• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

शहरातील शासकीय शाळेस शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याची मागणी


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील शासकीय शाळांस शालोपयोगी वस्तूंचे वाटप करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. नव-नवीन सुधारणा करणार असल्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या काळात दिले होते. तरी महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यात यावी. तसेच पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू होऊन तीन ते चार दिवस झाले तरी अद्याप शालेय वस्तूंचे वाटप झाले नाही. शाळा सुरू होण्याच्या दिवशी शालोपयोगी वस्तूंचे वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, उलट तसे झाले नाही. तरी लवकरात लवकर शाळेत शालेय वस्तूंचे वाटप करावे ही मागणीही केली आहे.

Read 40 times Last modified on Monday, 19 June 2017 11:38
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start