीचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचेही, सावळे यांनी सांगितले.

बाजारात 2 हजार 400 रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा नारा देणा-या भाजपने तीन हजार 412 रुपयांना खरेदी केली आहे. 650 ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. त्यासाठी वाढीव दरानुसार 22 लाख 17 हजार 800  रुपये खर्च अपेक्षित होता. तर, बाजार भावानुसार 2 हजार 400 रुपये दर अपेक्षित धरल्यास 15 लाख 60 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये सुमारे सहा लाख 57 हजार आठशे रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा, आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी केला आहे.

ताडपत्री खरेदी 21 लाखाच्या आत असल्यामुळे पालिका आयुक्तांच्या अधिकारात करण्यात आली आहे. ताडपत्री खरेदीचा विषय माहितीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. परंतु, ताडपत्री खरेदी प्रकरणाची सविस्तर चौकशी झाल्याशिवाय संबंधित पुरवठादाराला बील अदा करण्यात येऊ नये, अशा सूचना स्थायी समितीने अधिका-यांना दिल्या आहेत.

21 Jun 2017


शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजप घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य आणि स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) या कंपनी संचालक पदावर शिवसेने दिलेल्या अधिकृत नावांऐवजी परस्पर दुस-याच नगरसेवकांची नेमणूक केल्याचा गंभीर आरोप, शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते  राहुल कलाटे यांनी केला आहे. भाजपने शिवसेना नगरसेवकांची नावे कोणाला विचारून घेतली आहेत. शिवसेनेच्या निर्णयात हस्तक्षेप करून भाजप दादागिरी करत असून शिवसेनेत फूट पाडण्याचे घाणेरडे राजकारण करीत आहे, असाही आरोप कलाटे यांनी केला आहे.

याबाबत कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्यातील सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.20) पार पडली. या सभेत वृक्ष प्राधिकरण समितीवर आणि स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) या कंपनीवर सदस्य निवडण्यात आले. शिवसेनेचा गटनेता म्हणून आमच्या संख्याबळानुसार निवड करण्यात    येणा-या नगरसेवकांची नावे असणारा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांची सही असलेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षादेश असणारे पत्र आपण आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले होते. त्यात स्मार्ट सिटी संचालकपदासाठी राहुल कलाटे यांचे तर वृक्ष प्राधिकरण समितीसाठी अश्विनी चिंचवडे यांची निवड करण्याची स्पष्ट सूचना आहे.

प्रत्यक्षात मात्र महापौर नितीन काळजे यांनी त्यापेक्षा वेगळ्याच नगरसेवकांची नेमणूक जाहीर केली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही'वर संचालक म्हणून नगरसेवक प्रमोद कुटे यांची आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर अॅड. सचिन भोसले यांची नियुक्ती केली. या दोन्ही नावाला पक्षाचा शहरप्रमुख व पालिकेतील गटनेता म्हणून माझा कसलाही विरोध नाही. परंतु, कोणत्याही समितीवर सदस्यांची निवड करताना संख्याबळानुसार निवड केली जाते. प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या पक्षांची नावे महापौरांकडे देत असतात. त्यानंतर महापौर ती नावे जाहीर करतात. पण सत्ताधारी भाजपने हे सर्व संकेत पायदळी तुडवले आहेत, असा आरोप कलाटे यांनी केला आहे.

स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही'वर आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची निवड करताना सभागृहनेते एकनाथ पवार आणि सत्ताधारी भाजपने शिवसेनेच्या नगरसेवकांची कोणालाही न विचारता नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या निर्णयात भाजप हस्तक्षेप करत आहे. शिवसेनेच्या निर्णय घेण्याच्या अधिकारावर भाजप दादागिरी करून अतिक्रमण करीत आहे. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करीत आहे, असा गंभीर आरोपही कलाटे यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, गटनेत्यांना विचारून नावे दिली पाहिजेत, असा कुठलाही नियम नाही. नियमात जे बसेल ते केले आहे. कलाटे यांनी आमच्यासोबत चांगले संबंध ठेवले असते तर ही वेळ आलीच नसती. शिवसेनेत अगोदरच फूट पडली आहे. शिवसेना फोडण्यात आम्हाला कसलाही रस नाही.

21 Jun 2017


मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी वर्षाला 48 लाख खर्च

एमपीसी न्यूज - महापालिका हद्दीतील मोकाट डुकरांच्या नियंत्रणाचे वर्षभराचे काम खासगी संस्थेला 48 लाख रुपयांना देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मंजुरी दिली आहे. या प्रस्तावामध्ये एक डुक्कर पकडण्यासाठी 913 रुपये दर या निविदेत प्रस्तावित केला आहे.

उपनगरांमध्ये मोकाट डुकरांमुळे नागरिकांना उपद्रव होत असून मालमत्तेचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे डुक्करपालन करणार्‍या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते.  मात्र, त्यानंतरही हा उपद्रव कमी झालेला नाही. डुकरांचा उपद्रव थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

आरोग्य खात्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता, तेथे खासगी संस्थेमार्फत डुक्कर नियंत्रणाचे काम केले जात आहे, असे दिसून आले. या संस्थेद्वारे पकडण्यात येणारी डुकरे कत्तलखान्यात लिलावाद्वारे विकली जात असून त्यासाठी दर निश्चित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही मोकाट डुक्करांच्या नियंत्रणाचे काम प्रायोगिक तत्वावर मयूर पिगरी फार्म या खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्यानंतर  पालिका प्रशासनाकडून मोकाट डुकरांच्या नियंत्रणाचे काम वर्षभरासाठी खासगी संस्थेला देण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

यामध्ये मयूर पिगरी या संस्थेकडून कमी रक्कमेची निविदा सादर करण्यात आली आहे. या निविदेत एक डुक्कर पकडण्यासाठी 913 रुपये दर नमूद केला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंदाजपत्रकात मोकाट डुकरांच्या बंदोबस्तासाठी करण्यात आलेल्या तरतुदीनुसार मोकाट डुकरांच्या नियंत्रणाचे 48 लाख रुपयांच्या कामाला वर्षभरासाठी खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव आरोग्य खात्याने स्थायी समितीसाठी पुढे ठेवला होता. याला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन, रुग्णसेविका, हाऊसकिपिंग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, सुरक्षारक्षक, सेंद्रिय खत तयार करणे तसेच प्लास्टिकपासून ग्रॅन्युएल्स बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य विकासांतर्गत तासिका तत्त्वावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज (बुधवारी) स्थायी समितीमध्ये घेण्यात आला.


पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे होत्या. विषय पत्रिकेवर 30 विषय होते. त्यातील 10 अवलोकनाचे आणि 20 मंजुरीचे होते. 20 विषय मंजूर करण्यात आले आहेत.

महापालिकेमार्फत नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिला, मुली व मुलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. गेल्या चार वर्षांपासून महिलांसाठी ज्ञानकौशल्य वाढकार्यक्रम ही योजना राबविली जाते. हे काम मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आले आहे.

ही संस्था महिलांना 20 प्रकारचे प्रशिक्षण देते. प्रशिक्षणासाठी येणा-या महिलांना ओला व सुका कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण मोफत देणे संस्थेला बंधनकारक करण्याचा आणि या संस्थेला 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवला होता.

महापालिकेमार्फत महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, रुग्णसेविका, हाऊसकिपिंग, सुरक्षारक्षक, प्लास्टिकपासून ग्रॅन्युएल्स बनविणे, सेंद्रिय खत तयार करण्यासारखे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सावळे यांनी सांगितले.

21 Jun 2017


नगरसेवक अमित गावडे आयोजित कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज - आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या निमित्ताने देशभरात उत्साहाने योग दिन साजरा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये श्री अम्बिका कुटीर व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली. यानंतर 2015 पासून हा दिवस जगभरात साजरा केला जात असून यंदाचे तिसरे वर्ष आहे. या निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात श्री अम्बिका कुटीर व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रामदेवी वर्टी सभागृहात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे  मुख्य संयोजन नगरसेवक अमित गावडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू चंद्रकांत पांगारे आणि रमेश मांडवकर यांच्यासह योग शिक्षक विमल काणे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मंगेश वर्टीकर, श्री अम्बिका कुटीर ठाणे अध्यक्ष सीमा वैध्य, आणि उपाध्यक्ष शुभांगी म्हात्रे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना योगाचे महत्व सांगण्यात आले. तसेच योग प्रकारची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.

gavde yoga

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटी आणि 10 हजार रुपये आगाऊ उचलीचे निकष मान्य नसल्याने राज्यातील शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून पुणे शहरातील बालगंधर्व चौकात शेतकरी संघटनेने शासनाच्या जीआरची होळी केली.

यावेळी शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार, नारायम जाधव, रवी पवार, सत्यशोधक शेतकरी चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. शेतक-यांना कर्जमाफीसाठी शासनाने घालून दिलेल्या अटी जाचक असल्याचे सांगत राज्यभर शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात येत आहे. पुण्यातही याचे पडसाद पाहायला मिळाले. पुण्यात सुकाणू समितीच्या वतीने बालगंधर्व चौकात शासनाच्या अध्यादेशची होळी करण्यात आली आहे. एकंदरीतच सरकार आणि शेतकरी संघटनांमधील वाढता तणाव पाहता राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याचे चिन्हे दिसत आहेत.

Page 6 of 184
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start