• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
17 Jun 2017

भोसरीत रविवारी आदिवसी सांस्कृतिक महोत्सव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कला आणि सांस्कृतिक धोरणांतर्गत उद्या (रविवारी) आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रविवारी सकाळी 10 ते 5 या दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, मनसे गटनेता सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवानिमित्त सकाळी 10.00 वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे व आदिवासी विचारवंत संतोष साठे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2.00 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.

Read 30 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start