Bhosari: श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाटिकेतून दिला पाणी आडवा पाणी जिरवा चा संदेश

एमपीसी न्यूज -राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर (Bhosari)आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूल भोसरी येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नाट्योत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. या नाटिकेच्या माध्यमातून भविष्यात पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी पाणी संकट व त्यावर मात कशी करावी तसेच पाणी आडवा पाणी जिरवा आदी संदेश दिले. या विद्यार्थ्यांना विज्ञान अध्यापिका आरती वडगणे व अमीर शेख यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share