• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
27 Feb 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडेमध्ये एका 20 वर्षीय विवाहितेवर फ्लॅटची साफसफाई करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना काल (रविवार) सकाळी तळेगाव दाभाडे येथील डाळआळी भागात घडली. पीडित महिला ही मोलमजुरीचे काम करते.


बिगाराम प्रभुजी देवासी (वय 45, सध्या रा. डाळआळी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बिजवाडी, राजस्थान), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला वडगाव मावळ न्यायालयापुढे आज सोमवारी हजर केले असता न्यायालयाने तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम.लांडगे करीत आहेत.

27 Feb 2017

पक्षविरोधी काम करणा-यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - वडगाव-खडकाळा गटातील ग्रामीण भागातील 18 गावामधील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तालुकाध्यक्षांकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.


भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव - खडाकाळा गटातच पक्षाचे उमेदवार रामनाथ वारींगे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी, तसेच वडगाव शहरी भागातून त्यांना अपेक्षित मतदान न झाल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.  तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय राजीनामा दिलेल्यांनी घेतला आहे.


या पराभवात गटातील शहरी भागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम न केल्याचा ठपका ठेवत  महिला आघाडीच्या अध्यक्षा नंदाताई सातकर, कामशेतचे सरपंच, उपसरपंच, कान्हे ग्रामपंचायत सदस्य, वडगाव -खडकाळा गण, गट अध्यक्ष, रामनाथ वारींगे, सांगवी गावचे बारकु खांदवे, यशवंत खांदवे, खंडूजी खांदवे आदी कार्यकर्त्यांनी, कान्हे, कामशेत, नायगाव, साते, जांभूळ, सांगवी, कुसगांव, अहिरवडे, चिखलसे, साई, नाणोली, पारवडी, वारंगवाडी, आंबी, राजपुरी आदी गावातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी महिला अध्यक्षा नंदाताई सातकर यांच्या अध्यक्षतेखाली कान्हे येथील पत्रकार परिषदेत राजीनामे दिले.


यावेळी वारिंगे म्हणाले की, विरोधी उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला असता; तर एवढे वाईट वाटले नसते, जेवढे घरभेद्यांनी विरोधी काम करून पराभव केला. ही अत्यंत खेदाची बाब आहे. अशा घरभेद्यांवर तातडीने कारवाई न केल्यास पक्षासाठी फार मोठा धोका होऊ शकतो. "


वडगाव गणातील भाजप उमेदवारापेक्षा गटातील उमेदवार वारींगे हे 1600 मतांनी पिछाडीवर आहे. याचा अर्थ पक्ष विरोधी काम केल्याने वारींगे यांचा पराभव झाला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा यावेळी सर्वांनी घेतला.

27 Feb 2017

एमपीसी न्यूज - काँग्रेस मावळ तालुकाध्यपदी बाळासाहेब ढोरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांना  जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांनी निवडीचे पत्र दिले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम नरवडे, अॅड. खंडूजी तिकोणे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, युवक अध्यक्ष गणेश काजळे, सिद्धेश ढोरे, रोहिदास वाळुंज, मयुर ढोरे, प्रवीण ढोरे, बाळकृष्ण पोटवडे आदी उपस्थित होते. ढोरे यांचे पक्षातील कार्य, तळमळ, निष्ठा, पक्षसंघटन पाहून त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली असल्याचे जगताप यांनी निवड पत्रात म्हटले आहे.


बाळासाहेब ढोरे यापूर्वी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व मावळ तालुका कार्याध्यक्षपदी कार्यरत होते. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले सात वर्षे पक्षाची बांधणी नाही. काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत मात्र संघटन नाही. म्हणून संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आणि जुन्या नव्यांचा मेळ घालून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करणार व नव्याने पक्षबांधणी करू. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

26 Feb 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे तरुणाने नैराश्यातून टॉवेलच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.25) दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे हद्दीतील नॅशनल हेवी कंपनी जवळील वनक्षेत्राच्या डोंगरावर घडली.


कृष्णा रामदिनी चव्हाण (वय 30 रा. बाबूसेला, कोहीनी नाझा जि. गोपालगंज बिहार), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  कृष्णा चव्हाण याने झाडाला गळफास घेतल्याची खबर सर्पमित्र निलेश  गराडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली.मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एन. डी. साळुंखे करत आहे.

26 Feb 2017

 एमपीसी न्यूज - घरात घुसून महिलेचा विनयभंग आणि मारहाण करत गळ्यातील एक तोळ्याचे गंठन चोरुन नेणा-या आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सहा तासाच्या आत गजाआड केले. ही घटना शुक्रवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास तळेगावजवळ वराळे येथे घडली.


संतोष मोतीलाल ठाकूर (वय 34, रा. शिव कॉलनी, वराळे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास एकट्याच घरी होत्या. त्यावेळी आरोपी संतोष याने त्यांच्या घराचा दरावाजा वाजवला. त्यांनी दरवाजा उघडला असता आरोपी संतोष घरामध्ये घुसला. त्याने फिर्यादी यांच्याशी मनाला लज्जा उत्पन होईल, असे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीच्या हातातील स्टीलच्या हुकने गळ्याला ओरखडले. त्यांना शयनगृहात ओढत नेऊन डोके भिंतीवर आदळले आणि मारहाण केली. तसेच गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण चोरुन गॅलरीतून उडी मारुन पळून गेला होता. 
 

तळेगाव एमआयडीसी पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला सापळा रचून सहा तासाच्या आत गजाआड केले. आरोपी संतोष हा काही कामधंदा करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे फौजदार विक्रम पासलकर तपास करत आहेत.
25 Feb 2017

सोशल मीडियावर अफवांना उधाण; नागरिकांमध्ये घबराट  

 

एमपीसी न्यूज - 'लांडगा आला रे लांडगा आला...' ही गोष्ट आपण लहानपणी शाळेत असताना  प्रत्येकानेच ऐकली असेल.  मात्र सध्या  या गोष्टीचा प्रत्यय मावळातील नागरिक घेत आहेत. चोरटे आल्याच्या मोठ्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत.  चोरटे या गल्लीतून त्या गल्लीत गेले... चोरट्यांनी अंगाला ऑईल लावले आहे... असे संदेश व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर फिरत आहेत. त्यामुळे चोरटे आल्याच्या अफवांनी मावळातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रात्र-रात्र जागून पहारा दिला जात आहे. 

 

लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे परिसरात गेल्या एक महिन्यापासून चोरटे आल्याच्या अफवा फिरत आहेत. रात्री आठ- साडेआठ वाजता चोरटे आल्याचे फोन पोलिसांना येत आहेत.  पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होतात. पोलीस घटनास्थळी गेल्यावर चोरटे पळून गेल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. या दिशेने गेले, त्या दिशेने चोरटे गेल्याचे पोलिसांना सांगितले जाते.  पोलीस पाठलाग करतात मात्र कोणीच आढळून येत नाही.


धारदार हत्यारे घेऊन 10 ते 15 जणांचे टोळके आले आहे. नागरिकांनी पकडू नाही म्हणून त्यांनी अंगाला ऑईल लावले आहे. परिसरातील लाईट बंद करुन चो-या करत आहेत, अशा अफवा गेल्या एक महिन्यापासून वडगाव, लोणावळा, तळेगाव-दाभाडे परिसरात फिरत आहेत. सोश मीडियावर चोरटे आल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे असून नागरिक रात्र-रात्र जागून काढत आहेत. गेल्या 20 ते 25 दिवसांत अशा प्रकारे चोरी झाल्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


तळेगाव दाभाडेमध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून चोरटे आल्याचे फोन येत आहे. तीन हजार चोरटे आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही, या केवळ अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र घबराट पसरली आहे.


तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील 'एमपीसी न्यूज'शी बोलताना म्हणाले, चोरटे आल्याच्या केवळ अफवा आहेत. रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु असते. नागरिकांना माझा आणि पोलीस अधिका-यांचाही मोबाईल क्रमांक दिला आहे. चोरटे आल्याचा अफवा सुरु झाल्यापासून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविले आहे. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, त्यांनी नागरिकांना केले आहे.


गेल्या महिन्याभरापासून वडगाव परिसरात चोरटे आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. रात्री आठ वाजता चोरटे आल्याचे पोलिसांना फोन येत आहेत. आम्ही घटनास्थळी गेल्यावर काहीच नसते. त्यामुळे पोलीस रात्रीची अधिकची गस्त वाढविणार आहेत. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून नागरिकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन, वडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनीही केले आहे. तसेच चोरटे आल्याचे खोटे संदेश व्हॉट्स ग्रुपवर फिरवाणा-याविरोधात पोलीस कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

23 Feb 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात पंचायत समितीच्या सहा जागा जिंकत सलग चवथ्यांदा मावळात भाजपने बाजी मारली तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकत दुसरे स्थान मिळविले. शिवसेना व काँग्रेस आयची पाटी मात्र मावळात कोरडीच राहिली. जिल्हा परिषदेमध्ये भाजपची एक जागा कमी झाली असून भाजपला दोन जागा, राष्ट्रवादीला दोन जागा व शिवसेना पुरस्कृत समांतर राष्ट्रवादीचे उमेदवार यांना एक जागा मिळाली. पाच वर्षाचा अपवादात्मक काळ वगळता मावळात 1992 पासून भाजपची सत्ता आहे.

 

जिल्हा परिषद गट 

27) टाकवे-वडेश्वर :-

शोभा सुदाम कदम (राष्ट्रवादी) = 11, 566
आशाबाई  पंडीत जाधव (भाजप) = 11,298
संतोषी राजेश खांडभोर (शिवसेना) = 03,426
मनीषा पिचड (भारिप) = 03189
(शोभा कदम 268 मतांनी विजयी)

28) इंदोरी-सोमाटणे :-
नितीन मराठे (भाजप) = 12,275
विठ्ठलराव शिंदे (राष्ट्रवादी) = 09,752
रवींद्र गायकवाड (अपक्ष) = 635
(नितिन मराठे 2535 मतांनी विजयी)

 

29) वडगाव-खडकाळा:-

बाबूराव वायकर (शिवसेना पुरस्कृत) = 10,389
रामनाथ वारिंगे (भाजपा) = 8,480
सुनिल  ढोरे (राष्ट्रवादी) = 7,770
अजित सातकर (काँग्रेस आय) = 684
संतोष लोखंडे (अपक्ष) = 323
बाळासाहेब शिंदे (अपक्ष) = 138
(बाबुराव वायकर 1909 मतांनी विजयी)

 

30) वाकसई-कुसगाव:-

कुसुम ज्ञानेश्वर काशीकर (राष्ट्रवादी) = 8003
सत्यभामा शांताराम गाडे (शिवसेना) = 6779
अनिता दिलीप कडू (भाजपा) = 6420
(कुसुम काशिकर 1224 मतांनी विजयी)

 

31) महागाव-चांदखेड:-
अलका गणेश दानिवले (भाजपा) = 13,829
उर्मिला संदीप गावडे (राष्ट्रवादी) = 11,440
बिबाबाई वाघमारे (शिवसेना) = 1498
कांताबाई गणपत पवार (काँग्रेस आय) = 546
(अलका धानिवले 2389 मतांनी विजयी)


                      
 मावळ पंचायत समिती गण

53) टाकवे बु. गण :-

शांताराम कदम (भाजपा) = 5308
शिवाजी आसवले (राष्ट्रवादी) = 4819
शांताराम नरवडे (काँग्रेस आय) = 213
दत्तू मोधळे (शिवसेना) = 565
दत्तात्रय पडवळ (अपक्ष) = 4758
तुकाराम आसवले (अपक्ष) = 135
हरिभाऊ काळोखे (अपक्ष) = 162
(शांताराम कदम 489 मतांनी विजयी)

 

54) वडेश्वर गण :-

दत्तात्रय शेवाळे (राष्ट्रवादी) = 5182
गणपत सावंत (भाजपा) = 5108
सुनिल शिंदे (शिवसेना) = 1093
बाजीराव चोरघे (अपक्ष) = 269
नारायण ठाकर (अपक्ष) = 2079
(दत्तात्रय शेवाळे 74 मतांनी विजयी)

 

55) इंदोरी गण : -

ज्योती नितिन शिंदे (भाजपा) = 5592
प्राजक्ता प्रमोद आगळे (अपक्ष) = 3306
प्राजक्ता शिंदे (भारिप) = 229
रचना घोमोडे (नवसप पार्टी) = 80
(ज्योती शिंदे 2286 मतांनी विजयी)

 

56) सोमाटणे गण :-

साहेबराव नारायण कारके (राष्ट्रवादी) = 5566
उमेश बाळू बोडके (भाजपा) = 5178
बाळकृष्ण पोटफोडे (काँग्रेस आय) = 629
शांताराम भोते (शिवसेना) = 2161
पुष्पा गायकवाड (अपक्ष) = 172
(साहेबराव कारके 388 मतांनी विजयी)

 

57) वडगाव गण : -

गुलाबराव म्हाळसकर (भाजपा) = 6706
प्रकाश आगळमे (राष्ट्रवादी) = 5056
अनिश तांबोळी (काँग्रेस आय) = 184
धनंजय नवघणे (शिवसेना) = 910
राजेंद्र कुडे (अपक्ष) = 3579
(गुलाबराव म्हाळसकर 1650 मतांनी विजयी)

 

58) खडकाळा गण : -

सुवर्णा संतोष कुंभार (भाजपा) = 4596
कविता संतोष काळे (राष्ट्रवादी) = 3426
पूनम राजेंद्र सातकर (काँग्रेस आय) = ‍1939  मीनाक्षी चव्हाण (शिवसेना) = 1198
(सुर्वणा कुंभार 1170 मतांनी विजयी)

 

59) वाकसई गण :-

महादू हरी उघडे (राष्ट्रवादी) = 4563
बाबूराव धोंडू शेळके (शिवसेना) = 3853
 संदीप उंबरे (भाजपा) = 3574
(महादू उघडे 710 मतांनी विजयी)

 

60) कुसगाव गण :-

राजश्री संतोष राऊत (राष्ट्रवादी) = 3526
संगीता अनंता गाडे (भाजपा) = 2812
उषा संजय घोंगे (शिवसेना) = 2805
रचना सुरेश घोमोड (नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी) = 174
(राजश्री राऊत 714 मतांनी विजयी)

 

61) महागाव गण :-

जिजाबाई नामदेव पोटफोडे (भाजप) = 6833
मंगल आढाव (राष्ट्रवादी) = 5893
सुरेखा भदे (काँग्रेस आय) = 287
माधुरी कुंभार (शिवसेना) = 890
(जिजाबाई पोटफोडे 940 मतांनी विजयी)

 

62) चांदखेड:-

निकिता नितीन घोटकुले (भाजप) = 6759
अलका संभाजी येवले (राष्ट्रवादी) = 5455
मनिषा भालेकर (शिवसेना) = 1158
(निकिता घोटकुले 1304 मतांनी विजयी)

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - तळेगावात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज पार पडल्या. यामध्ये मिनी आमदारकी म्हणून पाहिल्या जाणा-या इंदोरी-सोमाटणे गटात कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार, याकडे संपूर्ण तळेगावकरांचे लक्ष लागले आहे.


जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. या गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांत काट्याची  टक्कर  होणार, असे पहिल्या पासून बोलले  जात होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य  भाजपचे उमेदवार नितीन मराठे यांच्यात मुख्य अटीतटीची लढत आहे. या गटात कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार हे गुरूवारी 23 तारखेलाच समजेल.


या गटाकडे पहिल्यापासूनच मिनी आमदारकी म्हणून पाहिले जाते. शिवसेना व काँग्रेसने या गटात उमेदवार उभा केला नसल्याने येथील निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राजकीय मातब्बर घराण्यामुळे येथे प्रचाराची राळ उडाली. निकालाच्या कौलाबाबत दोन्ही पक्ष आशावादी आहेत.

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुका पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आज 74 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावळा, माळेगाव बु., खांड,  इंगळून, साते या पाच गावांमधील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.


मावळ तालुक्यात 1 लाख 76 हजार 378 मतदारांपैकी 1 लाख 30 हजार 522 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 70 हजार 839 पुरुष व 59 हजार 683 महिला मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी साडेसात वाजता मावळातील 216 मतदान केंद्रावर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या दोन तासात साडेनऊ वाजेपर्यंत मतदानांचा वेग संथ राहिल्याने 9.65 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या प्रत्येक दोन तासांच्या टप्प्यात सरासरी 15 टक्के मतदान झाल्याने दुपारी साडेतीनपर्यंत मावळात 55.78 टक्के मतदान झाले होते. किरकोळ वाद वगळत मावळात सर्वत्र शांततेमध्ये मतदान झाले. शिलाटणे गावात मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान बंद होते. तेवढा वेळ नंतर वाढवून देण्यात आला.


ग्रामीण भागात व ज्या गावातून उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मावळात 16 पोलीस अधिकारी 293 पोलीस कर्मचारी, 54 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलीस ठाण्याचे अधिकारी हे मतदान केंद्रावर जातीने लक्ष ठेवून असल्याने कसलाही गैरप्रकार झाला नाही.


ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भाग व दुर्गम भागात मतदानाचा वेग काहीसा कमी होता. वडगाव मात्र याला अपवाद ठरले. कार्ला व शिलाटणे या दोन गावांमध्ये आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आले असून मतदान केंद्रावर मतदारांसाठी मंडप, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे. तसेच आकर्षक रांगोळी काढत मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. मतदान करणार्‍यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात असल्याने मतदारांनी देखील आनंद व्यक्त केला. मावळच्या निवडणूक निरिक्षकांनी या केंद्रांना भेटी देत सोयीसुविधांची पाहणी केली.मतदान आकडेवारी गणानुसार

27 टाकवे बु. वडेश्वर (टाकवे बु. गण) -  एकूण मतदान - 20068, झालेले मतदान - 15887, 79.17 टक्के


27 टाकवे बु. वडेश्वर -  (वडेश्वर गण) - एकूण मतदान 18538, झालेले मतदान 13964, 75.33 टक्के


28 इंदोरी-सोमाटणे (इंदोरी गण) - एकूण मतदान 12940, झालेले मतदान - 9332, 72.12 टक्के


28 इंदोरी- सोमाटे (सोमाटणे गण) - एकूण मतदान 18607, झालेले मतदान - 13895, 74.68 टक्के


29 वडगाव-खडकाळा (वडगाव गण) - एकूण मतदान 22128, झालेले मतदान 16550, 74.79 टक्के


29 वडगाव-खडकाळा (खडकाळा गण) - एकूण मतदान 15812, झालेले मतदान - 11405, 72.13 टक्के


30 वाकसाई- कुसगाव बु. (वाकसाई गण) - एकूण मतदान 17661, झालेले मतदान 12337, 69.85 टक्के


30 वाकसाई- कुसगाव बु (कुसगाव बु. गण) - एकूण मतदान 13217, झालेले मतदान 9483, 71.75 टक्के


31 महागाव-चांदखेड (महागांव गण) - एकूण मतदान 19940, झालेले मतदान 14078, 70.60 टक्के


31 महागाव - चांदखेड (चांदखेड गण) - एकूण मतदान 17467, झालेले मतदान 13591, 77.81 टक्के

21 Feb 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या वैद्यकीय, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत त्यांना तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. के.एच. संचेती व अरुण फिरोदिया, अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


डॉ. भंडारी यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य, समाजसेवा या क्षेत्रात भरीव काम केले आहे. समाजातील वंचित घटकांसाठीही  त्यांनी नि:स्वार्थी भावनेने योगदान दिले आहे. पाचाणे येथील शांताबाई येवले मुलींचे वसतीगृह या सेवाभावी संस्थेस ते प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करतात. माजी नगरसेविका (कै.) डॉ. विजया शाळीग्राम भंडारी  यांच्या नावाने वस्तीगृहाची उभारणी केली आहे. तसेच त्यांनी तळेगाव येथे  स्वखर्चाने सार्वजनिक बसथांबा उभारला आहे. दादा-दादी पार्कमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 


तळेगाव लायन्स क्लबच्या माध्यमातून डॉ. भंडारी यांचे योगदान हे अतुलनीय आहे, असे  गौरवद्धगार  डॉ. संचेती यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. फिरोदीया यांनीही डॉ. भंडारी यांचे कौतुक केले. तळेगावमधील सर्व लायन्स सदस्यांनी डॉ. भंडारी यांचे अभिनंदन केले आहे.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start