• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

'किप मूव्हिंग मुव्हमेंट'ची 85 शाळांत प्रेरणात्मक व्याख्यान सत्रे


एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडवून समाजाला योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या 'किप मूव्हिंग मुव्हमेंट' या संस्थेच्या वतीने 25 जूनपासून पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रेरणादायक व्याख्यानांची सत्रे होणार आहेत.

'किप मूव्हिंग मुव्हमेंट' या संस्थेच्या 'लाईफ स्कूल'च्या संचालक ज्योती गोसावी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुणे, औरंगाबाद, उदयपूर येथे 85 शाळांत 400 तुकड्यांमध्ये, 560 स्वयंसेवकाच्या मदतीने हा उपक्रम चालणार आहे. 'किप मूव्हिंग मुव्हमेंट' हा उपक्रम 2010 पासून भारत, श्रीलंका, नेपाळ या देशातील 30 हजार शिक्षक, लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे.

विद्यार्थ्यांमधील नकारात्मक भावना काढून त्यांना सकारात्मक जीवनाची प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. व्याख्याने, रोल प्ले, चर्चासत्रे, यशकथा यातून विद्यार्थ्यांना, पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. नरेंद्र गोयदानी हे या चळवळीचे संस्थापक आहेत. नोंदणीसाठी 7721065000 Website -  www.lifeschool.co.in संपर्क साधावा.

Read 44 times Last modified on Sunday, 18 June 2017 15:30
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start