• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथील ग्रेड सेपरेटरमध्ये मोठ्या वाहनांना बंदी असताना देखील वारंवार टेम्पो, ट्रक यासारख्या मोठ्या गाड्या घुसतात व त्या पुढे पिंपरी चौकात किंवा चिंचवड चौकात पुलाखाली अडकतात. ही घटना पिंपरी-चिंचवडकरांना तशी नवी नाही कारण महिनाभराच्या फरकाने अशा घटना होतातच. तसेच आजही (बुधवारी) घडले. आज तर चक्क सहा बोअरवेलच्या गाड्या या ग्रेडसेपरेटमध्ये घुसल्या यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक थांबवावी लागली.

हैद्राबादकडून मुंबईकडे जाणा-या या 6 बोअरवेलच्या गाड्या नाशिकफाटा येथून ग्रेड सेपरेटरमध्ये घुसल्या. त्या खराळवाडीपर्यंत अडथळ्याशिवाय आल्या. मात्र, ग्रेडसेप्रेटर मधून साडे चार मिटर उंचीच्या गाड्या जाऊ शकत असल्याने या गाड्या पिंपरी चौकात येताच चालकास गाडी पुढे जात नसल्याचे लक्षात आल्याने गाड्या तेथेच उभ्या केल्या. त्यामुळे त्यांच्या मागे इतर गाड्यांची रीघ लागली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी इतर गाडयांना व या सहा गाड्यांना मागे घेत खराळवाडी येथून त्यांना पुन्हा सर्व्हिस रोडवर आणले. मात्र, या सा-या खाटाटोपामध्ये  काही काळ पुण्यावरून निगडीकडे जाणारी वाहतूक थांबवावी लागली. तूर्तास वाहतुक सुरळीत झालेली आहे.

या आधीही कंटेनर, क्रेन अशा गाड्या ग्रेडसेपरेटरमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी वाहतूक प्रशासन व वाहन चालकांनीही नियमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा सुरळीत वाहतुकीसाठी ओळखला जाणारा ग्रेडसेपरेटर अशा घटनांमुळे अडथळ्यांचा रस्ता म्हणून ओळखला जाईल.

trffic pimpri

trffic pimpri 5

trffic pimpri 1

trffic pimpri 3

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांच्या विधवांना आणि शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आलेल्या शहीद जवानांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर आकारण्यात येणार्‍या करात सवलत देण्याचा प्रस्तावाला पुणे महापालिका स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शौर्यपदक धारक सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवरील करातून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची कार्यवाही महापालिकेतर्फे केली जात आहे.

माजी सैनिकांच्या विधवा आणि शौर्यपदक धारक जवानांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातून सवलत देण्याची मागणी माजी सैनिकांच्या विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार 7 एप्रिल 2016 रोजी नगरविकास खात्याने या संदर्भातील निर्णयास मान्यता दिली होती. या शासन निर्णयानंतर याची पुढील कार्यवाही करण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषद यांना आदेश प्राप्त झाले होते.

त्यानुसार, माजी सैनिकांच्या विधवा आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेले शौर्यपदकधारक अविवाहित जवान यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातून म्हणजेच सर्वसाधारण कर, पाणीपट्टी, सफाई कर, अग्निशामक कर, वृक्षसंवर्धन कर, विशेष सफाई कर, मनपा शिक्षण उपकर आदी करातून सवलत देण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीमार्फत मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - दिघी-बोपखेल परिसरातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्रकल्प त्वरीत राबविण्यात यावा. तसेच एसटीपीसाठी आरक्षित असलेली बोपखेलमधील जागा पिंपरी पालिकेच्या नगररचना विभागाने त्वरीत ताब्यात घ्यावी, अशी मागणी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत गायकवाड यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहर परिसरातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध प्रभागामध्ये एसटीपी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दिघी आणि बोपखेल परिसतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने बोपखेलमध्ये आरक्षित जागेवर एसटीपी उभारण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून तरतूद करून ही जागा अजूनपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही.

दिघी आणि बोपखेल परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरातील सांडपाणी सरळ नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत जागा ताब्यात घेऊन एसटीपी उभारण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले तसेच चेतन घुले, उदय गायकवाड यांनी निवेदनाद्‌वारे केली आहे.

21 Jun 2017

टप्प्या-टप्प्याने समावेश करणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत 34 गावे महापालिकेत समावेश करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तर गावांचा टप्या-टप्याने समावेश करून घेऊ, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुबंईत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दी लगतची 34 गावे समावेश करण्या विषयी उच्च न्यायालयाने गावे समाविष्ट करण्याच्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान तीन आठवडयामधे निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रलयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये 34 गावे समावेशाबाबत आज महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांनी गावे समविष्ठ करण्याबाबत 12 जूनला राज्य शासनाकडे अहवाल सादर केला असून या अहवालावर अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याने या कामासाठी थोडासा कालावधी देण्यात यावा, असे शासनाकडून न्यायालयास सांगण्यात आले होते. त्याचबरोबर गावे समाविष्ट करण्याबाबत आमचा कल असल्याचे या अगोदरच न्यायालयात सांगितले होते.

त्यामुळे यंदाच्या 34 पैकी 19 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तर आता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
21 Jun 2017

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना, आपले चिंचवड व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (बुधवारी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.  यामध्ये चिंचवड गाव येथील सुमारे 350 साधक सहभागी झाले होते.

चापेकर वाडा येथे सकाळी सहा ते सात या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना योग शिक्षक दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर यांनी  योगाचे धडे दिले. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संदीप जाधव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे  सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आपले चिंचवड व्यासपीठचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, क्रांतीवीर चापेकर समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाहक अॅड. सतिश गोरडे, सहकार्यवाहक रवी नामदे, सदस्य नितीन बारणे आदी उपस्थित होते.

यावेळी उचगावकर यांनी पुरक हालचालीमध्ये ताडासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीमध्ये भद्रासन, शेषांकासन, वक्रासन, विपरीतशय स्थितीत मकरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन,  शवासन, प्राणायाममध्ये कपालभारती, ब्राम्हरी प्राणायाम, ध्यान आदी प्रकार घेतले. यावेळी 350 साधकांनी याचा लाभ घेतला. यावेळी उचगावकर यांनी योगाची माहिती व फायदे उपस्थितांना सांगितले.

तर संदीप जाधव यांनी आपले मतव्यक्त करताना म्हटले की, योग ही भारताची प्राचीन संस्कृती आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य निट राहण्यास मदत होते. गेल्या तीन वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही कला व व्यायाम प्रकार जगभर परसला व त्याला प्रसिद्धी मिळाली, असेही जाधव यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश गोरडे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन चिंचवडे यांनी केले. तसेच आभार रवी नामदे यांनी मानले.

chaphekar yoga din

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या रिक्त झालेल्या एका जागेवर  भाजपचे नगरसेवक सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. याबाबतची अधिकृत घोषणा महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (दि.20) झालेल्या सर्वसाधारणत सभेत केली.

पिंपरी महापालिकेत पाच समित्या आहेत. स्थायी समिती, विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या पाच समित्या आहेत. त्यापैकी स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड केली जाते. बाकीच्या समित्यांवर प्रत्येकी 9 नगरसेवक सदस्य म्हणून निवडले जातात. संख्याबळानूसार भाजप पाच, राष्ट्रवादी तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे.

विधी समितीवर भाजपतर्फे शितल शिंदे यांची निवड करण्यात आली होती. परंतु, त्यांनी प्रभागात काम करण्यासाठी समिती सदस्यपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे विधी समितीची एक जागा रिक्त होती. त्यांच्या जागी सचिन चिंचवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सचिन चिंचवडे यांच्या निवडीबद्दल महापौर काळजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

21 Jun 2017


एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यासाठी योग्य त्या व्यवस्था न केल्याच्या कारणावरून महापौर टिळक व प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शिवसेना व काँग्रेसने आज (बुधवार) पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेचा त्याग केला.

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामाला असताना वारकऱ्यांच्या सोई सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रश्न शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी मुख्यसभेत उपस्थित केला. यानंतर काँग्रेस, राष्टवादीच्या सभासदांनी देखील प्रशासनाचा निषेध व्यक्त करत वारक-यांना पिण्याच्या पाण्याची शौचालयाची, राहण्याची अत्यंत तोकडी व्यवस्था प्रशासनाने केली असल्याचे निदर्शनास आणून दिले याबाबत प्रशासनाला खुलासा मागितला.

प्रशासनाकडून वारक-यांची व्यवस्था योग्य पद्धतीने केली असल्याचा खुलासा केल्यानंतर सभागृत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन योग्य खुलासा देत नसल्याने प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसेच महापौर मुक्ता टिळक या प्रशासनास पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत शिवसेना व काँग्रेसने सभात्याग केला. मात्र ऐनवेळी राष्टवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब चांदोरे यांनी सभा त्याग करण्यास विरोध केल्याने राष्टवादीने मात्र सभा त्याग केला नही. यानंतर काही वेळातच सभा तहकूब करण्यात अली.

यावर विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले गेल्या 60 वर्षात पालखीची इतकी गैरव्यवस्था झाली नव्हती. महापालिकेने मांडव नव्हेतर झोपड्या उभारल्या होत्या. मागच्या वर्षी महापालिकेने पालखी सोहळ्यासाठी 1 कोटी 74 लाखांची तरतूद केली होती. ती तरतूद 58 लाखांवर आणण्यात आली आहेत. त्याचा परिणाम पालखी व्यवस्थेवर झाला आणि वारकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले.

काँग्रेस गट नेते अरविंद शिंदे म्हणाले की महापालिकेकडून पालखी व्यवस्थेचे अत्यंत ढिसाळ नियोजन करण्यात आले होते. याबाबत प्रशासनाला खुलासा मागितला असता प्रशासन खुलासा देत नाही आणि सत्ताधारी चर्चा करण्याची संधी देत नाही. त्यामुळे आताचे सभागृह हे अत्यंत दुर्दैवी पद्धतीने चालवण्यात येत आहे.

21 Jun 2017


पिंपरी पालिकेत नगरसेवकांसाठी मेट्रोचे सादरीकरण

एमपीसी न्यूज - दर्जेदार वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्पाची आवश्यकता आहे. परुंतु मेट्रो निगडीपर्यंत असावी. अन्यथा मेट्रोला काही अर्थ राहणार नाही. पुणे महामेट्रोने पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत मेट्रो न्यावी, अन्यथा काम होऊ देणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. तसेच मेट्रोचे नाव पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत नगरसेवकांसाठी पुन्हा मेट्रो संवादचे आयोजन करण्यात येणार आहे.


पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना मेट्रो प्रकल्पाची माहिती व्हावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी मंगळवारी (दि. 21) ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. महामेट्रोच्या सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे मेट्रोचे प्रकाश कदम, श्रीनिवास कुलकर्णी या बरोबर पिंपरी- चिंचवड महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.

मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांनी माहिती दिली.

मेट्रोने छापलेल्या पुस्तकावर पुणे मेट्रो असा उल्लेख केला आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड मेट्रो असा उल्लेख का? केला नाही, असा प्रश्न उपस्थित करत माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, पुस्तकावर पिंपरी-चिंचवडचा उल्लेख असणे गरजेचे आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे मेट्रोचे नाव करण्याची मागणी त्यांनी केली.

मेट्रो गहुंजेपर्यंत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. गहुंजे येथे किक्रेटचे मैदान आहे. गहुंजेपर्यंत मेट्रो केली असती तर त्याचा पुण्यातील नागरिकांना देखील फायदा झाला असता. परंतु, पहिल्या टप्यात पिंपरीपर्यंतच मेट्रो करण्यात येणार आहे. निगडीतील भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रो असल्याशिवाय मेट्रोचा फायदा होणार नाही. यामुळे पहिल्या टप्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणा-या प्रत्येक स्टेशनवर मुलभूत सुविधा देण्याची मागणीही कदम यांनी केली.

विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले,  मेट्रोने  पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक वारस्याचे जतन करावे. तसेच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. अन्यथा काम बंद पाडण्यात येईल. नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, मेट्रो प्रकल्प चांगला आहे. परंतु, मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी.

नगरसेविका मीनल यादव म्हणाल्या, बीआरटीसारखी मेट्रो फसवी तर होणार नाही ना? बीआरटीचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला होता. परंतु, अद्यापही बीआरटीचे काही मार्ग सुरू झाले नाहीत. मेट्रोचेही तसे होऊ नये. पहिल्या टप्यात पिंपरीपर्यंत मेट्रो करण्यात येणार आहे. परंतु, याला काही अर्थ राहणार नाही. निगडीला जाणा-या नागरिकाने पिंपरीपर्यंत येऊन पुढे रिक्षाने जायचे का? मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. अन्यथा काम बंद करण्यात येईल.

सचिन चिखले म्हणाले, मेट्रो निगडीपर्यंत व्हावी. रुपीनगर, तळवडे या भागातील नागरिकांनाही मेट्रोची सुविधा मिळाली पाहिजे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात येईल.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची भाजपचीही मागणी आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. तसेच मेट्रोबाबत अधिक चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील सात ते आठ दिवसांत नगरसेवकांसाठी पुन्हा 'मेट्रो संवाद'चे आयोजन करण्यात येणार आहे.

21 Jun 2017

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला हे सत्य आहे. परंतु अफझल खान शत्रू होता म्हणून त्याचा कोथळा काढला, तो मुसलमान होता म्हणून नाही. छत्रपतींची लढाई मुस्लिमांच्या विरोधी होती असे म्हणणं चुकीचे आहे.असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.ते पुण्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज सचित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, तेव्हा ज्ञान देण्याचे काम एका विशिष्ट समाजाकडे होते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिण्याच काम झाले आहे. वास्तविक पाहता इतिहास हा वास्तवतेच भान ठेवून लिहिला पाहिजे. चुकलेल्या व्यक्तीला शिक्षा देण्याचे काम महाराजांनी केले आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो. तेव्हा ज्ञान काही लोकांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला आणि शिवाजी महाराजांचा संघर्ष मुसलमाना पुरता मर्यादित ठेवला. 

महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितलेले शिवाजी महाराज खरे आहेत. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे महाराज हे सर्व कुळांचे प्रतिपालक आहेत. त्यांच्या सैन्यात महत्वाच्या जागेवर सगळ्याच जातीचे लोक होते.

21 Jun 2017

विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य देण्याची नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सन 2017-18 चे सुमारे 151 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंगळवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. शिक्षण मंडळ बरखास्त झाले असून शिक्षण समिती अस्तित्वात येणार आहे. 

शिक्षण मंडळाने सुमारे 151 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी सुमारे 25 कोटी रुपयांची कपात करत 125 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली होती. तथापि, तत्कालीन स्थायी समितीने आयुक्तांचे बजेट नाकारत शिक्षण मंडळाने सुचविलेले अंदाजपत्रकच अंतिम केले आहे. त्याच्यावर सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

या अंदाजपत्रकात धन्वंतरी योजनेसाठी 1 कोटी 50 लाख, विद्यार्थी गणवेश 72 लाख 50 हजार, पी.टी गणवेश 52 लाख, खेळ शाळा गणवेश 28 लाख, स्काउऊटगाईड गणवेश 5 लाख, स्वेटर खरेदी 2 कोटी 20 लाख, विद्यार्थी पादत्राणे व मोजे 1 कोटी 15 लाख, विद्यार्थी पी.टी. शुज 85 लाख, विद्यार्थी दप्तरे व पाट्या 80 लाख, पावसाळी साधने 1 कोटी 55 लाख, शालेय साहित्य 95 लाख, आधुनिक फळे 15 लाख, क्रिडा साहित्य 15 लाख, वॉटर बॉटल 45 लाख, टॅब खरेदी व प्रशिक्षण 50 लाख, फिल्टर 50 लाख, सीसीटीव्ही कॅमेरे 1 कोटी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता व विकास 70 लाख, व्यवसाय स्वाध्यायमाला 1 कोटी, ई-लर्निंग स्कूल 2 कोटी, विजरोधक यंत्रणा 25 लाख, आगरोधक यंत्रणा 50 लाख, मोठी कचरा पेटी 20 लाख आदींचा प्रामुख्याने अंदाजपत्रकात समावेश आहे. 

यावर विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका माया बारणे, सचिन चिखले, दत्ता साने यांनी चर्चा केली. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेत साहित्य देण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

Page 7 of 184
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start