Saregamapa : आज झी मराठीवर खास रंगणार सुरांची मैफल

Saregamapa : Today, Zee Marathi will have a special concert

एमपीसी न्यूज – पंचवीस वर्षांपूर्वी झी मराठीवरुन ‘सारेगमप’ या संगीतमय कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी आज ‘सारेगमप एक देश एक राग’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहे. खास गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम कलाकारांनी घरुन शूट केला आहे. याचे  सूत्रसंचालन  अभिजित खांडकेकर करणार आहे.या कार्यक्रमाविषयी बोलताना अभिजित म्हणाला, ‘ सा रे ग म प हा कार्यक्रम 25 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करतोय ही खरंच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेर देखील हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय आहे आणि या कार्यक्रमाचा रौप्यमहोत्सव साजरा होणार असून मी पण त्याच्या एक भाग आहे याचा मला अभिमान आहे’.’एक देश एक राग’ या सूत्रावर आधारलेली ही संगीत मैफल रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यातले कुठलेही कलाकार एकत्र न येता, एकमेकांना न भेटता, डिजिटल मंचावर एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारणार आहेत, गेम्स खेळणार आहेत, या 25 वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी ताज्या करणार आहेत. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.या कार्यक्रमाचे शूटिंग अभिजितने घरातून मोबाईलवर केलंय. त्याबद्दल सांगताना अभिजित म्हणाला, ‘एरवी शूट करताना सेटवर सर्व गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे आपल्याला ते सोपं वाटतं पण घरी शूट करणं तितकं सोपं नाहीये. खूप मोठी प्रोसेस होती. त्यात जर काही चुका झाल्यातर पुन्हा परत शूट करून ते टीम कडून बरोबर आहे कि नाही ते बघणं. आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरातील सर्व कामं सांभाळून शूटिंग करणं हा खरंच एक मोठा टास्क होता. पण यात मला सुखदाची खूप मदत झाली. तिने कॅमेराच्या मागून मला खूप मदत केली तसंच झी मराठीच्या टीमने वेळोवेळी योग्य सूचना देऊन मला सहकार्य केलं त्यामुळे मला हा वेगळा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली’.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.