• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
09 May 2017

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (मंगळवारी) सकाळी दोन ट्रेलरचा अपघात झाला.यामध्ये ट्रेलरचा चालक जखमी झाला आहे.

मुंबई लेन वर उभ्या असलेल्या कंटेनर ट्रेलरला पाठीमागुन आलेल्या ट्रेलरची धडक बसली. ही घटना आज सकाळी सात वाजून 14 मिनीटांनी घडली. यामध्ये मागून आलेल्या कंटेनर ट्रेलरचा चालक अच्छेलाल मिश्रा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

या आपघातामळे बोरघाटात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता वाहतूक पुर्ववत झाली आहे.

07 May 2017

एमपीसी न्यूज - मुंबईच्या दिशेने जाणा-या होंडा मोबिलो गाडीची धडक पुढे जाणा-या व्होल्वो बसला बसली. या अपघातात होंडा गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हा अपघात कामशेत बोगद्याजवळ 77 किलोमीटर अंतरावर झाला.

भगिनी देशमुख (वय-60), श्रद्धा निलेश पाटील (वय-19), दत्तात्रय देशमुख (वय-63), राखी निलेश पाटील (वय-38), कार चालक दीपक (संपूर्ण नाव समजू शकले नाही), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रुपेश दत्तात्रय देशमुख (वय-34, रा. विरार मुंबई), संजय पाटील (वय-15), ओम देशमुख (वय 2 वर्षे), राहुल देशमुख, रुपाली देशमुख अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या निता ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्होल्व (एमएच 04 जी 5960)  बसला पाठीमागील बाजूस बोगद्यामध्ये आग लागली. आग आणि धुरामुळे बोगद्यामधील लावण्यात आलेले लाईट अचनक बंद झाले. त्याचवेळी भरधाव वेगात जाणा-या होंडा मोबीलो कार (एमएच 48 एस 8646) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कारचा पुढील भाग बसच्या मागील बाजूस जाऊन धडकल्याने कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बोगद्यामध्ये अंधार पसरल्याने आणि कार बसच्या मागे अडकल्याने जखमींना बाहेर काढण्यास वेळ लागला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात आणत असताना भगिनी देशमुख आणि दत्तात्रय देशमुख यांचा मृत्यू झाला. तर श्रद्धा पाटील या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात ओम देशमुख हा दोन वर्षांचा मुलगा बचावला असून त्याच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचे आई-वडील राहुल आणि रुपाली देशमुख यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महामार्ग पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू असून एका लेनवरून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

06 May 2017

माहिती देणार्‍यास पन्नास हजाराचे बक्षीस

एमपीसी न्यूज - लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेतील तरुण-तरुणीच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. 7 अधिका-यांसह 25 कर्मचारी या तपास पथकात सहभागी असतील. यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून हे पथक फक्त याच गुन्ह्याचा तपास  करणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक् यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सार्थक दिलीप वाघचौरे (22) आणि श्रुती डुंबरे (21) या दोन विद्यार्थांची लोणावळा येथील भुशीगावाजवळ 3 एप्रिलला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळले होते. या हत्येला आता एक महिना उलटून गेला असूनही या हत्येतील कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या तपास पथकाचे प्रमुख म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे (एससीबी) पोलीस निरीक्षक राम जाधव हे काम पाहणार असून, त्यांच्या पथकामध्ये एलसीबीचे तीन व पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी असणार आहेत. याशिवाय तांत्रिक मदतीसाठी  अहमदनगरला बदली झालेले पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह इतर मदतीसाठी कोल्हापूर येथे बदली झालेले सुनील पाटील या पथकाला मदत करणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते या तपासावर देखरेख करणार आहेत. यासाठी लोणावळा अथवा खंडाळा येथे या पथकासाठी स्वतंत्र ऑफीस राहणार आहे. तपासासाठी तीन खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

06 May 2017

एमपीसी न्यूज - शिवसेना संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असून यामध्ये केवळ पक्षाच्या पदाधिकार्‍यांना भेटून पक्ष बांधणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसंपर्क मोहिमेचा शुभारंभ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामींनी एकविरा देवीचे दर्शन घेऊन सुरू केली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, मावळ उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, नगरसेविका शादान चौधरी, सुनील इंगूळकर, नितिन आगरवाल, गणपत पडवळ, अनिकेत घुले, भारत ठाकूर यांच्यासह मुंबई व ठाण्याचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक तसेच मावळातील पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जवळपास चार वर्षानंतर ही शिवसंपर्क मोहीम घेण्यात आली आहे. यामध्ये पक्ष बांधणीसाठी पदाधिकार्‍यांच्या भेटी घेण्यात येणार आहे. मी स्वतः उद्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार आहे. काही जणांमध्ये हा गैरसमज आहे की ही मोहीम शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आहे. मात्र मी अद्याप शेतकर्‍यांना भेटण्याचा विचार केलेला नाही. आज मी कुलस्वामीनीच्या दर्शनासाठी आलो आहे. या कामात तिचे आशीर्वाद महत्वाचे आहेत.

05 May 2017

लोणावळा शहर वाहतुक विभागाचे हवालदार सुरेश माने, सुनिल माळी, पोलीस नाईक अनंत रावण, सामिल प्रकाश, सतिष ओव्हाळ, अंकूश गायखे यांच्यासह खंडाळा महामार्गचे पोलीस कर्मचारी यांना हे मार्स्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष शौकत शेख, स्वाभिमान वाहतुक सेनेचे अध्यक्ष नविद खलिफा, सागर बलूरे, संकेत कुटे, आशिष गुप्ता, सतिष जोसेफ, अल्पेश दास, साजिफ ब्यापारी, सुरज परदेशी, अर्जुन पंडीत, अविनाश बारसे, मन्सूर शेख, मंगेश कदम, वाहिद, अभिषेक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले प्रदूषणामुळे पोलीसांच्या आरोग्याला मोठी हानी पोहचत आहे. अनेकांना श्वसनाचे तसेच ब्लड प्रेशर व शूगरचे प्रकार वाढले आहेत. या पोलूशन मुक्त मार्स्कमुळे पोलीसांना स्वच्छ हवा मिळेल असे त्यांनी सांगितले.

 

05 May 2017

डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप


एमपीसी न्यूज - अपेन्डिसच्या शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी लोणावळ्यातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन कक्षाची ताडफोड करीत गोंधळ घातला. गुरुवारी (दि.०४) संध्याकाळी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी सचिन हडप (वय २२, रा.खोपोली, जि. रायगड) या महिलेला बुधवारी सकाळी अपेन्डिसच्या शस्त्रक्रियेसाठी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मात्र त्यानंतर सदर महिलेची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचारही सुरू केले. मात्र अखेर ४ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान माधुरी हडप यांचा मृत्यू झाला. माधुरी यांच्या या अचानक मृत्यूमुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी श्रध्दा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत रिसेप्शन कक्षाची तोडफोड केली. या घटनेची खबर प्राप्त होताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

माधुरी यांना तीन वर्षांचा एक मुलगा असून अपेन्डिसचा किरकोळ त्रास असणाऱ्या माधुरी यांची तब्येत तंदुरुस्त होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा केवळ डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करीत माधुरी यांच्या नातेवाईकांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

लोणावळा पोलिसांनी माधुरी यांचे आकस्मित मयत दाखल केले असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण या करीत आहे.

03 May 2017

एमपीसी न्यूज - प्रो कबड्डी लिगच्या धर्तीवर लोणावळा शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत पुण्यातील राणाप्रताप संघाने प्रतिस्पर्धी पुण्यातीलच युवक क्रीडा मंडळ संघावर मात करत प्रथम क्रमांक मिळविला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ वलवण व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे वलवण तलावाशेजारी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निमंत्रित 18 संघ व महिलांचे 2 संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, दिलीप दामोदरे, जयश्री आहेर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, उद्योजक रमेश पाळेकर, अनिल पानसरे, गणेश मावकर, अरुण होगले, भूषण पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस समारंभ नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी नगरसेविका रुपाली जाधव, भाजयुमोचे मावळ कार्याध्यक्ष अरुण लाड, लोणावळा शहर अध्यक्ष हर्षल होगले, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संदीप पायगुडे व संतोष जगदाळे, विलास जाधव, महेश म्हसणे उपस्थित होते.

सुवर्ण उदय मंडळ व शिवप्रताप या महिला संघाचा सामना प्रेक्षेणीय ठरला. 

स्पर्धेचा निकाल - राणाप्रताप संघ (प्रथम), युवक क्रीडा मंडळ (द्वितीय), काळभैरव कबड्डी संघ रहाटणी व आराध्य प्रतिष्ठान पुणे (तृतीय)

शिस्तबद्ध संघ - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. उत्कृष्ट खेळाडू - अक्षय शिंदे (राणाप्रताप), उत्कृष्ट पक्कड विराज काकडे (युवक), उत्कृष्ट चढाई - जितेंद्र काळे (युवक)

02 May 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना पोलीस दलात गत 15 वर्षापासून केलेल्या उत्तम सेवाभिलेखाबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक 1 मे रोजी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधिक्षक सुवेझ हक व मान्यवर उपस्थित होते.

 

पुणे जिल्ह्यातील 12 अधिकारी व कर्मचा-यांना हा सन्मान देऊन गौरवण्यात आले. चंद्रकांत जाधव यांनी लोणावळा शहर, लोणीकंद पोलीस स्टेशन तसेच मुंबईतील अनेक पोलीस स्थानकांमध्ये केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

02 May 2017

नातेवाईकांचा आंदोलनाचा इशारा


एमपीसी न्यूज - लोणावळा शहरासह संपुर्ण पुणे जिल्हा हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींच्या दुहेरी खून प्रकरणाला काल (दि. 1) तब्बल 30 दिवस पुर्ण झाले तरी लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याप्रकरणातील आरोपींचा काहीच थागपत्ता लागलेला नसल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत. पुढील 20 दिवसात आरोपींचा शोध न घेतल्यास लोणावळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सार्थक वाकचौरे याचे चुलते कैलास वाकचौरे, भाऊ विक्की वाकचौरे व त्याचे मित्र ऋषीकेश खलाने यांनी निवेदनाद्वारे लोणावळा पोलिसांना दिला आहे.

 


आरोपींचा शोध घेत या दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 14 अधिकार्‍यांच्या समावेश असलेल्या आठ टिम तपास करत आहेत. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने तपास यंत्रणेवर आता मयत सार्थकचे नातेवाईक व मित्र परिवाराने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

सदर खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असावा का, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी का? खूनामागे मयत सार्थक व श्रृती यांच्यापैकी कोणाच्या भुतकाळातील घटना आहेत का? आॉनर किलिंगचा प्रकार आहे का? अशा विविध बाबींचा तपास वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सुरु आहे. आरोपींनी कसलाही पुरावा मागे न ठेवता पोबारा केला असल्याने आरोपींपर्यत पोहचण्याची कडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पुराव्यांअभावी अतिशय चॉलेजिंग बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा पोलीस कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

29 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील जयचंद चौक ते साधना मॉल दरम्यान भर दुपारी व वर्दळीच्या चौकात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन अज्ञात इसमांच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 

ओळकाईवाडी लोणावळा येथील एक 30 वर्षीय महिला महावीर मेडिकल, जयचंद चौक येथे रस्त्याने जात असताना एका सफेद रंगाच्या कार मधून आलेल्या दोन इसमांनी सदर तरुणीच्या मागे गाडीचा हाँर्न वाजवत तिला गाडीत बसण्याचा इशारा केला. यावेळी सदर तरुणींने रिक्षामध्ये बसून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या अनोळखी इसमांनी तिचा पाठलाग करत साधना मॉल समोर रिक्षात दोन्ही बाजूने बसत तिला जबरदस्तीने गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी भेदरलेली सदर तरुणी एका दुकानात पळाल्याने ते इसम निघून गेले. अनेक‍ांनी ही घटना पाहिली, मात्र कोणी मदतीला पुढे आले नसल्याचे या युवतीने सांगितले. सदर तरुणीच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर तपास करत आहेत.

Page 6 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start