Chakan : कंपनीतून साडेसतरा लाखांचे स्टील रोल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले 17 लाख 59 हजार 599 रुपये किमतीचे दोन स्टील रोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास केलव्हीएन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाकण येथे उघडकीस आली.

सुधींद्र रमेशराव कुलकर्णी (वय 40, रा. पिंपळे सौदागर) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी निघोजे चाकण येथील केलव्हीएन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कंट्रोलर म्हणून नोकरी करतात. 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले  6 हजार 332 किलो वजनाचे 17 लाख 59 हजार 599 रुपये किमतीचे दोन स्टील रोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like