• Bhausaheb_Bhoir.jpg
  • DPU1250x200.jpg
  • Mahesh_Landge.jpg
  • mpc.jpg
  • MPC_news.JPG
  • Nitin_Kalje.jpg
  • PCCO.jpg
  • Sunil_Shelke.jpg
04 Jul 2017

'नेमेचि येतो मग पावसाळा I हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा' अशी उक्ती आहे. दरवर्षी पावसाळा येतो. कधी कमी तर कधी भरपूर, अगदी सरासरीपेक्षा अधिक. उन्हाळ्याची तलखी वाढली की प्रत्येकजण पावसाच्या चिंब भिजवणाऱ्या सरींची आतुरतेने वाट पाहत असतो. केंव्हा एकदा पाऊस येतो आणि वातावरण थंड होते असे होऊन जाते. पावसाळ्यात भिजण्याची आवड नसेल तर कोणते कपडे घालावेत हा प्रश्न अनेकांना पडतो.

पावसाळी वातावरण सुरु झाले की प्रत्येक घराघरात धांदल उडालेली असते. माळ्यावर अडगळीत टाकलेले रेनकोट, छत्र्या खाली येतात. छत्र्यांची दुरुस्ती होते. किंवा सेलमध्ये नव्या छत्रीची खरेदी होते. यंदा सरासरीपेक्षा दोन ते तीन टक्के पाऊस अधिक होणार असे भाकीत हवामान खात्यावे वर्तवलेले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

आता विषय असा आहे की पावसाळ्यात कोणते कपडे घालायचे ? कारण पातळ कपडे वापरले तर हवेतील गारवा अधिक जाणवतो. पातळ कपडे लवकर वाळतात. पण संततधार पाऊस पडत असेल तर ओलाव्यामुळे प्रचंड थंडी वाजते. वूलनचे कपडे तर वापरणे शक्यच नाही. मग नेमके कोणते कपडे घालायचे असा प्रश्न साहजिकच पडतो.

पावसाळ्यात शक्यतो पातळ सुती कपडे वापरा. किंवा सिंथेटिक कपडे वापरले तरी चालतील. होजिअरीचे कपडे घातले तर उबदारपणाही मिळतो. जीन्स घालणे मात्र टाळा. कारण जीन्स भिजली की लवकर वाळत नाही. हल्ली टाईट जीन्स घालायची फॅशन असल्यामुळे एकदा ती भिजली की अंगावरून काढणे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. ऑफिसला जाताना ऊन असेल तर कधी कधी रेनकोट सोबत घ्यायला विसरतो. त्यामुळे पावसात हमखास भिजायला होते. त्यासाठी कपड्यांचा एक सेट ऑफिसमध्ये ठेवा.गडद रंगाचे कपडे वापरावेत. भिजलात किंवा कपड्यांवर चिखल उडाला तरी तो सहज दिसणार नाही, शिवाय रंग ही खराब होणार नाही.

रंग जाणारे कपडे कधीही वापरू नका. कारण रंग इतर कपड्याने लागू शकतो. त्यामुळे रंग न जाणारे, लवकर वाळणारे कपडे निवडा. थ्री-फोर्थ पँट्स, लेगिंग्ज, अँकल लेंग्थ किंवा नी लेंग्थ ड्रेसेस निवडता येतील. त्याचप्रमाणे पायात नेहमी पावसाळ्यात चालणाऱ्या चपला किंवा बूट वापरावेत. कारण चामड्याच्या पादत्राणांना बुरशी येते. बॅग्ज, पर्सेस, पाठीवरची सॅक वॉटरप्रूफ असाव्यात म्हणजे म्हणजे पैसे, कागदपत्रं सुरक्षित राहतील.

एवढा सगळा जामानिमा केल्यानंतर पावसात मनसोक्त भटकंती करा. मनात आलंच तर आपली तब्येत सांभाळून उतरून द्या हा पावसाळी पोशाख आणि चिंब भिजा या जलधारांमध्ये. मस्तपैकी वाफाळलेला चहा, गरमागरम कांदाभजी, वडापाव यांचा आस्वाद घ्या आणि या वर्षावाचा मनमुराद आनंद लुटा.

14 Mar 2017

एमपीसी न्यूज - हॅन्ड्स ऑफ इंडिया ही 2010 साली स्थापन झालेली संस्था भारतातील विविध भागातील विणकर तसेच हस्त-भरतकाम करणाऱ्या लोकांसमवेत काम करते. याच हॅन्ड्स ऑफ इंडियातर्फे महिलांसाठीचे हातांनी बनवलेले सुती वस्त्र टिळक स्मारक मंदिरात 17 ते 21 मार्चपर्यंत रोज सकाळी साडे नऊ ते रात्री साडे आठपर्यंत तुम्ही या प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.


भारतातील विविध भागातील 1500 कलाकारांच्या 50 गटांसमवेत हॅन्ड्स ऑफ इंडिया काम करते. तसेच वृंदावन, उत्तर प्रदेश येथे तब्बल 80 लोकांसमवेत ऑनलाईन वेबसाईटदेखील चालवली जाते.  हॅन्ड्स ऑफ इंडियाचे पुण्यात दरवर्षी दोन प्रदर्शन होतात. . सर्वोत्तम सुती कापडाच्या साहाय्याने हातांनी बनवण्यात आलेल्या अतिशय सुंदर वस्त्रांचे हे प्रदर्शन आहे. अंगाची लाहीलाही करून सोडणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी या वस्त्रांचा चांगलाच उपयोग पुणेकरांना होईल. यामध्ये पंजाबमधील पुलकारी, उत्तर प्रदेशातील चिकन, पॅटीवर्क व आरी, पश्चिम बंगालमधील कांथा तसेच इंग्लिश भरतकाम, बिहारमधून सुजनी काम, काश्मीरमधील लोकप्रिय सोजनी व काशिदा यांसह कर्नाटकातील कासुटी या प्रकारचे भरतकाम केलेली वस्त्रे असतील. 


खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आलेला बरामा विणकाम केलेला मेखला कुर्ता, बांधणी कुर्ता, सुती स्कर्ट, डाबका अजराख कुर्ता, ओरिसातील ब्लेंडेड डाय केलेली पाश्चिमात्य धाटणीची वस्त्रे, सण-मुहूर्तांसाठी चंदेरी सिल्क तसेच कळमकरी, मंगलगिरी, इकत, डोंगरिया, माहेश्वरी, फुलिया साड्या दुपट्टा ही हॅन्ड्स ऑफ इंडियाची विशेष उत्पादने आहेत.


हातमाग, हस्तकला हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू  मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत.
1
2 f
4 f
5 fOpen Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start