India Corona Update : चोवीस तासांत 1.20 लाख नवे रुग्ण, दोन महिन्यांतील नीच्चांकी रुग्णवाढ 

एमपीसी न्यूज – देशात मागील दोन महिन्यांतील नीच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत देशात 1.20 लाख नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 3 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 एवढी झाली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 2 कोटी 67 लाख 95 हजार 549 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 97 हजार 894 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 93.38 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून, देशात सध्याच्या घडीला 15 लाख 55 हजार 248 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 44 हजार 082 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 380 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे‌. दररोज 20 लाखांहून अधिक नमूने तपासले जात आहेत. देशात आजवर 36 कोटी 11 लाख 74 हजार 142 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 20 लाख 84 हजार 421 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 22 कोटी 78 लाख 60 हजार 317 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 18 कोटी 16 लाख 78 हजार 744 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे तर, 4 कोटी 58 लाख 89 हजार 129 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.