• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
19 Jun 2017

पिंपरी पालिकेतर्फे बुधवारी निगडीत योग दिन


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (दि. 21) निगडीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.


निगडी, प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मनोहर वाढोकर सभागृहात सकाळी 6 ते 8 या वेळेत योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पतंजली योग समिती वतीने व स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या विविध भागात योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदा मंगल कार्यालय, वाकड, मोरया मंगल कार्यालय, चिंचवड, संस्कृती लॉन्स, नवी सांगवी, माऊली लॉन्स, भोसरी, कामगार कल्याण केंद्र, संभाजीनगर या ठिकाणीही योग दिनाचे सकाळी 5 ते 8 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या प्राचीन परंपरेमध्ये योगाचे ज्ञान आपल्याला ऋषीमुनींनी दिले आहे. ही विद्या मधल्या काळात मागे पडली होती. संपूर्ण विश्वाला निरोगी करण्यासाठी रामदेव बाबा यांनी योग शिक्षकांच्या माध्यमातून या ज्ञानाचा प्रचार, प्रसार केला. ही प्राचीन विद्या सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम पतंजली योगपीठाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या योग दिनी पतंजली योग समितीचे पदाधिकारी मिलिंद वालझाडे, शेकोकरजी कडु, अनिल पोखर्णीकर, अतुल आर्य व आशा डोंगरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. सर्व नागरिकांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या योग दिनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read 36 times Last modified on Monday, 19 June 2017 15:16
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start