मंगळवार, जानेवारी 31, 2023

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मित्राने केले नाक फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज – मित्राकडे दारुसाठी पैसे मागण्यासाठी गेला, मित्राने त्याला नकार दिला अन त्याने चक्क आपल्याच मित्राच्या नाकावर फाईट मारून नाक फ्रॅक्चर केले. हा प्रकार सोमवारी (दि.27) भोसरी येथे घडली.

याप्रकरणी शशिकांत भानुदास जाधव (वय 31 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून संतोष उर्फ कोब्रा पटेकर (रा.आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे मित्र आहेत. आरोपी फिर्यादीकडे आला व त्यांनी फिर्यादीजवळ दारु पाज अशा मागमी केली.त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला.याच रागातून आरोपीने फिर्यादीच्या नाकावर मारून त्यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news