• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
10 Apr 2017

एमपीसी न्यूज - दोन अल्पवयीन मुलींना पैसे व पाणीपुरीचे आमिष दाखवत त्यांच्यासोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी दोन ज्येष्ठ नागरिकांसह एका 45 वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

सदर फिर्यादीनुसार विष्णु मामाजी गुडेकर (वय 71), पांडूरंग यशवंत धोंगडे (वय 75) आणि अनंत राजकुमार गुप्ता (वय 45, ता  मावळ जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी आणि तिची 10 वर्षीय मैत्रिण यांना पैशाचे व पाणीपुरीचे आमिष दाखवून त्यांना वरील तिघांनी घरात बोलावून त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सहबालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख याप्रकरणी तपास करत आहेत.

10 Apr 2017
एमपीसी न्यूज - स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश रामचंद्र साळवे व त्यांचे पुतणे किरण रतन साळवे यांना मावळ तालुक्यातून 5 एप्रिल ते 28 एप्रिल असे 24 दिवस हद्दपार करण्यात आले असल्याचा आदेश मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी 3 एप्रिल रोजी पारित केला आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या कारणावरुन 28 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुसगाव गावाच्या हद्दीत शिंदे हॉस्पिटलजवळ ओळकाईवाडी येथे रमेश साळवे व किरण साळवे यांनी गैरकायदा मंडळी जमवून भ‍ांडण करुन फिर्यादीला हातातील हत्यारे व लाथा बुक्यांनी मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन दमदाटी केली. यामुळे कुसगाव गावाच्या हद्दीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून भविष्यात भांडण तंटा होण्याची दाट शक्यता असल्याने कुसगाव गावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना पुढील 28 दिवसांकरीता मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी सादर केला होता. यावर 24 मार्च रोजी पहिल्यांदा सुनावणी झाली. त्यावेळी रमेश व किरण साळवे यांनी त्यांचे म्हणणे लेखी मांडण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार सुनावणीसाठी 30 मार्च ही तारीख देण्यात आली होती. 
 
 
तारखेला हजर राहून देखील त्यांच्याकडून बाजु मांडण्यात न आल्याने तसेच योग्य ती कागदपत्र सादर करण्यात न आल्याने प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी एकतर्फी निकाल देत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (3) अन्वेय रमेश साळवे  व किरण साळवे यांच्यावर ही हद्दपारीची कारवाई केली आहे.
08 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात आयएनएस शिवाजी समोरील डोंगरात एस पाँईट येथे महाविद्यालयीन युवक व युवती यांच्या दुहेरी खूनाच्या घटनेला पाच दिवस उलटले तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात लोणावळा पोलीसांना अपयश आले आहे. लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरावून सोडलेल्या या दुहेरी खून प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करत आरोपींना कडक शासन करा अशी मागणी आज मावळ तालुका युवासेना व लोणावळा शहर युवासेनेच्या वतीने लोणावळा शहर पोलीस व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

युवा सेनेने सिंहगड काँलेजच्या प्राचार्यांना देखिल निवेदन देत महाविद्यालयीन युवकांच्या सुरक्षेकरिता ठोस उपाययोजना करा अन्यथा यापुढे घडणार्‍या घटनांना महाविद्यालय प्रशासनाला जबाबदार धरुन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

युवा सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अनिकेत घुले, लोणावळा शहराध्यक्ष तानाजी सुर्यवंशी, विशाल हुलावळे, ओमकार फाटक,शाम सुतार, शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका शादान चौधरी, नगरसेवक सुनील इंगूळकर, माणिक मराठे, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, माजी मावळ तालुकाप्रमुख राजु खांडभोर, संजय भोईर, जयवंत दळवी, विजय आखाडे, संगीता कंधारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

08 Apr 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पाटण गावाच्या हद्दीत विठ्ठल गोपाळ तिकोणे यांच्या जमीन गट नं. 40 मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अनोळख्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकिस आली.

मयत युवकाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्ष असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँन्ट असून मृतदेहाशेजारी मेहंदी रंगाची बॅग सापडली आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीविषयी कोणास माहिती असल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

08 Apr 2017

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरुन ऊस वाहतूक करणा ऱ्या टेम्पोची पुढे जाणाऱ्या ट्रेलरला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलीस चौकीच्या मागे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास झाला आहे.

 

धनाजी रामदास शेलार (वय-२३, रा. गोरेवस्ती, वाघोली, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईला ऊस घेऊन जाणाऱ्या टेम्पोची (क्रमांक-एमएच-१२/ एलटी-१२०३) पुढे लोखंडी कॉईल घेवून जाणाऱ्या ट्रेलरला (क्रमांक-एमएच-०६/एक्यू-७४८३) मागून जोरात धडक बसली.

 

या भीषण धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण धडकेत ट्रेलरवरील लोखंडी कॉईलला बांधण्यात आलेली लोखंडी साखळी तुटली, सुदैवाने कॉईल ट्रेलरवरच लटकल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती कळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी आगलावे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने सर्व्हिस लेनवर घेतली. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहे.

07 Apr 2017

मयत युवक युवतीच्या पालकांची पोलिसांकडे मागणी


एमपीसी न्यूज - आयएनएस शिवाजी समोरील एस पॉईंट या ठिकाणी पाच दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी मयत युवक व युवतीच्या नातेवाईकांनी लोणावळा शहर पोलिसांकडे काल केली.

 

लोणावळा दुहेरी खून प्रकरणातील मयत विद्यार्थी सार्थक वाकचौरे याचे वडील दिलीप वाकचौरे, मामा शाम वालझाडे, मिलिंद वालझाडे व इतर नातेवाईक तसेच मयत श्रुती डूंबरे हिचे मोठे चुलते संतोष डूंबरे, दुसरे चुलते आशिष डूंबरे, चुलत भाऊ राहुल डूंबरे व इतर नातेवाईक यांनी काल गुरुवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तपास अधिकारी चंद्रकांत जाधव व पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची भेट घेत आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करा अशी मागणी केली.

 

मयत सार्थक याच्या वडिलांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान असून घरी आई व एक बहीण आहे. सार्थक हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने गावात किंवा महाविद्यालयात त्याचा कोणाशी वाद नव्हता असे त्याचे वडील व नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या मृत्युच्या घटनेने आईला मोठा धक्का बसला आहे. मयत श्रुती ही देखील अभ्यासात हुषार व हरहुन्नरी होती. तिचे आई व वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यांचे गावाकडे एकत्र कुटुंब असल्याने वडील, चुलते हे सर्व एकत्र राहतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी श्रुतीच्या आईचे वॉलचे ऑपरेशन झाले आहे. त्यातच ही घटना घडल्याने तिचे आई, वडील, भाऊ यांना मोठा धक्का बसला असल्याचे श्रुतीचे चुलते संतोष व आशिष डूंबरे यांनी सांगितले. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावत आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी मयत सार्थक व श्रुती यांच्या नातेवाईकांनी केली. ज्या ठिकाणी ही दुहेरी खूनाची घटना घडली त्या ठिकाणाला देखील नातेवाईकांनी भेट दिली.

 

पाच दिवसानंतरही पोलिसांचे हात रिकामे

सार्थक व श्रुती यांच्या खुनाच्या घटनेला पाच दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाच्या हाती काही ठोस पुरावे लागलेले नाहीत. पोलीस अधिकारी तपासा संदर्भात काही माहिती देण्यास तयार नसून तपास घटनेची संबंधित सर्व शक्यतांच्या आधारावर सुरु आहे, तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू असून लवकरच खुनाचा उलगडा होईल, असे मात्र सांगत आहे. दरम्यान, आज पहाटेपासून अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह लोणावळा पोलीस व पुणे ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण विभागाचे व इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आठ टिमने घटनास्थळ पिंजून काढत काही पुरावे मिळतात का याची छाननी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार व संशयित तसेच मयत युवक व युवती यांचे मित्र मैत्रिणी अशा दोनशेपेक्षा जास्त जणांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे. सायबर सेल व गुन्हे प्रकटीकरणची टिम घटनेचा समांतर टेक्निकल तपास करत आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस पुरावा हाती न आल्याने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत.

06 Apr 2017

एमपीसी न्यूज - पुण्यातील एका विद्यार्थ्याचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू टिमच्या सहाय्याने रात्री उशिरा हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.


पियूष संजीव रस्तोगी (वय 20 वर्ष, रा. श्रीनिकेतन हॉस्टेल, कोथरुड बसस्थानक मूळ रा. अलादबाद, उत्तरप्रदेश), असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुण्यातील आगरवाल क्लासेस टिळकरोड येथे सीए करत होता.


रस्तोगी हा काल बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरुड हॉस्टेलमधून त्याची दुचाकी गाडी क्र. (युपी 70 सीसी 9155) घेऊन बाहेर पडला होता. मात्र, तो कोठे गेला याबाबत कोणाला माहिती नव्हती. रात्री तो हॉस्टेलला परत न आल्याने व संपर्क देखील होत नसल्याने त्याचा भाऊ आयुष याने आज सकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आज सकाळी स्थानिक दुकानदारांना पॉईंटजवळ दुचाकी गाडी दिसल्याने त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच शिवदुर्ग मित्र या रेक्यू टिमच्या मदतीने दरीत उतरून पाहणी केली असता जवळपास 600 ते 700 फूट खोल अंतरावर पियुष रस्तोगीचा मृतदेह मिळून आला आहे.

04 Apr 2017

एमपीसी न्यूज - लोणावळ्याजवळील कुसगाव येथे सिंहगड मह‍विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचा निर्घृण खून करणा-या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा या मागणीसाठी महाविद्यालयाच्या चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांचा कॅम्पस प्रमुख प्रज्ञा कांबळे यांच्या उपस्थितीत सिंहगड महाविद्यालय ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत कॅन्डल मार्च मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. पोलीस ठाण्यात तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांना या मागणीसंबंधीचे निवेदन देण्यात आले.  


सिंहगड महाविद्यालयातील टाँपर विद्यार्थींनी श्रुती डूंबरे व सांस्कृतीक विभागात अग्रेसर असलेला सार्थक वाकचौरे यांचा रविवारी रात्री ते सोमवारी दुपार दरम्यान आयएनएस शिवाजी ते एअर फोर्स दरम्यानच्या डोंगरावर एस पाँईट येथे दगडांनी ठेचून व अज्ञात हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला होता. त्यांचे मृतदेह काल (सोमवार) लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी समोरील  भुशी धरणाच्या वरील डोंगरावर विवस्त्र संशयित अवस्थेत आढळले होते. या खुनाचे गूढ उलगडण्याचे काम शहर व पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.


महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख प्रज्ञा कांबळे व विद्यार्थी प्रतिनिधी किरण जायभाय म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना अतिशय भयानक असून आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.

04 Apr 2017

एमपीसी न्यूज - कुलस्वामींनी आई एकविरेचा पालखी मिरवणुक सोहळा लोणावळ्याजवळील कार्ला डोंगरावर चैत्र शुध्द सप्तमीच्या सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे पालखी सोहळा अतिशय शांततेमध्ये पार पडला. आकर्षक रोषणाईमुळे गडाचा परिसर उजाळून निघाला होता.

तमाम कोळी, आग्री, कुणबी, सोनार अशा विविध समाजांचे एकविरा देवी हे आराध्य दैवत असल्याने या यात्रेला कोकण परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. कोकण परिसरातून मागील काही दिवसांपासून देवीच्या पायी पालख्या गडाकडे येत असल्याने परिसर भाविकांनी गजबजला होता. यात्रेमधील चैत्र शुध्द षष्ठी, सप्तमी व अष्टमी हे मानाचे दिवस आहेत.


गडावर येणार्‍या भाविकांना सहज व सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतो तयारी करण्यात आली होती. भाविकांना देवीचे सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, सचिव व मुख्य पुजारी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळूराम देशमुख, विलास कुटे, पार्वती पडवळ, निलिमा येवले हे गडावर उपस्थित होते.

लोणावळा ग्रामीण व पुणे ग्रामीण पोलीसांनी गड परिसरात तसेच कार्ला फाटा ते गड पायथा दरम्यान चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. देवीच्या मानाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखी मिरवणुकीचा सोहळा "याची देही याची डोळा" पाहण्यासाठी भाविकांनी गडावर गर्दी करण्यास सुरुवात मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, तहसिलदार जोगेंद्र कट्यारे, लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, अक्षय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे, प्रदिप काळे हे गडावर यावेळी उपस्थित होते.

03 Apr 2017

एमपीसी न्यूज - आयएनएस शिवाजीसमोरील भुशी धरणाच्या वरील डोंगरावर एका महाविद्यालयीन युवक व युवतीचे मृतदेह आज (सोमवार) लोणावळा शहर पोलिसांना विवस्त्र अवस्थेत मिळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या दोन्ही मुला-मुलींचे हातपाय व तोंड बांधण्यात आली होती. तसेच अंगावर व डोक्यावर जखमा असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध शहर पोलीस घेत आहेत.

 

सार्थक दिलीप वाक्चौरे ( वय-22, रा. राहुरी जिल्हा अहमदनगर), श्रृती डुंबरे (ओतूर) या मयत महाविद्यालयीन युवकाचे नाव असून युवती ही जुन्नर तालुक्यातील आहे. हे दोघेही काल सायंकाळपासून बेपत्ता होते. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लोणावळा शहर पोलिसांना समजले. मयत दोघेही लोणावळ्याजवळील सिंहगड महाविद्यालयाचे अभियांत्रिकेचे तिसर्‍या वर्गाचे विद्यार्थी आहेत. श्रृती ही कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती.

 

घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक व अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

Page 9 of 14
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start