• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
23 Jun 2017


एमपीसी न्यूज - महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉपची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडी कॉप अगदी सावलीप्रमाणे त्यांची सुरक्षा करेल. त्यामुळे बडीकॉपला आपले माना, असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी आयटी तरुणींना केले आहे.


महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्हॉटस् अॅपवर पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने "बडीकॉप' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गतच सिटी सेफ हे फेसबुकपेज ही तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर नोकरदार महिलांनी व विशेष करून आयटी क्षेत्रातील महिलांनी करावा यासाठी हिंजवडी फेज 3 मधील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी या कंपनीत चर्चा सत्राचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सह आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त शशीकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सायबर सेलचे नोडल ऑफिसर आणि बडी कॉपचे प्रमुख सुधीर हिरेमठ, राधिका आपटे,  सहआयुक्त विक्रम पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, वाकडचे श्रीधर जाधव, दयानंद ढोमे आदी उपस्थित होते.

यावेळी सायबर कन्सलटंट व तज्ज्ञ म्हणून पोलीस प्रशासनाला मदत करणारे पंकज घोडे, प्रणित कुमार, रविराज मराठे यांच्यासह आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी बडी कॉप, सिटी सेफ ही संकल्पना समजावून सांगितली.

यावेळी रश्मी शुक्ला म्हणाल्या की,  तुम्ही जिथे असला तिथे बडी कॉप तुमची सावली बनून संरक्षण करेल. बडी कॉपला केवळ एक यंत्रणा न मानता तुमचा जवळचा मित्र माना. तुम्हाला संशयास्पद आणि धोकादायक वाटणा-या गोष्टीबद्द्ल मनमोकळेपणाने आमच्याशी किंवा बडी कॉपशी बोला. बडी कॉप किंवा सिटी सेफ वरील पोलीस कर्मचारी अपडेट नाही राहिला तर थेट मला संपर्क करा, असेही शुक्ला यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही यंत्रणा पुणे पोलीस दल महाराष्ट्रात क्रमांक एकला असल्याचे त्यांनी नमूद केले तर हिंजवडी सह शहरात येरवडा, खराडी, हडपसर आदी पोलीस ठाणे या संकल्पनेवर चांगले काम करीत असल्याचे सांगितले. या संकल्पनेत अतिशय अलर्ट राहणारे हिंजवडी पोलीस कर्मचारी अमर राणे यांचा सत्कार यावेळी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

23 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या कर्जरोख्याच्या नोंदणी कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या कर्जमाफी ही फॅशन झाली आहे या विधानाचा समाचार घेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी कर्जमाफी जर फॅशन असेल तर महापालिका कर्जबाजरी झाली याचा उत्सव केला जात आहे, अशी टीका आज मुख्यसभेत केली.

काल 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या 200 कोटीच्या कर्ज रोख्याच्या नोंदणीचा कार्यक्रम मुंबई शेअरमार्केट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यंकय्या नायडू यांनी कर्जमाफी ही फॅशन झाली आहे. वादग्रस्त विधान केले होते त्याचे पडसाद महापालिका सभागृहात पाहायला मिळाले. राष्टवादी सह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

महापालिका सत्ताधारी पुणेकरांना कर्जबाजारी करतात आणि याचा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे, अशी टीका देखील विरोधकांनाकडून करण्यात आली.

Page 1 of 2
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start