• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
24 May 2017
एमपीसी न्यूज -  लोणावळा विभागातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी नुकतीच बिट मार्शल पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.
 
 
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या आदेशान्वे बिट मार्शल संकल्पना पुणे ग्रामीण परिसरात नव्याने राबविण्यात आली असून बिट मार्शल हे दुचाकीवर असणार आहेत. यामध्ये दुचाकी चालक हे हेल्मेटधारी असून त्यांच्याकडे वॉकीटॉकी असणार आहे. तसेच गाडीला काठी, मागे बसणार्‍या कर्मचारी हा रायफलधारी असून त्यांच्याकडे अत्याधुनिक जीपीएस असणारा मोबाईल फोन, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर जॅकेट असणार आहे. 
 
 
सकाळी 9 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 9 अशी 24 तास या पथकाची ड्युटी असणार आहे. हे पथक दिवसभर शहरात गस्त घालतील. तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठेही काही घटना घडल्यास ही टीम सर्वप्रथम काही मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल होईल. जखमींना तातडीने वैद्यकिय सुविधा देतील तसेच संबंधित पोलीस ठाण्याला घटनेबाबत सुचित करतील असे त्यांच्या कामाचे स्वरुप असणार आहे. या पथकाला पुणे ग्रामीण मुख्यालयात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोणावळा शहरात दोन, ग्रामीण पोलीस ठाण्यात एक व वडगाव पोलीस ठाण्यात एक पथक असणार आहे.
 
आजपासून लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात ही पथके लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर उपस्थित होते.

23 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील रेल्वेग्राऊंडवर भरवण्यात आलेल्या टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचा सचिन तेंडुलकर चषक कार्ला येथील  प्रशातशेठ हुलावळे यांच्या मालकीचा संघ हुलावळे स्काँचर्सने पटकावला. हुलावळे स्काँचर्सने अटीतटीच्या लढतीत सागर चौधरी यांच्या के टी रायडर्स या संघाला हरवून सचिन तेंडुलकर चषक मिळवला.

चार दिवसांपासून रेल्वेग्राऊंडवर  ह्या स्पर्धेचा थरार क्रिकेट प्रेमीनां अनुभवता आला. आय पी एल प्रमाणे या सचिन तेंडुलकर चषक २०१७ स्पर्धेत एकूण सोळा संघाचा सहभागी झाले होते. प्रत्येक खेळाडूंचा लिलाव करुन संघ मालकांनी आपली टीमची निवड केली होती.

स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. ह्या सोळा संघातुन चार संघ अंतिम फेरीपर्यंत पोहचले त्यात प्रथम क्रमांक सचिन तेंडुलकर चषक कार्ला येथील उद्योजक प्रशांत हुलावळे यांच्या मालकीचा हुलावळे स्काँचर्स याने प्रथम फंलदाजी करत के टी रायडर्स संघाला आठ षटकात  ९४ धावंचे आव्हान दिले परंतू के टी रायडर्स संघ ६४ धावातच डाव गुंडळण्यात आला.  या अटीतटीच्या सामन्यात हुलावळे स्काँचर्स संघ तेंडुलकर चषकावर आपले नाव कोरले. द्वितीय क्रमांक सागर चौधरी मालकीचा केटी रायडर्स लोणावळा, तृतीय क्रमांक विकास तिकोणे वाईल्ड स्टोन मळवली संघाने मिळवला.


बेस्ट बँटस्मन राजू पेरुमल, बेस्ट बाँलर हरिष जानीरे, बेस्ट फिल्डर शहनवाज शेख व मँन आँफ द सिरीजचा मानकरी सुधीर तांडेल हा ठरला. यास्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा परिषेद सदस्य नितीन मराठे, लोणावळा नगरपालिका नगरसेवक व स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल कविश्वर, पिंपरी चिंचवड नगरपालिका माजी नगरसेवक निलेश पांढरकर, मावळ लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष यशंवत मोहोळ, साते सरंपच संदिप आगळमे, कान्हे उपसरपंच लक्ष्मण सातकर, निलेश काजळे, अमित कालेकर, सनी हुलावळे, अलताफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या स्पर्धेचे समालोचक शेख बाबा व विजय मोरे यांनी केले. पंच म्हणून सलमान शेख व विजय खडके यांनी काम पाहिले. यास्पर्धेतील प्रत्येक सामन्यात मँन आँफ द मँच ठरणा-या खेळाडुला हनीफ शेख व युनीक स्पोर्टस यांच्या वतिने जी शाँकचे घड्याळ देण्यात आले.


स्पर्धेचे आयोजन नगरसेवक निखिल कविश्वर, शहनवाज शेख, अमोल गायखे, रफिक सय्यद, परवेझ शेख, रवि व्यास, अमर आगरवाल, राजु शेख व त्यांचे सहकारी यांनी केले होते.

23 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा विभागातील पोलीस अधिकारी कर्मचा-यांसाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबीर भांगरवाडी येथील सुमित्रा हॉलमध्ये पार पडले. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 


दिवसरात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांवर कामाचा ड्युटीचा वाढता ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. याकरिता पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, मधूमेह, डोळे तपासणी, पॅथोलॉजी टेस्ट, उंची वजन आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लब डिस्ट्रीक ३१३१ च्या मेडीकल चेअरमन डाँ. नेहा कुलकर्णी, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष विनय कानेटकर, भारत पेट्रोलियम सेल्स ऑफिसर मोनालिया दत्ता, डायरेक्टर ऑफ पोलिओ विकास मैत्र आदी मान्यवर उपस्थित होते.

 

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील, लोण‍ावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, बालाजी गायकवाड आदी पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचारी या शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेतली.

 

कामाच्या ताणतणावामुळे पोलिसांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुलर्क्ष होते. आरोग्य तपासणी शिबिरामुळे अधिकारी कर्मचा-यांनी आपल्या शरिरांबाबत माहिती उपलब्ध झाल्याने पोलिसांना स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवणे शक्य होणार आहे तसेच कोणाला काही आजार असल्यास त्यांचे वेळीच निराकरण करण्यास मदत होईल असा आशावाद यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी व्यक्त केला.

23 May 2017

एमपीसी न्यूज - खोट्या, बनावट पावत्या करारनामे तयार करुन त्याद्वारे मिळकत धारकाची जागा हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍या सहा जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


याप्रकरणी गिरीमोहन पट्टपारा थंकपान (वय 45, रा. मिस्टिका हॉटेल, जुना खंडाळा) यांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन डॉ. जीवन बाबुलाल जैन (रा. कल्पतरु हबितात, लालबाग मुंबई), सुरेश संगरमल सोळंकी (रा. मुंबई), सुरेश काळुराम पुनामिया (रा. साराबाई बिल्डिंग, लालबाग मुंबई), आनंद उत्तम कदम (आशरा रेसिडेन्सि, पोखरण ठाणे), श्रीमती उज्जवला देशमुख (वर्धमान चेंबर, कावासजी पटेल स्ट्रिट, फोर्डा मुंबई), रवींद्र पुनामिया (रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2010 ते 2015 या कालावधीमध्ये वरील आरोपींनी संगनमत करुन गिरीमोहन यांच्या मालकीची जुना खंडाळा येथील मिळकत हडप करण्याच्या हेतूने खोट्या बनावट पावत्या, करारनामे बनवून त्याद्वारे गिरीमोहन यांना अडीच कोटी रुपये दिल्याचा बनाव करुन त्यांची खोट्या बनावट सह्या करुन फसवणुक केली असल्याची फिर्याद गिरीमोहन यांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केली होती. वडगाव न्यायालयाकडून हा गुन्हा तपासाकरिता लोणावळा शहरकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय.जे.शेख तपास करत आहेत.

 

23 May 2017

एमपीसी न्यूज - शिवदुर्ग मित्र ट्रेकींग अॅन्ड अॅडव्हेंचर क्लब लोणावळा यांनी नुकतीच कोकणकडा ही समुद्रसपाटी पासून 3820 फुट उंच असलेली चढाई मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. मागील तीन वर्षापासून शिवदुर्गचे शिलेदार ही मोहीम सर करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर यावेळी या शिलेदारांना यश मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

 

कोकणकडा चढाई मोहिमेसाठी सलग तिसरी मोहीम करुन हे यश शिवदुर्गला मिळाले आहे. यापुर्वी डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2016 साली शिवदुर्गने दोन मोहिमा राबविल्या मात्र मधमाश्यांच्या पोळ्यांमुळे त्या मोहिमा पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. यावेळी मात्र मधमाश्यांची कसलिही पर्वा करता किरण अडफडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्ण केली.
13
मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्ष चढाई ही 17 मे रोजी सकाळी 7 ला चालू होऊन 20 मेला दुपारी 4.20 ला पूर्ण झाली. चढाई समुद्र सपाटीपासून हे अंतर 3820 फूट आहे.
चढाई मोहिमेची पुर्वतयारी म्हणून सदस्यांनी कड्याची रेकी सराव केला होता. तसेच बाकी जुळवाजुळव करत टीमने यशस्वी चढाई केली.

 


शिवदुर्गचे सदस्य रोहीत वर्तक, गणेश गीध, योगेश उंबरे यांनी प्रथम 800 मीटर लेजपर्यंतचा टप्पा चढाई केला. त्यानंतर योगेश उंबरे, समीर जोशी, रोहीत वर्तक, यांनी पालीचे डोकंपर्यंत चढाई यशस्वी केली शेवटच्या टप्प्यात योगेश रोहीत यांनी रात्री ससाना लेजपर्यंत रात्री चढाई करुन दुसऱ्या दिवशी समिट करुन कोकणकडा सर केला.या टीम बरोबर शरद राज, आशिष चीप्पा , डॉ.गौरव शिंगरे हे सुद्धा 800 मिटरपर्यंत बरोबर होते. चढाई मार्गाची क्षणचित्रे शिवम आहेर, श्रीधर भेंडे, अजय राऊत यांनी टिपली.

भुपेश पाटील, तन्मई गीध, राजेंद्र कडु , वैष्णवी भांगरे, दिपाली पडवळ, सायली महाराव, जुईली महाले, ऐश्वर्या लाड, कोयल घोष, महेश मसने, दिनेश पवार, गणेश गायकवाड, पौरस राणे, अशोक मते, दिनेश उंबरे, राहुल गेंगजे, महादेव गायकवाड, प्रविण देशमुख, विकास मावकर, अजय शेलार, नागेश इंगुळकर, समर फारुकी, सुनील गायकवाड, राहुल खोत, अनिकेत देशमुख, पराग सरोदे, राज बकरे, विश्वेश महाजन, गिरीविहार हायकर्सचे योगेश सदरे, प्रदीप म्हात्रे, आशिष पलांडे, सुरेश गीध, मिरॉन जोशेफ, आनंद गावडे, विजय पोटफोडे, विनय बढेकर, सौरभ काळे, वैभव पाटील, स्वप्निल पाटील, शरदचंद्र, विक्रम, संजय वांद्रे, भगवान वाशिलकर, भाऊ म्हाळसकर, हनुमंत भोसले, वैभव राऊळ, हरिश्चंद्र गुंड, धरती शिकरे, हर्षद बने हे मोहिमेत सहभागी झाले होते.

कै.मिलींद पाठक यांच्या प्रेरणेने किरण अडफडकर, वसंत लिमये, अरुण सावंत, विकास सातारकर, विकास भोंडवे, सचिन गायकवाड, आनंद शिंदे, पद्माकर गायकवाड, सुरेंद्र शेळके यांचे या मोहिमेसाठी सहकार्य लाभले.

22 May 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सकाळी पावणेसात वाजता कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला.

 

शाहरुक फकिर पठाण (वय 24) व अभिजित दयानंद रणपिसे (वय 22) असे मयत झालेल्या युवकांची नावे असून सुमित मनोहर जाधव (वय 26, रा. आकुर्डी गावठाण) हा युवक जखमी झाला आहे.

 

जुन्या महामार्गावर लोणावळा महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार (MH 14 EP 5550) ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक (MH 20 AD 1015) वर समोरील बाजूने जोरात धडकून हा अपघात झाला. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने कारमधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत पथकाकडून गाडीत आडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

13 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात आज सकाळीच ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्री पाऊस झाल्यानंतर वातावरणात गारवा पसरला होता. आज दिवस उजाडल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळी 7:45 वाजण्य‍च्या सुमारास वाकसई, वरसोली, कार्ला, सदापुर, डोंगरगाव, वेहेरगाव, देवघर, शिलाटणे, टाकवे, पाटण, देवले, बोरज आदी सर्व परिसरात पावसाने हजेरी लावली. सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

 

पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र लाकूडफाटी, गवर्‍या तसेच जनावरांचे गवत यांची अद्याप साठवण करण्यात आलेली नसल्याने नागरिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेती मशागतीचे कामे सुरु झाली होती. उर्वरित ठिकाणी शेती मशागतीच्या कामाला आता जोर येईल. सध्या मे महिन्यात लग्नाची तिथी जोरदार असल्याने अचानक हजेरी लावलेल्या पावसाने वर व वधूंच्या घरात तारांबळ उडाली असून शुभलग्न सोहळ्यात पावसाचे विघ्न नको असे काहीसे बोल कानावर येऊ लागले आहे. अर्धा तास पावसाची संततधार सुरु होती. तदनंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र रिमझिम तसेच ढगांचा गडगडाट सुरुच होता.

12 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो रस्त्यामध्येच फिरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

लोणावळा परिसरात आठ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रस्ते ओले झाले होते. यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो खंडाळा घाटातील उतारावर फिरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या. सव्वानऊच्या सुमारास हा टेम्पो बाजूला करत वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली.

12 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊन गार हवा सुटली होती. तसेच आकाशात ढगांचा गडगडाट व विजेचा लखलखाट सुरू झाला होता.

मागील काही दिवसांपासून लोणावळा परिरात गरमी वाढली होती. दुपारच्या सत्रात 36 ते 39 दरम्यान तापमान जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभर प्रचंड गरमी वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळच्या वेळेत मावळात दाखल झालेला पाऊस लोणावळ्यात कधी येणार अशी चर्चा रंगली असताना रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावत नागरिकांना सुखद दिलासा दिला. अचानक आलेल्या या पावसामुळे वाटसरूची मात्र तारांबळ उडाली. जागा मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून दुचाकी चालक व वाटसरू उभे होते.

12 May 2017

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (शुक्रवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या कार अपघातात दक्षिण अफ्रिका येथे आयटी सेक्टरमध्ये कामाला असणाऱ्या जितेश जगदीश जाधव (वय.35 मुळचा राहणार नेरुळ मुंबई)  या अनिवासी भारतीय (एनआरआय) युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात त्याची पत्नी, आत्या, आत्याचे पती व भाचा जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार जितेश जाधव हे नोकरीसाठी दक्षिण अफ्रिकेमध्ये असतात. मात्र 7 मे रोजी असलेले बहिणेचे लग्न व कंपनीच्या मिटींगसाठी ते भारतात थांबले होते. आज सकाळी ते नेरुळवरुन बारामतीकडे आत्या शोभा इंद्रजीत भोसले (वय 58) व त्यांचे पती इंद्रजीत आप्पाराव भोसले (वय 65) त्यांचा नातू निनाद सुभाष रमाणी (वय 11) तसेच जितेश यांच्या पत्नी डॉ. पल्लवी जितेश जाधव (वय 32) या  फोर्ड फिएस्टा गाडीमधून निघाले होते.


कामशेत बोगद्याजवळ  जितेशचा कारवरचा ताबा गेला व समोर पुण्याकडे जाणा-या कंटेनरला जोरात धडकले. यामध्ये कार पूर्णपणे कंटेनरच्या मागच्या बाजूमध्ये घुसली होती. यात जितेश जाधव याचा जागीच मुत्यू झाला. जितेश हा निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश श्रीधर जाधव यांचा मुलगा होता.


शोभा इंद्रजीत भोसले  व त्यांचे पती इंद्रजीत आप्पाराव भोसले, डॉ. पल्लवी जितेश जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापात झाली असल्याने त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. तर निनाद याच्यावर प्राथमिक उपचार झाले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

छोट्या निनादला मात्र याची पुटसशी कल्पनाही नाही

निनाद हा इयत्ता चौथीत शिकत असून तो  मुंबईचे लग्न अटोपून सुट्टीनिमित्त मामा, मामी व आजी-आजोबांसोबत गावी निघाला होता. त्याला गाडीतच झोप लागली होती. त्यामुळे त्याला जाग आली ती सरळ अपघाताच्या धक्क्यामुळेच, मात्र यात त्याच्याही डोक्याला जखम झाली आहे. त्यामुळे त्याला पूर्ण शुद्ध आली ती हॉस्पिटलमध्येच. मात्र आपले आजी-आजोबा, मामा-मामी यांचे काय झाले, याची त्याला पुसटशीही कल्पना नाही. तो ह़ॉस्पिटलच्या सर्व स्टाफला माहितीसाठी व इतर गोष्टींसाठी अगदी स्वतःहून मदत करत आहे. 

Page 5 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start