• Bhausaheb_Bhoir.jpg
  • DPU1250x200.jpg
  • Mahesh_Landge.jpg
  • mpc.jpg
  • MPC_news.JPG
  • Nitin_Kalje.jpg
  • PCCO.jpg
  • Sunil_Shelke.jpg
29 Jun 2017

वाचनातून मिळणारे ज्ञान वर्षानुवर्षे टिकते - सचिन खेडेकर


लोटस पब्लिकेशन्सच्या दोन पुस्तकांचे अभिनेते सचिन खेडकरांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज - चाकोरीबाहेर जाऊन कार्य करणा-या व्यक्तींचे नेहमी कौतुक होतेच, पण त्यासोबतच समाजासमोर त्या नवा आदर्शही निर्माण करत असतात. त्यासाठी वाचन फार महत्वाचे असून वाचनातून मिळणारे ज्ञान वर्षानुवर्षे टिकून राहते, असे मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.

लोटस पब्लिकेशनच्या ‘गर्द सभोवती’ आणि ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ - न्यायवैद्यक शास्त्र’ या पुस्तकांचे प्रकाशन सचिन खेडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे यांनी अशाच प्रकारची कामगिरी बजावत समाजमनावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. लोटस पब्लिकेशन्सच्या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून त्यांच्या लेखनशैलीचे दर्शनही समाजाला घडले आहे. प्रत्यक्षात प्रकाशित झालेल्या लेखांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता हे लेख पुस्तकांच्या रूपाने वाचकांच्या भेटीला आले आहेत.

लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. ची निर्मिती असलेल्या ‘गर्द सभोवती’ आणि‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ - न्यायवैद्यक शास्त्र’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते राजा शिवाजी विद्यालयातील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात वाचनप्रेमी श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मंचावर ‘गर्द सभोवती’च्या लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ - न्यायवैद्यक शास्त्र’च्या लेखिका डॉ. वसुधा आपटे, निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. चे समीरसिंह दत्तोपाध्याय उपस्थित होते.

सचिन खेडेकर यांनी माफक आणि सर्वंकष यांतील फरक सांगत या पुस्तकांचे प्रकाशन हे केवळ अनुभवांची शिदोरी इतकंच मर्यादित नसल्याचे म्हटले. खेडेकर म्हणाले की, आशालतांनी जीवनातील 60 वर्षे रसिकांची सेवा केली आहे. या दरम्यान केवळ मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशा ज्येष्ठ अभिनेत्रींच्या कारकिर्दीतील अनमोल आठवणी एका पुस्तकात बंदिस्त करून सादर करणे ही वाचकांसाठी मोठी पर्वणीच आहे. त्याच प्रमाणे डॉ. वसुधा आपटे यांचे ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ - न्यायवैद्यक शास्त्र’ हे पुस्तका पोलिसांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. न्यायवैद्यक शास्त्र हे गुन्हेगाराचा माग घेण्यात कशा प्रकारे सहाय्यक ठरते त्याची विस्तृत माहिती या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

Read 74 times Last modified on Thursday, 29 June 2017 13:08
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start