Pune : बुधवार पेठेत सव्वालाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बुधवार पेठ येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह सव्वालाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 13 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी राजेश ठाकूर (वय 46, रा. बुधवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश यांचा बुधवार पेठेतील साई संकुल अपार्टमेंट येथे फ्लॅट आहे. ते 13 जुलै रोजी आपल्या राहत्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील रोख 5 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 25 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरी करून नेला.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.