• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

भविष्यात नगरपालिकेच्या शाळाच असणार अव्वलस्थानी - तुषार कामठे

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जात असल्याने सध्या खासगी शाळांपेक्षा पालिकेच्या शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात नगरपालिकेच्या शाळाच अव्वलस्थानी असतील, असे मनोगत वाकडचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक वर्गातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस देणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

पिंपळे निलख येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पाठ्यपुस्तके मोफत वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक तुषार कामठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या पटसंख्या सोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी सकारात्मक प्रयत्न करावेत. त्यासाठी महानगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी कामठे यांनी दिले.

Read 24 times Last modified on Sunday, 18 June 2017 10:54
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start