India Corona Update : चोवीस तासांत 1.45 लाख नवे कोरोना रुग्ण, देशात 10.46 लाख ॲक्टिव्ह रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 45 हजार 384 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह देशातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 10 लाख 46 हजार 631 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 05 हजार 926 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 19 लाख 90 हजार 859 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 77 हजार 567 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 90.79 टक्के एवढा झाला आहे.

 

मागील 24 तासांत 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 68 हजार 436 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.27 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 25 कोटी 52 लाख 14 हजार 803 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 73 हजार 219 चाचण्या शुक्रवारी (दि.09) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.