• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
28 Apr 2017

एमपीसी न्यूज- स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी दहा हजार व-हाडीसाठी मंडप, भोजन आणि पार्कींगची सोय करण्यात आली होती.


नवरदेवांची बग्गीमधून बँडपथकासह मिरवणूक काण्यात आली. साखरपुडे समारंभात आमदार संजय भेगडे यांनी उपस्थितांचे आणि नवरा नवरीचे स्वागत केले. तर हभप तुषारमहाराज दळवी यांनी नवदांपत्यांना आर्शीवाद दिले.


यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, सरपंच अर्चना भोकरे, प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, सुभाष जाधव, बाळासाहेब घोटकुले आदी उपस्थित होते. शुभविवाह प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, बाळासाहेब ढोरे, गणेश ढोरे यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री मदन बाफना, माऊली दाभाडे यांनी स्वागत केले तर हभप नितीन महाराज काकडे यांनी अशीर्वाद दिले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम ढोरे व राजेंद्र कुडे यांनी मान्यवरांचे अभार मानले.


देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळस्कर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, साहेबराव कारके, दत्ता शेवाळे, गणेश खांडगे, सुनील शेळके, रमेश गायकवाड उपस्थित होते. सोहळा समिती अध्यक्ष अध्यक्ष विलास दंडेल यांनी प्रास्ताविक केले. गणेश विनोदे व प्रवीण ढोरे यांनी सुत्रसंचालन केले. अतुल राऊत यांनी अभार मानले.

27 Apr 2017

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पाचवा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. २६) संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. यावेळी शिक्षणापासून वंचित असणा-या विद्यार्थ्यांसाठी हार फुला ऐवजी वही पेन दान करा या कार्यक्रमाचे आयोजन अमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्याचा ताबा मिळाला त्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी यावेळी साज-या करण्यात आल्या.


यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, अॅड. रंजना भोसले, अशोक काळे, राजू जाधव, आनंदराव ओव्हाळ, बापुसाहेब गायकवाड, दलितानंद थोरात आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव किसन थुल यांनी केले, सूत्रसंचालन एल. डी. कांबळे व संजय गायकवाड यांनी केले आणि आभार मोहन बनसोडे यांनी मानले.

27 Apr 2017
एमपीसी न्यूज - आंबी (ता.मावळ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नंदकुमार घोजगे यांची बिनविरोध निवड झाली. मेघा बनसोडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. 
 
उपसरपंचपदासाठी घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली व्यवहारे  यांनी घोजगे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच वामन वारिंगे, अंकुश घोजगे, चंद्रकांत घोजगे,अशोक घोजगे आदींनी विशेष प्रयत्न केले.
 
ही निवडणूक सरपंच सुवर्णा प्रफुल्ल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

26 Apr 2017

एमपीसी न्यूज - आंबी तालुका मावळ येथील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्माचा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला.


याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 30 वर्षीय पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घटने दिवशी घरात एकटी होती. आरोपीने घरात येऊन तिचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल, असे वर्तन केले. तरुणीने आपली सुटका करून घेत तेथून पळून गेली. आरोपी घराजवळ असलेल्या एका हॉटेलच्या रूममध्ये लपून बसला. त्यावेळी पीडित महिलेचा पती, सासू, सासरे आणि शेजारचे लोक जमा झाल्याने आरोपीने हॉटेलच्या रुमचे छताचे पत्रे उचकटून तेथून पळ काढला. विवाहितेने तळेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.


तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

26 Apr 2017

एमपीसी न्यूज -  दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एक ज्येष्ठ टाळकरी नथू फाले, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला तर सून व सहा वर्षांची नात गंभीर जखमी झाल्याची घटना काल (मंगळवार) पहाटे मावळमधील धामणे या गावात घडली. फाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी धामणे गावात जाऊन फाले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच सांगवडेतील नवनाथ लिमण यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेऊन सांत्वन केले.

 

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात दरोडे खोरांनी फाले कुटुंबातील तीन जणांचा खन केला. या घटनेनंतर धामणे गावावर शोककळा पसरली आहे. आज खासदार श्रीरंग बारणे यांनी धामणे गावाला भेट दिली. यावेळे फाले यांच्या मुलाची भेट घेऊन सांत्वन केले. घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक असून या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या.

 

सांगवडे येथे निम्हण कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर खारसदार श्रीरंग बारणे म्हणाले की, सांगवडे गावात जो प्रकार घडला आहे तो अत्यंत वाईट आहे. मावळ पोलिसांनी दक्ष राहून काम केले पाहिजे. गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे. सध्या मावळात जे घडत आहे ते योग्य नसल्याचे सांगून आपण लवकरच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

25 Apr 2017

महिनाभरात आठ खून; चार खून प्रकरणांचा अद्याप तपास नाही


एमपीसी न्यूज - शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मावळाला गुन्हेगारीची नजर लागली आहे. मावळात गुन्हेगारी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. मावळात वाढत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. एका महिन्यामध्ये एकूण आठ खून झाले आहेत. त्यापैकी फक्त तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे तर पाच गुन्ह्याचा अद्याप तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.


आज पहाटे मावळात धामणे येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत ज्येष्ठ टाळकरी, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडे येथील सरपंच दीपाली लिमन यांचे पती नवनाथ अर्जुन लिमण (वय-32 रा.सांगवडे) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना  मध्यरात्री बाराच्या सुमारास भैरवनाथ मंदिरात घडली. पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून नवनाथ यांचा निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्यांचे इतर साथीदार अद्यापही फरार आहेत. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड आणि लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आयटी’ तरुणी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा दुहेरी खून होऊन अनेक दिवस होऊनही त्याचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलेले नाही. ‘आयटी’ अभियंता तरुणीच्या खून प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या सहभागाबाबत पुरेसे पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली, तर लोणावळ्याच्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य मारेकर्‍यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, ग्रामीण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी मोकाट फिरत असून, या दोन्ही गुन्ह्याची कारणेही गुलदस्त्यात आहेत.

 

लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणार्‍या सार्थक दिलीप वाघचौरे आणि श्रुती संजय डुंबरे या तरुण आणि तरुणीचे मृतदेह हे विवस्त्र आणि छिन्नविछिन्न अवस्थेत 3 जानेवारी 2017  रोजी आढळून आले होते. या दोघांच्याही डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मुलामुलीचे मोबाईल वगळता अंगावरील ऐवज, हातातील घड्याळ हे जसेच्या तसे घटनास्थळी सापडल्याने हे खून चोरीसाठी झाले नाही हेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे खून नक्की कोणत्या कारणासाठी झाले याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

‘ऑनर किलिंग’पासून एकतर्फी प्रेम, प्रेमाचा त्रिकोण अशा सर्व शक्यता पोलीस तपासून बघत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे पाचशेहून अधिक जणांची तपासणी केली आहे. मात्र, काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. या दुहेरी खुनाच्या तपासासाठी 10 ते 12 अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषणाची आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनची एकूण आठ पथके तपास करत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले आहे. तरी देखील काहीच उपयोग झालेला दिसत नाही.

 

मावळ परिसरात यापूर्वी राजकीय वादातून खून झाले. मात्र, यामध्ये आरोपींची माहिती असल्याने पोलिसांना तत्काळ अटक करणे सोपे झाले. परंतु, माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणातील नक्की आरोपी कोण हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘आयटी’ अभियंता अंतरा दास आणि लोणावळा येथील दुहेरी खून प्रकणातील कारणही स्पष्ट होत नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

25 Apr 2017

एमपीसी न्यूज - सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत एक ज्येष्ठ टाळकरी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला तर सून व सहा वर्षांची नात गंभीर जखमी झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळ धामणे या गावात आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60), अत्रीनंदन तथा आबा नथू फाले (वय 30) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांची नावे आहे. या घटनेते नथू फाले यांची सून तेजश्री (वय 25) व नात अंजली (वय 6) जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तेजश्री या गंभीर जखमी असून अंजली किरकोळ जखमी आहे. डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
 
फाले यांचे घर गावापासून थोडे बाजूला शेतातील पडाळीवर आहे. दरोडा पडला तेव्हा एकूण सात जण घरात होते. त्यापैकी अनुष्का व ईश्वरी या दोन लहान मुली सुखरूप बचावल्या. फाले यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी धामणे गावातील दोन-तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याची माहिती देखील पुढे आली आहे.
 
नथू फाले हे मावळ तालुक्यातील ज्येष्ठ टाळकरी होते. तालुक्यातील बहुतेक हरीनाम सप्ताहांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. ज्येष्ठ वारकरी असणारे हभप फालेमामा या नावाने ते सांप्रदायिक क्षेत्रात ओळखले जात. त्यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी वृत्तास दुजोरा दिला आहे.
 
 
 Untitled 2
 
 दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले छबाबाई नथू फाले,नथू विठोबा फाले, अत्रीनंदन तथा आबा नथू फाले  
24 Apr 2017

पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची नार्को टेस्ट करावी


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील वैष्णवी लोहटच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करावी आणि या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी पुणे जिल्हा जागतिक मानवाधिकार जनजागरण समितीचे सरचिटणीस प्रदिप नाईक यांनी केली आहे. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.


वैष्णवी हेमंत लोहट (वय-16, रा. तळेगाव दाभाडे) या मुलीचा 21 डिसेंबर 2016 रोजी तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ संशयास्पद मृत्यू झाला होता.  रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची जबाबदारी स्वीकारत नसताना स्थानिक पोलिसांना मात्र हा रेल्वे अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस खात्याकडून या गुन्ह्याचा तपास लावण्यास अपयश आल्याने हा गुन्हा सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


या प्रकरणामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, तळेगाव दाभाडे रेल्वे पोलीस अधिकारी सचिन राठोड आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट करावी. नार्को टेस्टमध्ये गुन्ह्याची सत्यता सर्वांसमोर येईल आणि वैष्णवीच्या मारेक-यांना शिक्षा होऊन कुटुंबीयांना न्याय मिळेल.


तळेगाव पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करत असताना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हा गुन्हा काढून घ्यावा आणि या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देऊन गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या सर्वांची चौकशी करावी अशी मागणी प्रदीप नाईक यांनी गृहराज्य मंत्र्यांना केली आहे. दरम्यान वैष्णवीच्या वडिलांनी देखील या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी गृहराज्य मंत्र्यांकडे केली आहे.

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ छायाचित्रकार व पत्रकार रमेश जाधव(गुरूजी) यांची तर उपाध्यक्षपदी लोकमतचे वार्ताहर संतोष थिटे यांची रविवारी बिनविरोध निवड झाली. तर सामाजिक प्रकल्प सल्लागारपदी लोकमतचे ज्येष्ठ वार्ताहर विलास भेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


पत्रकार संघाच्या कार्यालयात मावळते अध्यक्ष अमीन खान यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध पार पडली. संघाच्या सचिवपदी राधाकृष्ण येणारे यांची तर कार्याध्यक्षपदी गणेश बोरूडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रास्ताविक विलास भेगडे यांनी केले. प्रभाकर तुमकर यांनी आभार मानले.


नूतन कार्यकारिणी याप्रमाणे-


अध्यक्ष- रमेश जाधव (सकाळ)


उपाध्यक्ष- संतोष थिटे (लोकमत)


कार्याध्यक्ष- गणेश बोरुडे (सकाळ)


सचिव- राधाकृष्ण येणारे (सकाळ)


खजिनदार- प्रभाकर तुमकर (एमपीसी न्यूज)


पत्रकार परिषद प्रमुख- अमीन खान (मावळ समृद्ध समाचार)


प्रकल्प प्रमुख- ऋषिकेश लोंढे, बद्रीनारायण पाटील (पुढारी)


संपर्क प्रमुख- संतोषी तोंडे (मावळ वार्ता)


कार्यकारिणी सदस्य- विलास भेगडे, रमेश फरताडे, महेश भागीवंत, किरण दहिभाते, महादेव वाघमारे, सचिन शिंदे, चैत्राली राजापूरकर, अनीस शेख, गणेश दुडम, तुषार वहिले, मंगेश खैरे

 

bhegde 1

23 Apr 2017

एमपीसी न्यूज - सुरकुतलेल्या चेहे-यांवर आनंद ओसंडून वाहताना ते चेहरे अधिकच निरागस वाटत होते. निमित्त होते,  वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस पाहून उपस्थित रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

 

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका कल्पना भोपळे, शोभा भेगडे, शोभा परदेशी, रजनी ठाकूर, रणजित खांडगे, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भरड, सा. अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सचिव उर्मिला छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आजी आजोबांचे निवेदन, त्यांनी सादर केलेली गाणी, बासरीवादन, विडंबन गीते, नृत्यसादरीकरण, कथाकथन याला रसिकांची वाहवा मिळाली. विविध प्रांतातल्या लोकांच्या दिंडीने कार्यक्रमाचा आलेख उंचावला. या दिंडीत पंजाबी, कानडी, बंगाली, गुजराथी, गोवानीज वेष घातलेले आजी आजोबा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या दिंडीत मान्यवरांसह प्रेक्षकदेखील सहभागी झाले होते.

Page 10 of 20
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start