Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.8) आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली.

प्रणय दत्तात्रय काळोखे (वय.21 रा. देहुगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत मुलगी व आरोपी यांची गेल्यावर्षी गणपती उत्सवात ओळख झाली होती.त्यानंतर आरोपीने तिच्याशी ओळख वाढवत तिच्य़ाशी शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी दिड महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर प्रणय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.