• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
12 May 2017

एमपीसी न्यूज - सध्या उन्हाळी सुट्यांत मुलांच्या अनेक विविध शिबिरांचा धमाका चालू असताना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद तळेगाव शाखेने चक्क पालकांचे नाट्य प्रबोधन शिबिर घेऊन पालकांनाच दंगा, मस्ती व नाटक करायला लावले. या शिबिरात मुलांचे प्रश्न, अडचणी, घरातील वातावरण, स्पर्धा,  तुलना आणि अपेक्षा या विषयांवरील अनेक रंगमंचीय खेळातून पालकांनी आपल्या मुलांच्या तक्रारी जाणून घेतल्या.


अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद तळेगाव शाखेने आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या नाट्य शिबिराची सांगता झाली. या समारोप समारंभात नाट्य परिषदेचे खजिनदार नितीन शहा, सुरेशभाऊ दाभाडे, उर्मिला छाजेड आणि कलापिनीच्या उपध्यक्षा शर्मिला शहा उपस्थित होत्या.


शिबिराला तळेगाव मावळ परिसरातील 38 शिबिरार्थींचा सहभाग होता मुलांचा आणि पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या शिबिराचा समारोप काल (गुरुवार, दि.11) रोजी झाला समारोप झाला. दहा दिवसांच्या शिबिरात विद्यार्थी एवढे मग्न झाले होते कि दहा दिवसांऐवजी हे शिबीर शंबर दिवसांचे असायला हवे, असा मोह बालकांनी बोलून दाखविला. मुलांच्या क्षमतेच्या प्रमाणात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याची पालकांकडून शपथही घेण्यात आली. सर्वोत्कृष्ट सृजनशीलता वैष्णवी पवार, सर्वोत्कृष्ट सहभाग वेदांत काणे व आर्या चितळे, सर्वोत्कृष्ट वर्तन जानव्ही इखे, सर्वोत्कृष्ट प्रगती सृष्टी कदम व विश्वजित जाधव यां विद्यार्थ्यांचा समारोप कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.


आपले तळेगाव सांस्कृतिक चळवळीचे  माहेरघर आहे फक्त आपण त्यात सहभागी व्हायला हवे आपल्या पाल्यांनाही सहभागी करायला हवे असे मत विश्वास देशपांडे यांनी मनोगतात मांडले. आपण चांगले वागलो की आपली मुलेही चांगली वागतात.या शिबिरात मुलांना मी शिकवले नाही तर मुले स्वत:हून शिकली आणि हीच स्वत:शकण्याची सवय त्यांना पुढील आयुष्यात खुप उपयोगी पडेल असे मा.देवदत्त पाठक सरांनी आपल्या मनोगतात सांगितले.


रंगभूमी कला तज्ञ प्रा. देवदत्त पाठक आणि मिलींद केळकर या दोघांनी शिबिराचे संचालन केले. शिबिराची संकल्पना देवदत्त पाठक यांची होती. उपक्रमासाठी सुरेश धोत्रे (अध्यक्ष), उर्मिला छाजेड, नयना डोळस, राजेश बारणे, भरत कुमार छाजेड, निरंजन जहागिरदार, विजय कुलकर्णी, सुषमा इखे यांचे सहकार्य लाभले.

09 May 2017

एमपीसी न्यूज - लहान मुलांमध्ये बाल नाट्य आणि बाल व्यक्तिमत्वचा विकास व्हावा यासाठी तळेगाव दाभाडे येथील कलापिनीच्या वतीने बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीत, चित्रकला, प्रिंटींग, नृत्य शारीरिक कसरती, बौद्धिक खेळ, वाचन, लेखन, क्राफ्ट अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.

शिबिराच्या समारोपासाठी, अरविंद करंदीकर, विश्वास देशपांडे व अशोक बकरे हे मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा, चिंचवड, तळेगाव परिसरातील एकूण ३० मुलांनी सहभाग घेतला होता. या शिबिराला नाट्य प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातून श्रुती अत्रे आणि सहकारी, लेखन प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रमोद काळे, हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, काव्य प्रशिक्षणासाठी  डॉ.केतकर, डॉ.परांजपे, क्राफ्ट साठी शर्मिला शहा, पेंटिंग आणि प्रिंटींग साठी विराज सवाई, नृत्यासाठी मुक्ता भावसार, सागर रोकडे, संगीतासाठी चांदणी पांडे, प्रदीप जोशी, अजय चौधरी, काव्यावरील नृत्यासाठी मीनल कुलकर्णी, रंगमंचीय खेळासाठी नयना डोळस यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी कै.कल्पना करंदीकर स्मृती पुष्पांतर्गत कार्यक्रमात शिबिरार्थींनी दोन नाट्य प्रवेश, घाशीराम कोतवाल मधील नांदी साभिनय सादर केली, कौस्तुभ रामायणे याने संगीत सौभद्र मधील पद सादर केले तसेच शिबिरार्थींच्या नेत्रदीपक नृत्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे नियोजन विशाखा बेके यांनी केले. बुरसे, अंजली सहस्त्रबुद्धे, दीपा जगनाडे, रामचंद्र रानडे, ओम भावसार, कलापिनीचे युवा कार्यकर्ते आणि पालक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. 

09 May 2017
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे प्रीमिअर लीग २०१७ मध्ये तळेगाव दाभाडे वॉरियर्स संघाने रोमहर्षक विजय मिळवून आपण खरे फायटर्स असल्याचे सिद्ध केले आहे. 


टीपीएलच्या अंतिम लढतीमध्ये तळेगाव दाभाडे पँथर्स संघावर तळेगाव दाभाडे वॉरियर्स संघाने विजय मिळवून टीपीएल २०१७ चा विजय आपल्या नावावर केला आहे. 
प्रति आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपीएल स्पर्धेला सोमवारी सुरवात झाली उदयोन्मुख खेळाडूंना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि तरुणामधील एकीची भावना वाढीस लागावी, यासाठी तळेगाव प्रीमियर लीग स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेला यंदा तीन वर्षे पूर्ण झाली. प्लास्टिक बॉलवर भव्य स्वरूपात खेळली जाणारी ही एकमेव स्पर्धा आहे.

तळेगाव दाभाडे प्रीमियर लीगचे आयोजन उपनगराध्यक्ष सुनील (आण्णा) शेळके, मवाळकेसरी प्रशांत वाघमोरे, क्रीडाशिक्षक गोरख काकडे, प्रृथ्वीराज मु-र्हे, चैतन्य कुलकर्णी, प्रणव भेगडे, अक्षय दाभाडे, ओंकार भेगडे, गौरव परदेशी ओंकार काळोखे यांनी केले होते.

09 May 2017
कलापिनीचा चाळीसावा वर्धापन दिन समारोप सोहळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज -''कलापिनी आणि अप्पांचं म्हणजेचं गो.नी. दांडेकरांचं नातं अतूट  आहे. त्यामुळे कलापिनीचे आणि माझे बंधही अतूट असेच आहेत. कलापिनीच्या चाळीस वर्षांच्या कलाप्रवासाची मीदेखील साक्षीदार आहे. ''असे मत प्रसिध्द अभिनेत्री मृणाल देव - कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निमित्त होते येथील कलापिनीच्या चाळीसाव्या वर्धापन दिन समारोप सोहळ्याचे. यावेळी त्यांचे पती अॅड. रुचिर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर  मधुकर शिंदे, सौ. शिंदे, मोहन कुंटे, जयंत जोशी, डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्त्रबुध्दे, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्षा शर्मिला शहा आदी मान्यवर उपस्थित होते. 


मृणाल  पुढे म्हणाल्या, ''अप्पांच्या सहवासामुळे इतिहासाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिऴाला. ऐतिहासिक भूमिका करताना आणि रमा माधवचे दिग्दर्शन करताना या दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. '' मृणाल यांनी मुलाखतीत मराठी व हिंदी मालिका, चित्रपट याबाबतचे अनुभव मोकळेपणाने सांगितले.  अॅड. रुचिर कुलकर्णी यांनी वाचिक अभिनयाचे महत्त्व सांगितले व गोनीदांच्या कादंब-यांच्या अभिवाचनाचे अनुभव सांगितले. 


 षष्ट्‌यब्दिपूर्तीनिमित्त मधुकर शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोहन कुंटे, जयंत जोशी,  विनायक लिमये,  यांना देखील गौरविण्यात आले.  कार्यक्रमात कलापिनी गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तेजस्विनी गांधी, समीर नरवडे, हृतिक पाटील, चेतन पंडित, विशाखा बेके, विराज सवाई, विनायक काळे, वादिराज लिमये, हेमंत आपटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


विनया केसकर व डॉ. अनंत परांजपे यांनी मृणाल व अॅड. रूचिर यांची  प्रकट मुलाखत घेतली. विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला शहा यांनी आभार मानले. कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
08 May 2017
एमपीसी न्यूज - मध्य प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव येथील सुजय सचिन भगतला सुवर्ण पदक मिळाले. 


मध्य प्रदेशातील खांडवा येथील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर ५ ते ७ मे दरम्यान तिसरे राष्ट्रीय थायबॉक्सिंग फेडरेशन २०१७ या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे येथील हाचिंग हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणा-या सुजयची निवड झाली होती. त्यामध्ये सुजयने सुवर्णपदक मिळविले. 


त्याबद्दल इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे मुख्य विश्वस्त संतोषशेठ शेळके आणि इंद्रायणी स्कूलच्या वतीने सुजयचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संपूर्ण तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी सुजयला प्रशिक्षक सुभाष दाभाडे आणि भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. 
08 May 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे प्रीमिअर लीगची अंतिम लढत आज (सोमवार) तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स संघांमध्ये होणार आहे. अंतिम लढतीचा थरार थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. 2 च्या मैदानावर होणार आहे.

उपांत्य फेरीत तळेगाव दाभाडे फायटर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सनरायजर्स यांच्यातील पहिल्या लढतीत संघमालक सागर टकले यांच्या तळेगाव दाभाडे फायटर्स संघाने अंतिम फेरीकडे आगेकूच केली. तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सुपरकिंग्ज यांच्यातील दुस-या लढतीत संघमालक जय दाभाडे यांच्या तळेगाव दाभाडे पँथर्स संघाने विजय मिळविला.

मागील तीन वर्षांपासून तळेगाव दाभाडे प्रीमिअर लीगचे तळेगाव दाभाडे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. फाऊंडेशनच्या सदस्यांचे 12 संघ तयार करून इंडियन प्रीमिअर लीगप्रमाणे या संघांना नावे दिली जातात. प्रत्येक संघाला स्वतंत्र संघमालक, स्वतंत्र प्रशिक्षक देखील देण्यात येतो. टीपीएलच्या चाहत्यांचे लक्ष आज (सोमवार) होणा-या अंतिम सामन्यांकडे लागले असून थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटिल शाळा क्र 2 च्या मैदानावर सायंकाळी 8.00 वाजता सामना सुरू होणार आहे.

07 May 2017

एमपीसी न्यूज - टीपीएलच्या दुस-या फेरीत सहा संघांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. सुपर सिक्सच्या लढतीमध्ये दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात लढले. जितू पानसरे यांचा तळेगाव दाभाडे वॉरियर्स तर निलेश राक्षे यांच्या तळेगाव दाभाडे रॉयल्स या संघांना घरचा रस्ता धरावा लागणार असून विक्रम काकडे यांचा तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज, मयुर काळोखे यांचा तळेगाव दाभाडे सनरायजर्स, सागर  टकले यांचा तळेगाव दाभाडे फायटर्स आणि जय दाभाडे यांचा तळेगाव दाभाडे पँथर्स संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे.

काल (शनिवार) झालेल्या सामन्यांमध्ये पहिला सामना तळेगाव दाभाडे सनरायजर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे रॉयल्स यांच्यामध्ये झाला. ज्यामध्ये तळेगाव दाभाडे सनरायजर्स संघाने विजय प्राप्त केला. दुसरा सामना तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे वॉरियर्स यांच्यामध्ये झाला, ज्यामध्ये तळेगाव दाभाडे पँथर्स संघाला पुढे जाण्याची संधी मिळाली. तळेगाव दाभाडे वॉरियर्स संघाला मिळालेली पेनल्टि हि या सामन्याची टर्निंग पाईंट ठरली. अखेरच्या षटकात सहा चेंडु आणि 12 धावांची गरज असताना तळेगाव दाभाडे पँथर्स संघाचा अक्षय पवार याने सुरेख गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवुन दिला. अक्षय पवार यांच्याकडे टीपीएल मधील जांभळी टोपी (Purple Cap) आहे.

तळेगाव दाभाडे रॉयल्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज यांच्यातील तिस-या सामन्यात सुपर किंग्ज संघाने विजय संपादन केला. तळेगाव दाभाडे वॉरियर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स यांच्यातील चौथ्या सामन्यात तळेगाव दाभाडे संघाने उपांत्य फेरीत आगेकूच केली.

तळेगाव दाभाडे सनरायजर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज यांच्यातील पाचवा सामना अत्यंत चुरशीचा सामना झाला. 44 धावांचा पाठलाग करत तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज या संघाचा सलामीचा गोलंदाज सुरज ठाकुर याने पहिल्या तीन चेंडुवर तीन गडी बाद करून अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर केला तरीदेखील तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज संघाला हा सामना गमवावा लागला.

तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स यांच्यातील सहाव्या सामन्यात स्वप्निल केसरकरने 5 चेंडुवर 5 षटकार मारल्यामुळे सामना एकतर्फी झाला आणि तळेगाव दाभाडे पँथर्स संघाला सहज विजय प्राप्त करण्यात यश आले. तळेगाव दाभाडे पँथर्स संघाने हा विजय मिळवुन या लीग मध्ये एक ही सामना न हारता विजयी घोडदौड पुढे चालू ठेवली.

आज (रविवार) टीपीएलच्या उपांत्य फेरीचा थरार थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटिल शाळा क्र 2 च्या मैदानावर रंगणार आहे. तळेगाव दाभाडे प्रीमियर लीगचे आयोजन उपनगराध्यक्ष सुनील (आण्णा) शेळके, मवाळकेसरी प्रशांत वाघमोरे, क्रीडाशिक्षक गोरख काकडे, प्रृथ्वीराज मु-र्हे, चैतन्य कुलकर्णी, प्रणव भेगडे, अक्षय दाभाडे, ओंकार भेगडे, गौरव परदेशी ओंकार काळोखे यांनी केले आहे.

06 May 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे प्रीमियर लीगची पहिली फेरी काल (शुक्रवार) संपली. पहिल्या फेरीतील 12 सामने झाल्यानंतर दुस-या फेरीत तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज, तळेगाव दाभाडे वॉरियर्स, तळेगाव दाभाडे पँथर्स, तळेगाव दाभाडे सनरायजर्स, तळेगाव दाभाडे रॉयल्स, तळेगाव दाभाडे फायटर्स या संघांनी पदार्पण केले आहे.

पहिल्या फेरीत स्वप्नील केसरकरचा 78 धावांचा विक्रम मोडत मयूर बालघरेने 85 धावा करत नारंगी टोपी (Orange Cap) आपल्या नावावर केली. तर अक्षय पवारच्या नावावरील जांभळी टोपी (Purple Cap) मात्र त्याच्याचकडे राहिली. 8 बळी घेत त्याने ही टोपी आपल्या नावावर केली आहे. पहिल्या फेरीत प्रशांत वाघमोरे, अक्षय घुले, बंटी शेख, केतन कोतूळकर, शुभम महाजन यांनी उत्कृष्ठ झेल (Catch) केले. तर संतोष राठोड, पृथ्वीराज जगताप यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले.तिस-या दिवशीच्या तळेगाव दाभाडे इंडियन्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात तळेगाव दाभाडे इंडियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फायटर्स संघाने 4 षटकांमध्ये 54 धावांचे लक्ष इंडियन्स संघासमोर ठेवले. इंडियन्स संघाने हे लक्ष अगदी सहज पार केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष  सुनील (आण्णा) शेळके, मवाळकेसरी प्रशांत वाघमोरे आणि क्रीडाशिक्षक गोरख काकडे यांच्या यशस्वी आयोजनामुळे या सामन्यांना चांगलीच रंगत येत आहे.


सुपर सिक्स (दुसरी फेरी) मधील सामने -

1) तळेगाव दाभाडे सनरायझर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे रॉयल्स 

2) तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे वॉरियर्स

3) तळेगाव दाभाडे रॉयल्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज

4) तळेगाव दाभाडे वॉरियर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स

5) तळेगाव दाभाडे सनरायझर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे सुपर किंग्ज

6) तळेगाव दाभाडे पँथर्स विरुद्ध तळेगाव दाभाडे फायटर्स

06 May 2017

तपासासाठी 8 स्वतंत्र पथके तयार करणार - सुवेझ हक

एमपीसी न्यूज -  मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात 25 एप्रिल रोजी पहाटे दरोडा सशस्त्र दरोडा टाकून तिघांची निघृण हत्या करणा-या टोळीतील 11 आरोपींपैकी पाच जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. यातील उर्वरीत पाच आरोपी राहता पोलीस ठाण्यात अटकेत असून एकजण फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली.

नागेश उर्फ नाग्या नागेश्वर भगवान भोसले (वय-23, रा. थेरगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर), छोट्या लहानू काळे (वय-4, रा. राक्षसवाडी, ता.कर्जत, अहमदनगर), बाब्या उर्फ भेज्या जिंद्या चव्हाण (वय-20, रा.कोपरगाव रेल्वे स्टेशन, शिंगणापूर), सेवन उर्फ डेग्या प्याब चव्हाण (वय-20, रा.जवळके सोयगाव, ता.संगमनेर, जि.अहमदनगर) दिलिप पांडू चव्हाण (वय-25, रा.खोकाना बाजारतळ, ता. नेवासा जि.अहमदनगर या पाच जणांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून दौंड ते काष्टी या मार्गावरील भीमा नदीच्या पुलाजवळून आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यची कबूली दिली व इतर आणखी 6 साथीदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुप-या भोसले, राजू तुकाराम शिंगाडे (वय-22, रा.शेवली तांडा, जालना), अजय शिवाजी पवार उर्फ अजय शकुंतला भोसले (वय-19, रा. पिळवंडी, जि.अहमदनगर), योगेश बिरजू उर्फ बिरज्या भोसले (वय-23, रा.टी पॉईंट, सिद्दटेक, राजा बुलडाणा) आणि दीपक बिरजू उर्फ बिरज्या भोसले (वय-21, रा.टी पॉईंट, सिद्दटेक, राजा बुलडाणा) हे पाच आरोपी 28 एप्रिल पासून अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत. तर अन्य एक आरोपी किशोर बिरजू उर्फ बिरज्या भोसले (वय-20. रा. टी पॉईंट, सिद्धटेक, राजा बुलढाणा) हा फरार आहे.

या  सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60), अत्रीनंदन तथा आबा नथू फाले (वय 30), अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांची नावे होती. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री (वय 25) व नात अंजली (वय 6) जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तेजश्री या गंभीर जखमी असून अंजली किरकोळ जखमी होती. आरोपींनी अतिशय निघृणपणे डोक्यात टिकावाचे घाव घालून हत्या केली होती.

या तपासासाठी स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस व कर्मचारी यांचे 8 स्वतंत्र पथक बनविण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

05 May 2017
एमपीसी न्यूज - तळेगाव प्रीमियर लीग स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या तळेगाव दाभाडे प्रीमियर लीगच्या दुस-या दिवशी तळेगाव दाभाडे पँथर आणि तळेगाव दाभाडे ब्लास्टर संघांमध्ये चांगलाच चुरशीचा सामना झाला.
 
तळेगाव दाभाडे ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.तळेगाव दाभाडे पँथर संघाने ब्लास्टर संघासाठी 67 धावांचे लक्ष ठेवले. उत्कृष्ठ गोलंदाजी करत पँथर संघाने ब्लास्टर संघाला 47 धावांमध्ये गुंडाळून टाकून विजय प्राप्त केला.
 
तळेगाव दाभाडे सुपर किंग संघाकडून खेळणारा अभिजीत घुले स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच 63 धावा करत नारंगी तर 7 गडी बाद करत जांभळ्या अशा दोन्ही टोपीचा मानकरी ठरला. परंतु दुस-या दिवशी तळेगाव दाभाडे पँथर संघाच्या स्वप्नील केसरकरने 78 धावा करत नारंगी टोपीचा मान मिळविला तर याच संघाच्या अक्षय पवारने 8 गडी बाद करत अभिजीत घुलेकडची जांभळी टोपी आपल्या नावावर केली.
 
पहिल्या फेरीचा आजचा (शुक्रवार) शेवटचा दिवस असून उद्या (शनिवार) पासून दुस-या फेरीस सुरुवात होणार आहे. टीपीएलचे यंदाचे तिसरे वर्ष असून टीपीएलला दरवर्षी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. आयोजकांचे नियोजन अचूक असल्याने स्पर्धेच्या गुणवत्तेत वर्षानुवर्षे वाढ होत आहे.
Page 8 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start